षष्ठः स्कंध - अध्याय पहिला

श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय.


श्रीगणेशायनमः । सुप्रेमेंनमावेंसंत । जैंकेलादुःखाचाअंत । सुखलाधलेंअनंत । गुण अंबेचेजेगाती ॥१॥

नसेफलाचीवासना । मोहनझगडेमना । नसोडीधर्मचरणा । चरणवंदूतयांचे ॥२॥

खंतीवाटलीप्रपंची । परीत्यागलानसेची । चाडनसेविषयाची । लौकिकरक्षीकेवळ ॥३॥

सहजजेंजेंमिळालें । सुखेंतेंचिस्वीकारिलें । हर्षशोककदांकाळें । स्पर्शनकरीमानसी ॥४॥

नाहींमनींअहंकार । वृत्तीझालीतदाकार । कोणमींकैचाससार । कळलेंपूर्णजयाशीं ॥५॥

मनपावेंसमाधान । प्रपंचीवागेंसुखान । स्वयेंनिराळाआपण । साक्षिरुपेंतिष्ठतसे ॥६॥

अज्ञानज्ञानजाणून । पावलापूर्णविज्ञान । दोघासीठेवीसमान । आज्ञांकितकरुनिया ॥७॥

अंतःकर्णबुद्धीमन । सांठविलेंतेथेंज्ञान । जगाअनित्याजाणून । स्वात्मारामींरमेजो ॥८॥

दशेंद्रियाचागण । तेथेंवर्तेअज्ञान । विहितकरवीतयांकडून । सत्तामात्रेंप्रभुत्व ॥९॥

तयाचेंप्रकटेफल । देवतेसीदेऊनसकळ । स्वयेंराहेसदानिर्मळ । पद्मपत्रजळींजैसें ॥१०॥

अहंकारापाचारिलें । महावाक्यातयाबोधिलें । यजुर्वेदीजेंगाइलें । अक्षरार्थकरुनिया ॥११॥

संतम्हणेअहंपदासी । उमजे एवढयापदाशी । बारेहोशील अविनाशी । जडत्वतुझेंहरपेल ॥१२॥

तूंनव्हेसहादेह । तूंतेनाहींचहेंगेह । वृथाभरलासंदेह । अनित्यातेंमींम्हणसी ॥१३॥

अनित्यासम्हणसीमाझें । फुकामाथाझालेंओझें । क्षेमकाययांततुझें । विचारुनिपाहेपा ॥१४॥

विषयासीमाझेंम्हणसी । सवेंचतयाअंतरशी । क्रोधेंलोभेंभांबावशी । दुखावशीव्यर्थतूं ॥१५॥

तूंतोमीच असेंदेख । तूझेंचहेंअनंतसुख । लीनहोईनभोगीदुःख । अनृतामाजीगुंतोनिया ॥१६॥

एवंजेंविज्ञान । अहंकारीसांठऊन । सुखेंनांदेसंतजन । पायवंदूतयाचे ॥१७॥

पापमुळींवोसंडिलें । विहिततेंचिसेविलें । मनेंदोघांवर्जिलें । अनित्यजडजाणूनी ॥१८॥

एकाग्रजाहलीबुद्धी । तुटलीसर्व उपाधी । प्रवेशलासुखसमाधी । चरणींलीनहोऊंत्यांच्या ॥१९॥

शत्रुमित्रकोठेंनसे । मानापमाननदिसे । सुखदुःखकदानभासे । सदासमसंतुष्टजो ॥२०॥

श्रीगुरु आणिदेवी । दृढभक्तीयेथेंठेवी । तयानमूनसदभावी । चरित्रवर्णूंस्वानंदें ॥२१॥

पांचव्यांतपरमपवित्र । सुरसगाइलेंचरित्र । श्रवणेंपठणशुद्धगात्र । महापातकींहोतसे ॥२२॥

षष्ठस्कंदपरमपावन । ऋषींपुसतींसूतालागुन । वृत्रासुराचेंआख्यान । देवीचरितवदेम्हणती ॥२३॥

सूतम्हणेऋषीश्वर । वदतोंऐकासविस्तर । जन्मेजयासीं । गुरुवर । वदलाजेंवीपरिसिजे ॥२४॥

त्वष्टानामेंप्रजापती । दवामाजीबहुख्याती । त्रिशिरापुत्रतयाप्रती । विश्वरुपनामत्याचे ॥२५॥

महातेजस्वीतोमुनी । वेदगाये एकेमुखानीं । एकेरमेमधुपानी । एकेकरीभाषण ॥२६॥

तेणेंतप आरंभिलें । अतिशयेंतेजफाकलें । पूर्ववैरेतेवेळें । चिंताक्रांतशक्रझाला ॥२७॥

तपहोतासपूर्ण । प्रबळहोईलदारुण । पाठविलाअप्सरींगण । तपभंगाकारणें ॥२८॥

परितोनाहाचळला । तेव्हांशक्रशंकला । गजारुढतेथेंगेला । मनीविचारीबहुवस ॥२९॥

सोडूनपातकाचेंभय । लाजसोडूननिर्दय । ब्रम्हहत्यादुरत्यय । वज्रघायेंकरीतसे ॥३०॥

होताचीवज्रप्रहार । पडलापृथ्वीमुनिवर । मरणपावलासत्वर । परीतेजतैसेंचीशरीरीं ॥३१॥

पाहूनिइंद्राचीकृति । ऋषीसर्वहाहाम्हणती । पुरंदराधिक्कारितीं । दुष्टबहुतपापीतूं ॥३२॥

तपस्व्यासित्वामारिलें । सत्वरपावशीलफळें । पुरंदरेंतेवेळें । सजीबसाअवलोकिला ॥३३॥

तवएकतक्षापातला । इंद्रम्हणेतयाला । यज्ञींबस्तशिरतुजला । मिळेत्याचीशिरेंतोडी ॥३४॥

तक्ष्यानेंशिरेंतोडिलीं । पिंगळयाचीमांदीनिघाली । वेदमुखांतूनतेवेळीं । उडोनीगेलीआकाशीं ॥३५॥

पाहण्याचेंजेंशिर । त्यांतूननिघालेतित्तिर । चिमण्याचेंसैन्य अपार । तिसर्‍यांतूननिघालें ॥३६॥

निस्तेजमुनीजाहला । इंद्रस्वभुवनागेला । ऐकूनत्वष्टाकोपला । विधीयुक्तहवनकेलें ॥३७॥

होमकरिताअष्टमदिनी । पुत्र उपजेअग्नींतुनी । तेजेंकेवळदुजावन्हि । देखोनित्वष्टाकायवदे ॥३८॥

इंद्रारेममतपेंकरुन । महाबलीहोयदारुण । ऐकतांचिऐसेंवचन । पर्वतापरीवाढला ॥३९॥

मृत्यूचकींहाकेवळ । शक्राचाप्रगटेकाळ । गर्जोनिबोलेतत्काळ । त्वष्ठयासीतेधवापुत्रतो ॥४०॥

नमस्कारुनम्हणेपित्याशी । दुःखकाय असेंमानसी । निवारीन अतिवेगेशी । आज्ञापावेसत्वर ॥४१॥

जरीआज्ञामजकरिसी । प्राशनकरीनसागराशी । स्तंभवीनवायूशी । पीठकरीनमेरुचे ॥४२॥

सूर्यचंद्रासंहारीन । इंद्रादिकांशाभक्षीन । पृथ्वीसर्व उपडून । टाकीनसहजसागरी ॥४३॥

नाममजलागीद्यावें । त्वरेंमज आज्ञापावे । बळमाझेंअवलोकावें । पुत्रधर्मपाळीन ॥४४॥

व्यासम्हणेनृपती । त्वष्टाबोलेतयाप्रती । वृजिनहर असेशक्ति । वृत्रनाम असोतुझें ॥४५॥

त्रिशिराअसेतुझाभ्राता । इंद्रेंवंधिलातपकरितां । निरपराध असोनिसुता । ब्रम्हहत्यातेणेंकेली ॥४६॥

तयाशीसत्वरमारावें । बंधूचेत्वांउसणेंघ्यावें । मजलागीसंतोषवावें । नरव्याघ्रासत्वरी ॥४७॥

रथ आणिशस्त्रादिक । त्वष्टानिर्मूनिसम्यक । देततयासीउत्सुक । वृत्रासुरनिघाला ॥४८॥

वृत्राबलिष्ठजाणून । असुर आलेधाऊन । साह्यहोतीवृत्रालागून । कळलेंवृतपुरंदरा ॥४९॥

मानससरोवराचेंतिरी । युद्धझालेंअतिनिकरी । शतवर्षेंदेवासुरी । मनुष्यमानेंझुंजलें ॥५०॥

शेवटींदेवपळाले । वृत्रासुरेंदेवजिंकिले । पित्यासियेऊननिवेदिले । वृत्तसर्वयुद्धाचे ॥५१॥

त्वष्टाम्हणेसंतोषोन । पुत्रात्वांतपकरुन । वरघेईंविरंचिपासून । अवध्यहोईसर्वांशी ॥५२॥

मगवधीजेपुरंदर । संतोषेलमम अंतर । ऐकूननिघेवृत्रसुर । हिमाचलींपातला ॥५३॥

आहारादिसर्वटाकिलें । एकाग्रतप आरंभिलें । शतवर्षेपूर्णकेलें । प्रसन्नझालाविरंची ॥५४॥

आर्द्रशुष्ककाष्टलोह । शस्त्र अस्त्रादिसमूह । अवध्यमागेदुःसह । वाढोवीर्यह्मणेरणीं ॥५५॥

देऊनीतयावरदान । ब्रह्मागेलास्वसदन । वृत्रासुरसज्जहोऊन । देवावरीघाविन्नला ॥५६॥

देवहीकरितीसमर । शस्त्रास्त्रेंवर्षतीअपार । खड्गपरशुशक्तीतोमर । बाणजालवर्षती ॥५७॥

एवंकरितीसमर । तवतोक्रोधेवृत्रासुर । शक्राउचलोनिसत्वर । मुखामाजीटाकिला ॥५८॥

शक्रासीगिळूनदुष्ट । वृत्रझालासंतुष्ट । देवझालेभयाविष्ट । अक्रोशकरितीएकसरे ॥५९॥

बृहस्पतीमतेंकरुन । जृंभाकेलीउत्पन्न । मोकळिलेंवृत्रवदन । जांभईआलीराक्षसा ॥६०॥

होतांचिमुख उघडें । मघवातेव्हांबाहेरपडे । जांभईतेव्हांपासून इकडे । प्रगटझालीसंसारी ॥६१॥

पुनरपियुद्धमाजलें । वृत्रसर्वांजिंकिले । देवसर्वपळाले । वृत्रबैसेइंद्रपदी ॥६२॥

इंद्रादिदेवसमस्त । पदभ्रष्टाचिंताक्रांत । कैलासीयेऊनत्वरित । शंकरासीप्रार्थितीं ॥६३॥

सवदेवासहशंकर । विधीसहवैकुंठीसत्वर । येउनीस्तविलासर्वेश्वर । नारायणदेवानीं ॥६४॥

पस्तीसश्लोकदोनशत । वृत्रासुराचेंचरित । वृत्र इंद्रपदीबैसत । तेंचिवदलीयेथेंअंबा ॥६५॥

देवीविजयेषष्ठेप्रथम:  : ॥१॥     

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP