षष्ठः स्कंध - अध्याय चवथा
श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय.
श्रीगणेशायनमः । नृपम्हणेवासिष्ठा । सांगावीतीर्थप्रतिष्ठा । कायफलकायनिष्ठा । करावीतीसविस्तर ॥१॥
व्यासम्हणेऐकनृपती । तीथेंसांगतोपुण्यवंती । नदीमाजीभागीरथी । सर्वश्रेष्ठापुण्यदा ॥२॥
यमुनाआणिसरस्वती । नर्मदागडकागोमती । सिंधुतमसावेत्रवती । कावेरीतमसाचंद्रभागा ॥३॥
तपीगोदाचर्मण्वती । शरयूकृष्णासांब्रमती । समुद्रांजाऊनमिळती । पुण्यविशेषजाणिजे ॥४॥
श्रावणभाद्रपदमास । नद्यापावतीरजोदोष । वृष्टियोगेंग्राम्यमलास । प्राप्तहोतीम्हणूनी ॥५॥
धर्मारण्यप्रभासपुष्कर । कुरुक्षेत्रबिंदुसर । नैमिषप्रयागमानससर । श्रीशैलहेमहिमगिरी ॥६॥
बदरिआणिवामनाश्रम । शतयूपादिबहुआराम । परीमनानसतांविराम । तीर्थैकायकरितीत्या ॥७॥
देहसंबंधीमल । तीर्थेंकरितीनिर्मल । परीमनाचेकश्मल । दूरनोहेतीथयोगें ॥८॥
मनशुद्धहोयजरी । बहुराहतीगंगातीरी । रागद्वेषवसेउरी । पापओळखीहेंचिपा ॥९॥
स्वधर्माचेंपालन । हेंचीमोठेंतीर्थसेवन । तीर्थमहिमासांगेन । अंबास्थानेंप्रसंगी ॥१०॥
चंचळ अत्यंतमन । कामक्रोधदारुण । वशनहोतीकठीण । मोठयासिद्धामुनीशी ॥११॥
ब्रम्हवेत्तामहाश्रेष्ठ । ब्रह्मपुत्रवसिष्ठ । परीजाहलाकोपाविष्ट । विश्वामित्राशापिले ॥१२॥
तोहीशापीवसिष्ठाशी । आडीबकहोसीऋषी । भांडतीदोघेक्रोधावेसीं । सहस्रवर्षेपर्यंत ॥१३॥
तस्मान्नृपाहेंमन । नोहेंकदास्वाधीन । अंबेचेकरीतांसेवन । कृपायोगेंवशकीजे ॥१४॥
नृपम्हणेसदगुरु । नवलवाटेमजथोरु । किमर्थशापपरस्परु । देतीमुनीवर्णावे ॥१५॥
किमर्थजाहलेंवैर । केवींत्यांचाशापोद्धार । विचित्रकथासविस्तर । ऐकवीगादयाळा ॥१६॥
कृष्णसांगेचरित । सूर्यवंशीनृपविख्यात । रविकुळींत्रिशंकुसुत । रामचंद्रपूर्वजतो ॥१७॥
हरिश्चंद्रनामनृपती । तयानसेसंतती । वरुणासीरावप्रार्थी । नरमेधेमागेसुत ॥१८॥
यज्ञाचाकरितांनेम । वरुणझालासप्रेम । पुत्रझालाचंद्रासम । हारिश्चंद्रसंतोषला ॥१९॥
रावकरीनामकरण । विप्रवेषेंआलावरुण । म्हणेनृपासत्यवचन । करीनरमेधसत्वरी ॥२०॥
नृपकष्टलाअंतरी । नदाखवीमुखावरी । करीनम्हणेमासांतरी । वरुणजाईस्वगृहा ॥२१॥
मासहोतांचिपाशी । यज्ञमागेनृपाशी । नम्रत्वेबोलेतयाशी । हरिश्चंद्रतेऐका ॥२२॥
असंस्कृतममपुत्र । पशूकेवींअपवित्र । संस्कारुनीमगवीतिहोत्र । नरमेधसत्यकरीनमी ॥२३॥
कृपाकीजेतोंवरी । वरुणबोलेनिर्धारी । वंचितोंसस्नेहभरी । म्रुदुवाक्येंमीजातों ॥२४॥
पुन्हाजेव्हांयेईन । नएकेतांचिशापिन । नृपम्हणेसमावर्तन । होतांअवश्यकरणेते ॥२५॥
गृहागेलावरुण । नृपस्वस्थकरीमन । रोहितनामेंपुत्रसुगुण । दिवसामासावाढला ॥२६॥
सर्वविद्येमाजीचतुर । द्वादशवर्षाचाकुमर । वृत्तऐकूनीभयंकर । मरणभयेंपळाला ॥२७॥
गिरीगव्हरींदडाला । रावतेव्हांसंकटीपडिला । वरुणशापीतयाला । जलोदरहोवोम्हणे ॥२८॥
नृपझालारोगग्रस्त । पीडिलादेहसमस्त । पुत्रेंऐकुनीऐसीमात । धिग्जिवितम्हणेहें ॥२९॥
पुत्र असतांजिवंत । पित्यासीदुःखबाधित । युक्तनव्हेंमाझेंकृत्य । म्हणोनिनिघेजावया ॥३०॥
तवयेऊनपुरंदर । म्हणेरोहितामागेफीर । आत्महत्यादुस्तर । वृथाकारेसंपादिशी ॥३१॥
व्यासम्हणेनृपती । तयाफिरवीसुरपती । रावकष्टीगुरुप्रती । विचारीतवसिष्ठा ॥३२॥
वसिष्ठाचेघेउनीमत । पुत्र आणायाविकत । मंत्रीधाडिलात्वरित । कार्यावेशेहरिश्चंद्रें ॥३३॥
मंत्रीतेव्हांशोधकरी । गांवोगांवींघरोघरीं । द्विजपुत्रमागेपरोपरी । विपलधनदेईनम्हणे ॥३४॥
अजीगर्तनामेंब्राम्हण । पुत्र असतींतयातीन । द्रव्यलोभेकरुन । मध्यमपुत्र अर्पिला ॥३५॥
पातकांचेंमहामूळ । लोभवैरीमहाखळ । विप्रकैचातोचांडाळ । सुतस्नेहटाकिला ॥३६॥
शुनःशेपनामेंसुत । मंत्रीतयाशीबांधित । अजीगर्ताद्रव्यदेत । यथेच्छितसर्वही ॥३७॥
मंत्रीयेईपरतोन । नृपेंमंडपरचून । नरपशूयूपाबांधोन । आरंभिलेयज्ञाशी ॥३८॥
मिळालेतेथेंमहामुनी । नरमेधाचेसभास्थानी । विश्वामित्रदयार्द्रमुनी । हरिश्चंद्रावदतसे ॥३९॥
नृपानकरीसाहस । दयायेऊंदेमनास । कांमारिसीबाळास । स्वसुखार्थविप्राच्या ॥४०॥
सूर्यवंशीचेनृपती । सदाविप्रारक्षिती । परदुःखार्थ अर्पिती । देह आपुलेधार्मिक ॥४१॥
प्रार्थनामाझीऐकिजे । विप्रबाळासीसोडिजे । प्रमाणवाक्यजरीमाझें । सुखीहोशीलनृपाळा ॥४२॥
व्यासम्हणेपारिक्षिता । नमोनीनृपतत्वता । कोपधरिलागुप्तचित्तां । विश्वामित्रतयेवेळीं ॥४३॥
वरुणमंत्रबाळाशीं । गाधिजतेव्हांउपदेशी । प्लुतस्वरेंम्हणेमंत्राशी । मरणभयेंशुनशेप ॥४४॥
ऐकूनिमंत्रोच्चारण । प्रगटलास्वयेंवरुण । दयेनेंबाळसोडून । निरोगकेलानृपाशीं ॥४५॥
एकेदिनीतोनृपवर । मारावयासीसूकर । प्रवेशलावनांतर । कौशिकीतीरींपातला ॥४६॥
रावकरीतसेंस्नान । तोआलागाधिनंदन । वृद्धविप्ररुपकरुन । संकल्पसांगेनृपासी ॥४७॥
हरिश्चंद्रसंतोषोन । मागम्हणेविप्रालागुन । सर्वस्वघेतलेमागून । पूर्वकोपेंछळियेलें ॥४८॥
नृपपाहूनपदरहित । वसिष्ठतेव्हांकोपत । विश्वामित्रासाशीपित । बकहोयम्हणूनी ॥४९॥
गाधिजेंशाप ऐकून । तयाशापिलेंपरतोन । आडीहोयतूंदारुण । यावत्बकत्वमजलागी ॥५०॥
मानससरोवराचेंतीरी । दोघेदोनवृक्षांवरी । नीडेकरुनीपरस्परीं । युद्धकरतीआडीबक ॥५१॥
बहुकाळतेझुंजती । चंचुतुंडनखांघाती । तीक्ष्णस्वरेंआक्रंदती । बहुकाळपर्यंत ॥५२॥
मगयेउनीविधाता । करीत्यांचेशापांता । दोघांकेलीमित्रता । स्वसदनाजायविरंची ॥५३॥
घरीगेलागाधीनंदन । तैसाचितोमैत्रावरुण । नृपाहेमोहविंदाण । बाधेसर्वासर्वदा ॥५४॥
नृपम्हणेबादरायणा । वसिष्ठानाममैत्रावरुण । लाधलेंहेंकायकारण । सांगाविस्तारेंमजलागी ॥५५॥
इक्ष्वाकुवंशींनृपती । निमीनामेंमहाख्याती । शूरधीरबलीव्रती । नीतीमाननृपवर्य ॥५६॥
गौतमाश्रमाशेजार । वसविलेंजयंतूपूर । मेळ उनीयज्ञसंभार । वसिष्ठासीप्रार्थितसे ॥५७॥
निमीम्हणवसिष्ठासी । यज्ञकरणेंमानसी । पांचसहस्रवर्षीं । दीक्षामजदेइजे ॥५८॥
अंबेचेंकरुंयजन । वसिष्ठबोलेऐकून । पूर्वींचनिमंत्रीमजलागुन । अंबायज्ञार्थशतक्रतू ॥५९॥
पांचशेंवर्षपर्यंत । इंद्रहोईलदीक्षित । तेथेनयतांपरत । यज्ञतुझाकरीनमी ॥६०॥
वाटपाहेतोंवरी । ऐकूनीरावनिवारीं । पुरोहित असूनिइंद्राघरीं । केवींजासीधनलोभें ॥६१॥
निवारिताहीगेलाऋषी । राव उदासमानसीं । गुरुकरुन अन्यविप्रासी । यज्ञतेणेंआरंभिला ॥६२॥
इंद्रयाग आटपून । वसिष्ठ आलापरतोन । मखाचेकरावयाअवलोकन । मंडपामाजीपातला ॥६३॥
राव असेनिद्रित । नजागवितीदूत । नृपानदेखोनीकोपत । स्वापमानेंवसिष्ठ ॥६४॥
म्हणेमजलागीटाकून । गुरुकेलायेणेंअन्य । माझाकेलाअपमान । देहपडोनिमीचां ॥६५॥
शाप ऐकतांचिदूतीं । नृपालागीजागविती । शापवृत्तेतेसांगती । ऐकतांकोपेंनृपाळ ॥६६॥
बाहेर आलाझडकरी । बोलेगुरुशींकोपभरी । आमंत्रितामीशक्रपुरी । धनलोभेंस्वयेंगेला ॥६७॥
वृथामजशींशापिले । नाहींमनींविचारिले । ममशापेअतिबळे । पडोदेहतुझाही ॥६८॥
परस्परेंशापिले । दोघेहीदुःखितजाहले । वसिष्टेंविधिसीप्रार्थिले । निवेदिलेशापवृत्त ॥६९॥
विधीतेव्हांआज्ञापित । मित्रावरुणदेहांत । प्रवेशकरीतूंत्वरित । देहमिळेलकालांतरीं ॥७०॥
वसिष्ठेंतैसेचिकेलें । मित्रावरुणएकवेळें । उर्वशीपाहूनभुलले । वीर्यपडलेंघटांत ॥७१॥
प्रगटलेतेथेंदोनसुत । प्रथम अगस्तीविख्यात । तपकरींगेलावनांत । दुजावसिष्टजाहला ॥७२॥
जैसेंरुपतैसेंज्ञान । ब्रम्हवरेंमागुत्यान । वसिष्टेंसर्वपाहून । स्वस्थझालाबहुकाळें ॥७३॥
मित्रावरुणापासुनी । पुनःप्रगटलामुनी । नामतेणेंमैत्रावरुणी । वसिष्टाचेजाहले ॥७४॥
इकडेनिमियज्ञकाळीं । शाप ऐकूनऋषींसकळीं । निमिदेहातेमंत्रबळीं । श्वासमात्ररक्षिला ॥७५॥
सुगंधादिद्रव्येंकरुन । देहाचेंकरितीरक्षण । यज्ञहोतांचिसंपूर्ण । देवसवपातले ॥७६॥
नृपाझालेप्रसन्न । मागम्हणतीवरदान । नृपम्हणेदिव्यज्ञान । नेत्रींस्थानमज असो ॥७७॥
देवम्हणतीकरीध्यान । अंबाहोईलप्रसन्न । इच्छितलाधेलपूर्ण । ध्याइलीतेव्हांपरांबा ॥७८॥
अंबाजाहलीप्रसन्न । नृपादीधलेंवरदान । देवमात्रसोडून । सर्वनेत्रींवासतुझा ॥७९॥
पापण्यातेव्हांपासुनी । लवतींजाणाक्षणोक्षणीं । निमिषम्हणतीतयालागुनी । निमिजाहलासर्वचक्षू ॥८०॥
देहींठेऊनिअरणी । विप्रझटलेमंथनी । पुत्रप्रगटेतेथूनि । मिथीनामयाकरितां ॥८१॥
देहावरीझालापुस्तक । नामतेणेंचिजनक । विदेहनिमीसर्वदृक । वंशविदेहम्हणविला ॥८२॥
तोपुत्र अतिचतुर । गंगातीरीकेलेंपूर । नामठेवीमिथिलानगर । विदेहजनकसर्वही ॥८३॥
ज्ञानीअनुभवीशांत । होतीतयाचेवंशांत । देवीकृपेंसमस्त । प्राप्तहोयसर्वांशीं ॥८४॥
कृपानसेंजोंवरी । लोभमोहकामवैरी । चित्रविचित्रचरित्रकरी । परांबातीस्वलीलें ॥८५॥
कोणीकामीकोणीक्रोधी । कोणीशुद्धमहाबुद्धी । कोणीदीनसर्वसिद्धी । कोणीसुखीसंचित ॥८६॥
आप आपलेंसंचित । जेव्हांजेव्हांउदयायेत । पापोदयेंपापकरीत । उत्तमकरीपुण्योदयें ॥८७॥
यांतनाहींथोरलहान । सर्वकर्माचेआधीन । देवीकृपेंवांचून । क्षीणनोहेंकर्मतें ॥८८॥
शुक्रेंशापिलाययाति । परीउपजलीतयाशांती । पुण्योदयेंजाणनिश्चिती । जराभोगीदुःसह ॥८९॥
तेचिहैहयराजे । भार्गवाहिंसितीचोजे । पापोदयावांचूनिसहजे । केवींहोयदुष्टबुद्धी ॥९०॥
हैहयाचाइतिहास । विस्तरेंबोलिलाव्यास । कथागोडबहुसुरस । पुढिलियेअध्यायीं ॥९१॥
साठश्लोकदोनशत । वसिष्टशापादिचरित । अंबाबोलेप्राकृत । संतभक्ताकारणें ॥९२॥
इतिश्रीदेवीविजये । षष्ठेचतुर्थः ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP