षष्ठः स्कंध - अध्याय सातवा

श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय.


श्रीगणेशायनमः । सूतवर्णीऋषीप्रती । जन्मेजयाव्याससांगती । एकवीरातेयशोमती । कारणसांगेदुःखाचें ॥१॥

रम्यगृहांतसरोवरी । पद्मेंलाविलींपरोपरी । नजावेंइणेंबाहेंरी । म्हणोनिवर्जीनित्यतो ॥२॥

न आयके एकावली । नित्ययेतयास्थळीं । सैन्यदेईपाठबळीं । रक्षणार्थतिचापिता ॥३॥

एकोदिनीयेस्थळी । क्रीडत असतांसकाळीं । काळकेतूदैत्यबळी । अकस्मातपातला ॥४॥

तेणेंपाहूनरुपवती । जवळीआलापापमतीं । उचलूनियातिजप्रती । नगराकडेचालिला ॥५॥

आक्रोशकरीतीबाळा । म्यातोदुष्टप्रार्थिला । मजनेईसोड इजला । परीदुष्टनायके ॥६॥

सैनिकतेव्हांधावले । तेणेंतेसर्वमारिले । स्वपुराकडेचाले । मागेंधावेमीतीच्या ॥७॥

मजपाहेंएकावली । किंचित्तेव्हास्थिरावली । दैत्येंमजसहतीसनेली । स्वपुरामाजीसत्वर ॥८॥

ठेऊनियारंम्यमाहली । रक्षकठेविलेदैत्यबळी । मजबोलेतोवेळीं । वश्यकरुनदेइजे ॥९॥

मगम्यादिलेउत्तर । मीनबोलेनकठोर । तूंचितिजलाविचार । मनामाजीवसेंजें ॥१०॥

तेव्हांतिजसीकायबोले । कांव्यर्थरडसीबाले । मजवरावेकामकले । दासवत्तराहीनमी ॥११॥

एकावलीअधोवदन । हळूंचबोललीवचन । ममपित्यानेंवरनेमून । एंकवीरयोजिलासे ॥१२॥

त्याचीचमीकामिनी । नांन्यथाकदागामिनी । मीवागावेंपितृवचनी । स्वेच्छावरकेवीघडे ॥१३॥

एवंजरीबोलिली । परीतेणेंनसोडिली । मजसहीतरक्षिली । समजावीतनित्यशः ॥१४॥

एवंतीअसेदुःखित । तिजकरितांमीरुदनकरीत । तूंकोणयेथेंकिमर्थ । पातलाशीसांगिजे ॥१५॥

रावम्हणेमीएकवीर । हैहयजोनृपवर । तुझेंवचनमनोहर । परमाश्चर्यहोतसे ॥१६॥

तीचेंरुप ऐकून । पूर्वींचमोहिलेंमाझेंमन । आणीकम्हणसीकन्यादान । मजसीचयोजिले ॥१७॥

ऐसेंहीअसोनमजसी । तिणेवरिलेंमानसी । केव्हांपाहीनतिजसी । सोडवीनकेव्हांतातें ॥१८॥

कोठेंत्यादुष्टाचेंपूर । मार्गदाखीवसत्वर । कालकेतूसीकालपूर । दाखवीननिजबळें ॥१९॥

तयाचेबंधांतून । तूंकेवीआलीससुटून । प्राणसखीतेटाकून । यशोवतीसांगिजे ॥२०॥

तिचापितातिजसी । नजायकींसोडिवण्यासी । बलनसेंकीतयाशी । चिंताकेवीनकरीतो ॥२१॥

सर्वसांगयशोवती । नेईमजपुराप्रती । आतांचिसोडवूनतीयुवती । पोंचवीनपितृगृहा ॥२२॥

मगतीचेकन्यादान । मजप्रतीकरोविधीन । व्यासम्हणेवाक्य ऐकून । यशोवतीसुखावली ॥२३॥

महावीराएकवीरा । बाळपणीमंत्रवरा । लाधलेंसिद्धविप्रद्वारा । योगेश्वरीच्याकृपायागें ॥२४॥

बंदीमाजीएकचित । करुनीमंत्रमीजपत । भक्तिभावेंआराधीत । मानसोपचारसर्वही ॥२५॥

रक्तवस्त्रारक्तवर्णा । रक्तभूषारक्तनयना । रक्तप्रियारक्तकामना । पुरवीआशापूरकारका ॥२६॥

रक्तनखेंरक्तदंत ।  धरेपरीस्थूलमूर्त । सुमेरुचदोनपर्वत । स्तनद्वयजियेचे ॥२७॥

दीर्घह्रदईंलोंबलें । विशालपरीबहुशोभलें । कांठिण्यसौंदर्यएकवटलें । स्तनामाजीजियेच्या ॥२८॥

भक्तजनाचेसुखकर । दुग्धाचेंदोनसागर । सर्वकामनादेणार । ऐसेंस्तनजियेचे ॥२९॥

चारबाहूअतितेजाळ । आयुधेंधरिलींसोज्वळ । खड्गपात्र आणिमुसल । लांगुलचौथेंविराजे ॥३०॥

रक्तचामुंडाईश्वरी । इजलाचनामयोगेश्वरी । कुळस्वामिनीनिर्धारीं । चराचरींभरलीसे ॥३१॥

ऐसेंधरुनध्यान । म्याकेलेंआराधन । मासांतीस्वप्नींयेऊन । जागवूनिमजबोधी ॥३२॥

ऊठजायगंगातीरा । तेथेंदेखसीएकवीरा । करीलदुःखनिस्तारा । रमासुतममप्रिय ॥३३॥

दत्तात्रेयापासून । मंत्रतेणेंघेऊन । सदासेवीमाझेंचरण । नोवराकरीतोचितूं ॥३४॥

एवंमजसांगून । स्वयेंझालीअंतर्धान । मीतेव्हांजागींहोऊन । एकावलीसकथियेलें ॥३५॥

ऐकूनबहुतोषली । मजजाण्याचीत्वराकेली । शीघ्रगतीमजझाली । नदेखतीकोणीमज ॥३६॥

पाताळीगुप्तविवर । तेथेंअसेदैत्यपूर । मंत्रघेईसत्वर । ज्ञानहोईलसिद्धजे ॥३७॥

सैन्यघेऊनीयायावें । गमनकीजेमजसवे । युद्धकरीलतुजसवे । प्रबळ असेराक्षस ॥३८॥

एवंबोलेयशोवती । मंत्रघेतसेनृपती । पृतनाघेऊनबहूती । यशोवतीसचालम्हणे ॥३९॥

यशोवतीसहएकवीर । पातलाकालकेतुपूर । समरकरुनीदुर्धर । निर्दाळिलादैत्यतो ॥४०॥

दोघीससवेघेऊनी । नृप आलारम्यभुवनी । तेणेंसामोरायेउनी । एकवीरागृहीनेलें ॥४१॥

कन्यापाहूनतोषला । मुहूर्तपाहूनिभला । कन्यादानविधीकेला । हैहयासीनृपवरें ॥४२॥

बहुअर्पिलेंअंदण । यशोवतीसहकन्यारत्न । एकवीरासीदेऊन । बोळविलाजांवईं ॥४३॥

आनंदेंतोरमासुत । पातलास्वविषयांत । एकावलीसहक्रीडत । यशोवतीसहिततो ॥४४॥

पुत्रझालाकृतवीर्य । तयापासावकार्तवीर्य । त्यावंशासीहैहय । ख्यातीझालीनृपाळा ॥४५॥

चरित्रमधूमधुरामृत । जेभक्तप्राशनकरीत । तयानाहींजन्ममृत्य । अंबायशसेवाहो ॥४६॥

एकत्रिंशत्शतोतर । श्लोकतात्पर्यमनोहर । देवीविजयविस्तार । करीतसेपरांबा ॥४७॥

देवीविजयेषष्ठेसप्तमः ॥७॥ 

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP