षष्ठः स्कंध - अध्याय नववा
श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय.
श्रीगणेशायनमः । श्रीचैतन्यकृपाधन । वर्षलीसुरस आख्यान । कलिकृतदोषावर्षण । नासलेसर्वभक्तांचे ॥१॥
भगवतीचिगुणकथा । व्यासेंगाइलीदिव्यगाथा । ऐकतांचिअज्ञानव्यथा । दूरहोयश्रोत्यांची ॥२॥
पूर्वाराध्याभगवती । वर्णरुपासरस्वती । पुर्वार्धसुरसगुणतती । प्रकटझालीप्राकृतें ॥३॥
तिचेकरितांगायन । करितांध्यानसेवन । षोडशोपचारेपूजन । अखिलार्थलाभती ॥४॥
नवरत्नांचेंसिंहासन । अंबावरीविराजमान । आदौकरावेंध्यान । जननीचेंएकाग्रें ॥५॥
कोटिसूर्यतेज उदेलें । स्वरुपतेवींशोभलें । कोटिचंद्रसुशीतले । अनंत आणिअपार ॥६॥
वेदरुपिणीसगुणा । वेदांतरुपानिर्गुणा । वेदवेद्यागुणागुणा । वेदजननीवेदिका ॥७॥
वेदसागराचिलहरी । वेदसारासुधाझरी । मीनलीजेंवेदाक्षरी । गायत्रीहीचपरांबा ॥८॥
सर्वशास्त्राचेंसार । सर्वजीवाचेमाहेर । सर्वरुपामनोहर । परांबाह्रदईंध्याइजें ॥९॥
मंत्ररुपासेविद्रूपा । बीजरुपिणीचिद्रूपा । सर्वरुपाआणिअरुपा । ह्रदयविद्यापरेशी ॥१०॥
ह्रदयामाजीआवाहन । कल्पूनियासिंहासन । निश्चलकरावेंध्यान । बाह्यासनीपुजावे ॥११॥
अखिलपीठदैवते । तयास्थापूनितेथें । श्रीयंत्रविधिप्रयुक्ते । आवाहनकरावें ॥१२॥
सुंदरद्यावेंआसान । वरीअंबेसीबैसवून । उभयहस्तमगजोडून । ध्यानकीजेमूर्तीचे ॥१३॥
जपाकुसुमसमकांती । तीननयनशोभती । नानालंकारभासती । चतुर्भुजसाजिरे ॥१४॥
अंकुशपाशपुष्पबाण । इक्षुधनुष्यधारण । कोटिकंदर्पओवाळून । मुखावरुनीटाकिजे ॥१५॥
मृगनयनाभुजंगवेणी । मुगुटशोभेरत्नकिरणीं । चंद्रबिंबजीच्यामूर्धनी । अष्टमीचेंझळकतसें ॥१६॥
इंद्रचापाचीछटा । लाजेपाहूनललाटा । मृगमदतिलकगोमटा । अनुपम्यशोभतसे ॥१७॥
कळीजेवींचंपकाची । छबीतेवींनासिकेची । नक्षत्राचगुच्छाची । शोभाहरिलीनथयोगें ॥१८॥
मदनाचेशरासन । भ्रूलतात्याआकर्ण । कटाक्षजेवीतीक्ष्णबाण । कामेश्वरवेधिला ॥१९॥
अपांगजेवीक्षण । सर्वजगाचेपोषण । तेंचिवामनिरीक्षण । घडीमोडीब्रम्हांडे ॥२०॥
कर्णदोन्हीतेजाळ । लेइलेताटंकसोज्वळ । डुल्लतींदिव्यकुंडलें । प्रभाफांकेकपोली ॥२१॥
सर्वब्रम्हांडाचेंवृत्त । अंबेसीतेनिवेदित । सूर्यचंद्रापरीशोभत । ताटंकजीचेस्वभासा ॥२२॥
पद्मरागसमकांती । दोनिकपोलशोभती । स्वच्छभासेदंतपंक्ती । मोहकजीचेंमंदहस्य ॥२३॥
पक्वजेवीतुंडीफल । ओष्ठजीचेनिर्मळ । मुखींरचलातांबूल । भक्तवरदाभवानी ॥२४॥
कंबुकंठसुंदर । मंगलसूत्राद्यलंकार । नानासुमनाचेहार । गळांशोभतीजियेच्या ॥२५॥
पाशांकुशकुसुमशर । चतुर्बाहुअतिसुंदर । इक्षुचापमनोहर । हस्तामाजीशोभती ॥२६॥
दिव्यकंकणमुद्रिका । सुकोमल अंगुलिका । चोळीलेइलीसुरेखा । पदखरीविराजे ॥२७॥
दिव्यरक्तपीतांबर । कटिकसलामनोहर । कोटिकामसुंदर । कामेशांकीध्याइजे ॥२८॥
साखळयावाळेतोडर । जोडवीविरोद्यामंजीर । पादभूषणेंखमधुर । उपजेपायहलवितां ॥२९॥
गुलाबपुश्पाचिप्रभा । नखामाजीविश्वगाभा । भरलाजणूंजियेच्या ॥३०॥
अणिमादीअष्ठसिद्धी । वाणीरमाउमाबुद्धी । सेवितीजीसत्रिशुद्धी । मंत्रिणीआणिदंडिनी ॥३१॥
चारीवेदमूर्तिमान । सेवितीजीचेकरितीगान । हरिहरादिदेवगण । सेवितीजीसप्रेमभरे ॥३२॥
ऐसेकरितांचिध्यान । तुटेंसर्वभवबंधन । उत्पन्नहोयदिव्यज्ञान । स्वस्वरुपसांपडे ॥३३॥
आणूनियाउष्णजल । पाद्य आर्पावेंनिर्मळ । गंधाक्षतपुष्पफल । सहेम आधींदेणे ॥३४॥
उत्तमगंगेचेंनीर । आचमनार्थसुंदर । समंत्रसर्व उपचार । देतांतुष्टहोतसे ॥३५॥
शुद्धोदकेंघालिजेस्नान । गोदुग्धेंकीजेमज्जन । पुनःशुद्धोदकेकरुन । स्नानपूजन अर्पावें ॥३६॥
दधितैसेचिघृत । मधुसिताहेंपंचामृत । स्नान अर्पावेंभक्तियुक्त । पृथक्पूजनकरावें ॥३७॥
निर्माल्याचेंविसर्जन । करुन अभिषेकस्नान करावेंश्रीसूक्तम्हणून । आसनीमगस्थापिजे ॥३८॥
वस्त्रादिमंत्र अर्पण । करुनदीजेआचमन । कुंकुमकस्तूरीचंदन । विलेपन अर्पावें ॥३९॥
हरिद्राकज्जलकंकण । अष्ठप्रकारचंदन । यक्षकर्दम अर्पून । सर्वोपचार अर्पावे ॥४०॥
करवीरकमलमालती । गोकर्णजपाकुंदजाति । पारिजातचंपाशेवती । ब्राम्हीआणिनिशीगंध ॥४१॥
जुईमोगरादुपारी । तेर्डाकोर्हांटशेंदरी । मुचकुंदधतुरमंजरी । बकुलकेतकीअशोक ॥४२॥
दवणामर्वामखमल । काश्मीर अर्जुनबिल्वदल । कर्णामोथामोहमाल । अनेकहार अर्पावे ॥४३॥
दुर्गेभर्गेभवानी । आद्येविद्येजननी । वरदेशिवेमोहिनी । श्रीविद्येपरेगिरे ॥४४॥
एवंनामेघेऊन । पुष्पेंकीजेसमर्पण । धूपदीपसमर्पून । अर्पिजेमगनैवेद्य ॥४५॥
श्रीअंबेचेदक्षिणकरी । रजतपात्रमंडळावरी । स्थापूनीषड्रसमधुरी । समस्तान्नवाढिजे ॥४६॥
वामभागीव्यंजनें । चटण्याकोशिंबीरीवाढणें । मेतकुटलोणचींरायतींचूर्णे । अनेकविध अर्पावें ॥४७॥
पापडपापडयाकुर्डया । साणगेवडयासांडया । पातोडयाचिक्वडयापर्यया । वडेबोंडेंवरीवाढी ॥४८॥
केळींवांगींअळूंसुरण । शेंगामुळेंपडवळेंजाण । अनेकशाकारंम्यकरुन । उजवेबाजूंवाढिजे ॥४९॥
रस्सारसकढीसार । पुलसुकोळंबुसांभार । लेह्यपेयमधुर । दधितक्रवाढिजे ॥५०॥
कृछ्रहरिद्रादध्यन । खिरीश्रीखंडकुंकुमांन । जिलब्यालाडूघिवरपूर्ण । मांडेफेण्यापूरणपोळी ॥५१॥
उजवेबाजूसखालती । मिष्ठानेंवाढावींनिगुती । मध्येंशुभ्रमुदाकृती । ओदनसुंदरवाढिजे ॥५२॥
पिंवळेंदाटवरण । वाढावेंअर्धमुदीवरुन । अन्नब्रम्हाचेंभूषण । आवर्णरोचकजाणिजे ॥५३॥
लोणकढेंनूतनघृत । रजतवाटींकीजेपूर्ण । दुजींमधुवाटीभरुन । भाताजवळीठेविजे ॥५४॥
नैवेद्यकीजेसमर्पण । सुवासिकजलपान । प्रेमभावेकरुन । समंत्रकसमर्पावें ॥५५॥
आतृप्तीभावेंकल्पून । दीजेमग आपोशन । कीजेकरप्रक्षालन । सचंदनकरवावें ॥५६॥
तांबूलकरावाअर्पण । सुवासिकपदार्थपूर्ण । समार्पावादर्पण । व्यंजनादिक अर्पावे ॥५७॥
छत्र आणिचामर । सर्वहीराजोपचार । ऋतफलादिउपचार । स्वर्णदक्षणाअर्पावी ॥५८॥
नवार्तिकओवाळिजे । मगमंत्रपुष्प अर्पिजे । प्रदक्षिणानमस्कारकीजे । प्रार्थनामग आरंभावी ॥५९॥
श्रीअंबेकरुणार्णवे । दुःखशमनेविश्वोदभवे । वरदेजयेअनंतविभव । दयाघनेंनमोस्तुते ॥६०॥
व्याप्त अससींचराचरी । चिद्रूपेंकार्यकरी । आमुचेबुद्धीसप्रेरी । ध्यानगंम्येनमोस्तुते ॥६१॥
हरिशिरजेव्हांहरिलें । वेदींतेव्हांतुजप्रार्थिले । हयशिराहरीसकेले । कृपापारेनमोस्तुते ॥६२॥
हयासुरेआराधिली । तामसीतयाप्रसीदली । इच्छात्याचीपूर्णकेली । कृपार्णवेनमोस्तुते ॥६३॥
मधुकैठभावरदान । दिलेंअंबेकृपेन । केलेंविधीचेरक्षण । कृपार्णवेनमोस्तुते ॥६४॥
सुद्युम्नातेंदर्शन । देऊनीकेलेंतयाधन्य । स्वस्वरुपीकेलालीन । कृपार्णवेनमोस्तुते ॥६५॥
नृपजोशुकदौहित्र । तयाकेलाशीपवित्र । शुककेलासुखपात्र । कृपार्णवेनमोस्तुते ॥६६॥
प्रतीपनृपादिलासुत । शंतनूतोविख्यात । तयादीधलाभीष्मसुत । कृपार्णवेनमोस्तुते ॥६७॥
वसूचेशापमोचन । केलेंत्वांजन्मदेऊन । दिलेंसुतागंगापान । कृपार्णवेनमोस्तुते ॥६८॥
व्यासेंप्रार्थितांतुजसी । मृतपुत्रादाखविशीं । कुंत्यांदिकांतोषविशी । कृपार्णवेनमोस्तुते ॥६९॥
काजेशांतेमनोहर । दाऊनियाश्रीपुर । शक्त्यादेशींमनोहर । कृपार्णवेनमोस्तुते ॥७०॥
शापदग्ध उतथ्य । तयांदिलेंवेदतथ्य । केलातयांकृतकृत्य । कृपार्णवेनमोस्तुते ॥७१॥
विष्णुनेंकरितांयज्ञ । केलातयांसर्वमान्य । अंबातूंकृपाघन । कृपार्णवेनमोस्तुते ॥७२॥
ध्रुवसंधीचासुत । सुदर्शनासिराज्यदेत । शशिकलेशींवरदेत । कृपार्णवेनमोस्तुते ॥७३॥
सुबाहूशीझालीप्रसन्न । काशीचेकरिरक्षण । दुर्गेंवससीआजुन । कृपार्णवेनमोस्तुते ॥७४॥
सुशीलवैश्यतारिला । द्रव्यघेऊनसुखीकेला । श्रीरामावरदीधला । कृपार्णवेनमोस्तुते ॥७५॥
भाराक्रांतधराझाली । सर्वदेवीतुजस्तविली । दुःखहरिलेंतेवेळीं । कृपार्णवेनमोस्तुते ॥७६॥
शेषगर्भ आकर्षिला । रोहिणीउदरीठेविला । कंसापासूनरक्षिला । कृपार्णवेनमोस्तुते ॥७७॥
कृष्णासीत्वांजन्मकाळीं । द्वारेंकरुनमोकळीं । पोंचविलासीगोकुळीं । कृपार्णवेनमोस्तुते ॥७८॥
स्वयेंनंदाहोऊनी । देवासिकृपेरक्षुनी । जाहलीसविंध्यवासिनी । कृपार्णवेनमोस्तुते ॥७९॥
गोपीसीतूंकात्यायनी । व्रतेंसंतुष्ठहोऊनी । दीधलांसीत्यांकृष्णरमणी । कृपार्णवेनमोस्तुते ॥८०॥
पुत्रहरणेंवासुदेव । दुःखेंकरीतुझास्तव । सुखींकेलासीमाधव । कृपार्णवेनमोस्तुते ॥८१॥
पुत्रार्थकृष्णतपकरी । मीनलातवमंत्राक्षरी । सुखींकेलाकंसारी । कृपार्णवेनमोस्तुते ॥८२॥
महिषभयेंदेर्वींस्तविली । देवतेजेंप्रगटझाली । दैत्यवधिलासर्वबळी । कृपार्णवेनमोस्तुते ॥८३॥
सर्वदेवांकेलेंस्तवन । झालीसतेव्हांप्रसन्न । दिलेंतयांवरदान । कृपार्णवेनमोस्तुते ॥८४॥
शुंभभयेंदेवस्तविती । प्रगटझालीसपार्वती । कौशिकीहोसीमागुती । कृपार्णवेनमोस्तुते ॥८५॥
उत्तमकरुनीगायन । चंडादिसर्वांमोहून । युद्धाआणिसीओढून । कृपार्णवेनमोस्तुते ॥८६॥
हुंकारेंधूम्राक्षवधिसी । कालीरुपदुजेंकरिसी । चंडमुंडाचेरक्तपीशी । कृपार्णवेनमोस्तुते ॥८७॥
ब्राम्हीऐंद्रीमाहेश्वरी । क्रीडावैष्णवीकौमारी । शिवदूतीतूचिनृहरी । कृपार्णवेनमोस्तुते ॥८८॥
रक्तबीजादिदैत्यवधिले । शुंभनिशुंभापाडीले । समस्तांसीस्वर्गदिले । कृपार्णवेनमोस्तुते ॥८९॥
देवकरितींस्तवन । देसीतयांवरदान । वदलीसत्यांदुःखशमन । कृपार्णवेनमोस्तुते ॥९०॥
नंदाभीमाशाकंभरी । रक्तदंतादुर्गाभ्रामरी । एवंरुपेंदुःखहरी । कृपार्णवेनमोस्तुते ॥९१॥
सुरथवैश्य आराधिती । राज्यज्ञानदोघांप्रति । मनुत्वदेसीअतिप्रीति । कृपार्णवेनमोस्तुते ॥९२॥
इंद्रस्तवितांतुजसी । वृत्रासुरातेमोहिसी । स्वतेजेंतयावधिसी । कृपार्णवेनमोस्तुते ॥९३॥
शचीनेंजेव्हांस्तविली । इंद्रांशितेव्हांपावली । इंद्रासंपत्तीदीधली । कृपार्णवेनमोस्तुते ॥९४॥
दुष्टाराजेविप्रमारिती । तुष्ठलीसीस्त्रियाप्रती । दिलीत्यांसीऔर्वसंतती । कृपार्णवेनमोस्तुते ॥९५॥
एकवीरेंआराधिली । पावलातोएकावली । केलाचक्रवर्तीबळी । कृपार्णवेनमोस्तुते ॥९६॥
तूचिमातेसर्वकर्त्रीं । तूंचिमातेसर्वभर्त्री । तूंचिमातेसर्वहर्त्री । कृपार्णवेनमोस्तुते ॥९७॥
तूंचिमाताआणिपिता । तूंचिमित्रतूंचिभ्राता । तूंश्रीगुरुकुलदेवता । कृपार्णवेनमोस्तुते ॥९८॥
मीपापीअधमखल । दुर्वृत्तमंदकेवळ । मनींअहंभावप्रबळ । परितारीकृपार्णवे ॥९९॥
तुजवाचोनिजगतीं । कोणदेईलमजप्रती । मजपाहतांकंटाळती । देवतीर्थसंतादी ॥१००॥
ऐसाअधमजरीखरा । शरणझालोंसर्वेश्वरा । चुकवीआतांयेरझारा । कृपार्णवेअंबिके ॥१०१॥
म्यामानिलीतुजजननी । तुझापुत्रमीअसोनी । पावेजरीअन्यजननी । यशतुझेचीमिळेल ॥१०२॥
कैसाहीजरीअसलो । परीतुजसीशरण आलों । तवपदजेव्हांलाधलों । धन्यझालोंसत्यत्वें ॥१०३॥
एवंप्रार्थनाकरुन । अनंन्यव्हावेंशरण । तेणेंतुटेजन्ममरण । कृपार्णवाकृपेनें ॥१०४॥
निर्माल्यमगकाढून । करावामस्तकीधारण । तीर्थप्रसादघेऊन । ह्रदईंघ्यावीपरांबा ॥१०५॥
बाह्यकरावेविसर्जन । विप्राद्यावेंभोजन । सुवासिनीसीपुजून । तृप्तकीजेकुमारिका ॥१०६॥
दक्षणासर्वांदेऊन । वायनादिसौभाग्यदान करुनकीजेभोजन । प्रसन्नहोय अंबिका ॥१०७॥
पूर्वार्धाचेकीजेश्रवण । अथवाकीजेपठन । पुराणिकाचेंपूजन । वस्त्राभरणींकरावें ॥१०८॥
एवंभक्तीनेंकरितां । प्रसन्नहोयजगन्माता । उणेंकायतिच्याभक्ता । सुलभसर्वतयासी ॥१०९॥
देवीविजयेषष्ठेनवमः ॥९॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP