मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|इतर आरती संग्रह|
जयदेवजयदेव जय लक्ष्मीकांत...

आरती लक्ष्मीकांताची - जयदेवजयदेव जय लक्ष्मीकांत...

निरंजनस्वामीकृत आरती


जयदेवजयदेव जय लक्ष्मीकांता । क्षिरसागरिं अहिशयना स्वामी आनंता ॥धृ॥
शंखचक्रगदापद्म भूषण ।
पदकमळाचे ठायीं ध्वज आंकुश चिन्ह ॥
कमळा तिष्ठत चरणीं सेवे लागून ।
फणिवर धरी वरी छाया प्रेमेम डोलून ॥१॥
नाभीकमळीं निर्मित चतुरानन जाला ।
तुझिया स्व अरुपालागुनि पाह्यासी गेला ॥
न कळे ह्मणवुनि मागें परतुनिया आला ॥
तपसामर्थ्यें करिता झाला सृष्टीला ॥२॥
अंबऋषीच्या साठीं घेऊनि अवतार ।
सत्वरिं जयविजयाचा केला उद्धार ।
निरंजन आरति घेउनि परिकर ।
सद्भावें ओवाळू येती सुरवर ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 23, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP