षष्ठः स्कंध - अध्याय आठवा

श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय.


श्रीगणेशायनमः । जन्मेजयम्हणेव्यासा । कठीणहामोहफासा । मोहिलाजेथेंविष्णूसा । दुजाकोणसाहूंशके ॥१॥

भगवान्हरीस्वतंत्र । केवीझालापरतंत्र । केंवींअसेंमोहयंत्र । सांगसर्व उकलूनी ॥२॥

व्यासम्हणेनृपती । ऐकसांगतोगती । सर्वहीज्यांतभ्रमती । मायाबळदुर्धरहे ॥३॥

कनक आणिकामिनी । मोहस्थानेंहीदोनी । पाहूनिविटेजोमनी । परशिवप्रत्यक्षतो ॥४॥

संशयजेवींतुजसी । तेवींचपूर्वींमजसी । पुसिलेंम्यानारदासी । वदलोतेंऐकपा ॥५॥

एकवेदाभागचार । केलाम्याचीविस्तार । परीअहंममाकार । सुटलानाहींनारदा ॥६॥

मीकोणपांडवकोण । परीसुखदुःखाकारण । मोहनटाकींअतःकर्ण । सांगऋषेनारदा ॥७॥

नारदबोलेहांसोन । नवलनसेंहेंविदाण । अतर्क्यमायेचेजाण । ममवृत्त ऐकम्हणे ॥८॥

मजसमानज्ञानी । दुजानाहींत्रिभुवनी । एवंख्यातीपालनी । मोहनसुटेबलिष्ठ ॥९॥

स्त्रीसाठींविपंत्ती । भोगिलीमीनिगुती । पर्वतासहभारती । तीर्थदर्शनापातलो ॥१०॥

निघालोंजईंस्वर्गातून । परस्परेंकेलापण । जेवेळींज्याचेंमन । जोविषय अवलंबे ॥११॥

एकमेकासीसांगावें । कदांकांहींनझांकावें । शपथाकरुनस्वभावें । भूमंडळींपातलों ॥१२॥

वृष्टिकाळींप्रवास । वर्ज असेसर्वांस । जाणूनिकेलासुखवास । संजयनृपाचेमंदिरीं ॥१३॥

कन्यात्याचीरुपवती । नामेंजाणदमयंती । नृपेआमुच्यासेवेप्रती । आज्ञापिलीसदभावे ॥१४॥

आसनशय्याभोजन । तीचकरीआम्हाअर्पण । आम्हीकरुनिवेदाध्ययन । नियमादियथाविधी ॥१५॥

मीमहतीचेसुस्वर । वाजवूनिमनोहर । तानमानसप्तस्वर । सामगायनकरावें ॥१६॥

मजसीतीवशझाली । मोहफांसागोविली । प्रीतीनित्यप्रौढली । दमयंतीचीतेधवा ॥१७॥

दोघांचेंसेवनकरी । अंतरपडेपरोपरी । भोजनादिसर्वप्रकारी । उणीवहोयपर्वता ॥१८॥

हावभावनिरीक्षण । मीहीमोहलोंपाहून । पर्वतेंतेंओळखून । पुसिलेंमजएकांती ॥१९॥

कांमामाकायरंग । वांछितेकींतुझासंग । तूंहीजाहलासीदंग । लक्षणेंमजवाटते ॥२०॥

सत्यवदावेंयेसमई । शपथकेलीजेंठाईं । विस्मयवाटेंयेसमईं । जाहलाकींतुजलागीं ॥२१॥

नारदम्हणेबादरायणा । ऐकूनिभागिनेयवचना । लज्जावाटलीमममना । बोलिलोंमगतयाशी ॥२२॥

अवश्यवेधलीवृत्ती । प्रेमकरीदमयंती । धिक्कारकरीमजप्रती । पर्वतकोपलातेवेळा ॥२३॥

पूर्वीचसत्यकरुनी । वंचिलेंमजछळानीं । वानरमुखहोऊनी । राहसीलममशापें ॥२४॥

शापतयाचाऐकूनि । क्षमानसेंमममनी । पर्वतातुहीस्वर्गगमनी । ममशापेंअयोग्यहो ॥२५॥

शापूनियापरस्पर । पर्वतगेलादेशांतर । वानरास्यमीभ्यासुर । तेथेंचिराहिलोंलज्जेनें ॥२६॥

दुःखझालेंमानसी । दमयंतीपाहेमजसी । परीनटाकींप्रेमासी । नादलुब्धझालीती ॥२७॥

कन्येचाहट्टपाहून । मजसीचनृपेंकन्यादान । केलेंतेव्हांगृहकरुन । राहिलोंतेथेंगृहधर्में ॥२८॥

वानरमुखेंदुःखित । कालगेलाबहूत । तवपातलापर्वत । बारावर्षांनंतरी ॥२९॥

म्याकेलाबहुमान । अर्ध्यादिकेलेंपूजन । वानरमुखमजपाहून । दुखावलामानसी ॥३०॥

म्हणेमामाव्हावेसुमुख । दमयंतीसनसोदुःख । मीहीतयाशींनिःशंक । स्वर्गयोगपुनःकेला ॥३१॥

एवंमायेचेंचरित्र । कोणजाणेविचित्र । ऐसाचएकदानिजगात्र । स्त्रीचजाहलोंस्वयेंमी ॥३२॥

सूतम्हणेऋषीसी । ऐकूननारदवाक्याशी । व्यासम्हणेदेवऋषी । केवींस्वयेंस्त्रीत्वहें ॥३३॥

महामायेचेंकौतुक । सांगणेमजसम्यक्‍ । नारदवर्णींकथानक । श्रोतीसावधश्रवणकीजे ॥३४॥

ऐसेंवाटेमानसी । पाहवेंजाऊनहरीसी । गेलोमीश्वेतद्वीपासी । नारायणदेखिला ॥३५॥

शंखचक्रगदाकमल । चतुरबाहूअतिसरळ । माथामुकुटसोज्वळ । भाळीतिलककस्तूरी ॥३६॥

गळांशोभेवैजयंती । कौस्तुभाचिफांकलीकांती । बाहूभूषणेंशोभतीं । अंगरागचर्चिला ॥३७॥

श्रीवत्सलांछन । ह्रदईंशोभेंशोभन । उदरींत्रिवळीगहन । अनंततोंडेंजयामाजी ॥३८॥

शेषावरीकेलेंशयन । रमाकरीपादसंवाहन । मीजातांचिअंतर्धान । रमाझालीतेसमईं ॥३९॥

नारायणेमजदेखिलें । सुखासनीबैसविलें । कुशलमजविचारिलें । सांगितलेंतेणेंमज ॥४०॥

व्यासातेव्हांहरीसी । विचारिलेंपरियेसी । मजपाहतांचरमेसी । लज्जाकेवींजाहली ॥४१॥

मीतापसीनिर्मळ । योगीमुनीध्यानशील । मायेचेनचलेंबळ । जिंकिलीम्यातिजलागी ॥४२॥

वाक्यमाझेऐकून । किंचितहांसलाकृपाघन । लोकनीतिएवंजाण । नारदातूंनेणशीकी ॥४३॥

विनाएकांतनारी । नसावीपतिशेजारी । म्हणोनिरमागृहांतरी । गेलीतुज अवलोकितां ॥४४॥

येसमईंत्वांबोलिले । मायेशींम्यांजिंकिले । एवंवाणीकदांकाळें । मुखींमनीनाणावी ॥४५॥

महामायाविश्वजननी । स्थितिलयाचीकारिणी । मीअथवाशिवद्रुहिणी । नेणवेंरुपतियेचे ॥४६॥

तियेशीजावेशरण । करुनयेअभिमान । तिलाजिंकेऐसाकोण । आहेपुरुषनारदा ॥४७॥

वचनएवंऐकिलें । पुन्हाहरीसीविचारिलें । मायेचेरुपवहिलें । केवींअसेंगोविंदा ॥४८॥

मायेचेंपाहूंचरित । मानसीइच्छाबहुत । दाखवीदेवानिश्चित । महामायाविलासा ॥४९॥

हरीम्हणेदेवमुनी । मायापाहूंवाटेमनी । देखतांमगदुःखनमानीं । चरित्रतुजदावीन ॥५०॥

बैसूनीयांगरुडावरी । मजबैसवीपाठारी । गरुडेंमारिलेभरारी । भारतवर्षदेखिलें ॥५१॥

अरंण्येंनद्यावनें । वापीकूप उपवनें । पाहतपाहतरंम्यस्थानें । कांन्यकुब्जींपातलों ॥५२॥

तेथेंएकसरोवर । वृक्षलागलेअपार । कोकिलारावसुंदर । नानापक्षीबोलती ॥५३॥

उदक अतिनिर्मळ । मिष्टरम्यसीतळ । कमलेंफुललींविशाल । भ्रमरझेंपाघालिती ॥५४॥

हरीमजसीबोलिले । नारदासरोवरदेखिलें । सुंदर उदकभरलें । निर्मळजेवींसंतमन ॥५५॥

उतरोनिगरुडाखालीं । धरलीमाझीअंगुली । नेलेंमजसराजवळीं । ठगवीमजवाक्पटू ॥५६॥

नारदाहेंतीर्थपावन । आधीकीजेत्वास्नान । मागामीहिकरीन । आनंदयुक्तजाहला ॥५७॥

वीणाअजिनठेविलें । शिखाबद्धकुशघेतले । हस्तपादप्रक्षालिले । केलेंव्यास आचमन ॥५८॥

मगशिरलोंउदकांत । बुडीमारिलीत्वरित । तवझालोंअकस्मात । षोडशवर्षाकामिनी ॥५९॥

चर्मवीणादिघेऊन । गेलावेगेनारायण । मीहीविसरलोस्मरण । नारद असेमीऐसें ॥६०॥

सरांतून आलोंवरी । आश्चर्यगमलेंअंतरी । कोणमीकैसीनारी । उत्पन्नकेवींनकळेहें ॥६१॥

कोणमजमातापिता । कुळगोत्रबंधुत्राता । कायकर्णेपुढेंआतां । नकळेमजतेसमई ॥६२॥

नगनगभरलीभूषणें । रुपवाटेअतिदेखणें । करांगुलीमाजीदर्पण । मुखपाहिलेंसुंदर ॥६३॥

कमलनेत्रसुढाळ । आंतलेइलेंकाजवळ । अधरदोनीसुकोमळ । सरळसुंदरनासिका ॥६४॥

सर्जाचीनथलेइली । कुंकुमबिंदुशोभेंभाळीं । वेणीरंम्यगुंफिली । बुचडाशोभेंफाकडा ॥६५॥

केतककेवडाराखडी । मुदझोकेवाकडी । फुलेंगुफिलीपेडी । शोभाअपारनवर्णवे ॥६६॥

बिंदिबिजवरापिंपळपान । भांगकाढिलारेखून । सिंदूरबिंदूलावून । थाटबनलासुरुप ॥६७॥

कानींशोभतींकर्णफुलें । बुगड्याशींघोसलोंबले । केशामाजीखोविले । वेलसुंदरबाळयाचे ॥६८॥

पद्मरागसमप्रभा । गालाचीपडलीआभा । दंतावलीचीकायशोभा । जडलेंहिरेप्रत्यक्ष ॥६९॥

मुखींविडारंगला । किंचितस्मित आलेंमला । पाहूनवाटेमुखकमला । कमलकायमजपुढें ॥७०॥

एवंमाझीरुपसंपत्ती । पाहूनसर्वहीभुलती । तवतालध्वजनामेंनृपती । ससैन्यतेथेंपातला ॥७१॥

तेणेंदेखिलेंमजसी । वेधूनगेलामानसी । विचारिलेंतेणेंमजसी । कोणाचीकोणसांगम्हणे ॥७२॥

कन्याकिंवाविवाहिता । कोठेंआहेतवमाता । धन्यतोचितत्वता । ज्याचाअंशतूंअससी ॥७३॥

मजलावरीकोमले । मममानसगुंतले । सत्वरमाझेंघराचाले । राज्यसर्वतूझेंची ॥७४॥

नारदम्हणेंमुनिवरा । ऐकूनित्याचिवाग्धारा । बोलिलोंतेअवधारा । नृपाळासीस्त्रीरुपें ॥७५॥

मीअसेंकोणाचीकोण । नाहींनृपामजभान । मातापितापतीजाण । कोणीनसेमजलागी ॥७६॥

येथेंचिमींबैसलीसे । पुढेंकार्यमजनदिसे । तुझेंमनींजेजेंअसे । यथासुखेआचरी ॥७७॥

ऐकतांच ऐसेंवचन । संतोषलेंत्याचेंमन । मगतेणेंशिबिकाआणून । नेलेंमजघरासी ॥७८॥

सुमुहूर्तपाहून । केलेंमाझेंपाणिग्रहण । सुखेंझालारममाण । मजसीराव आनंदें ॥७९॥

मीहीअतिहर्षभरीं । तयासवेंविलासकरी । मीनारदहेंभान अंतरी । मुळींचनाहींतेवेळा ॥८०॥

मद्यमांसस्वाद्दन्न । सदांकरावेंसेवन । नानावस्त्रेंआभरण । नित्यनूतनभोगावीं ॥८१॥

अत्तरहारतुरेगजरे । जाळयाझेलेसाजिरे । मंदसुगंध सीतलवारे । सदानिमग्नरतिरंगी ॥८२॥

एवंबहुसंवत्सर । क्रीडताझालोंगरोदर । नृपास आनंदथोर । दोहदविचारीमजलागी ॥८३॥

पुढेंझालासुत । रावधनबहूवाटित । एवंव्यासाबारासुत । जाहलेमजराजगृहीं ॥८४॥

पुढेंवाढलासंसार । सुनानातूबडिवार । अहंममतेचाप्रकार । अनुपंम्याभोगिला ॥८५॥

मुलेंसर्व आवडती । त्याच्यासुखेंमजप्रीति । तीजेव्हांदुखावती । दुःखितहोयचित्तमाझें ॥८६॥

एवंबहुकाळगेला । तरीतृप्तीनसेमनाला । पूरसुटलातृष्णेला । कृष्णाकायवर्णूंमी ॥८७॥

तवतोकाळफिरला । महाशत्रूउदेला । अपारसैन्यासह आला । कांन्यकुब्जिजयार्थ ॥८८॥

अपाररणमाजले । सर्वपुत्रयुद्धींपडले । जयघेऊनपरतले । शत्रुसैन्यस्वदेशी ॥८९॥

ऐकिलेंपुत्रांचेमरण । शोकझालादारुण । रणमंडळीमीजाऊन । वक्षस्थळबडविलें ॥९०॥

आक्रोशकेलाबहुवस । पारनाहींत्यादुःखास । दयाआलीविष्णूस । विप्रवेषेंधाविनला ॥९१॥

मजबोधिलेंसज्ञान । म्हणेतूंकोणाचीकोण । व्यर्थकायओरडून । अवश्यनढळेकदापि ॥९२॥

ऊठ आतांकरीस्नान । एवंमजसीवदोन । पुरुषतीर्थीमजनेऊन । निमज्जनकरविलें ॥९३॥

बुचकळीचेबरोबर । पालटलेममशरीर । पूर्वरुपसाचार । पावलोंतेव्हांव्यासामी ॥९४॥

पूर्ववतनारायण । तीरीउभास्मितानन । मजम्हणेनारायण आन । जाहलेंवानजाहलें ॥९५॥

चलावेआतांसत्वर । कायकरीतसाविचार । जालाकींबहुउशीर । निघाबाहेंरवेगेसी ॥९६॥

सत्यमिथ्याविवंचना । लागलीसेमाझेंमना । मजकांहींचसुचेना । भांबावलोअतिशयें ॥९७॥

आलोंजवबाहेरी । तालध्वज उभातिरी । म्हणेगेलीकोठेंनारी । हातोंपुरुषकोठचा ॥९८॥

स्त्रियेसाठींशोककरी । तयाबोधीस्वयेहरी । निर्वेदतोगेलाघरीं । स्वपदींपौत्रस्थापिला ॥९९॥

वनागेलानृपती । ज्ञानझालेंतयाप्रती । देवीसायुज्यनिश्चिति । हरिकृपेंलाधला ॥१००॥

मजकडेक्षणोक्षणीं । हरीपाहेहांसूनी । बोलिलोमीतक्षणी । नारायणसाऐकिजे ॥१०१॥

स्नानमात्रेंममस्मृती । केवींगेलीरमापती । याचदेहीमनस्थिती । केवींझालीपृथक्पणें ॥१०२॥

कोठेंगेलेंमाझेंज्ञान । मीनारदहेंनसेभान । सुखेंमद्यादिसेवन । अनेकभोगभोगिले ॥१०३॥

कैसेंहेंमायाचरित । जगदगुरोसांगत्वरित । तुजवांचूनमोह अंत । करीलकोणदूसरा ॥१०४॥

हरीम्हणेमायाविलास । नारदानीटपाहिलास । कारणतीचविस्मृतीस । स्मृतिरुपातीच असे ॥१०५॥

जागृतीचेंजेंभान । स्वप्नींतेंचिनसेंज्ञान । स्वप्नीचेंजेंवर्तमान । जागृतीमाजीजाणतो ॥१०६॥

तेवींमायेचीकरणी । अवस्थाभोगवीतीनी । जगत्रयहेत्रिगुणी । बद्धकेलेंतियेनें ॥१०७॥

अवस्थाआणिगुणत्रय । परस्पराचाअसेआश्रम । पृथक्‍ नहोतीमिश्रमय । कदांकाळींनारदा ॥१०८॥

पृथक्‍ पणेंजेंपाहणें । तेचिआत्माओळखणें । तेंतोंतिचेकृपेविणे । कदांकाळीगवसेना ॥१०९॥

मीअथवाविधीहर । नेणोतिचेंबळ अपार । अन्यकायतेथेंपामर । मायाजयकराया ॥११०॥

नारदामोहनकीजे । महामायाचरित्रचोजे । सदामानसीघ्याईजे । पराशक्तीभुवनेशी ॥१११॥

व्यासाएवंमजबोधोनी । स्वधामागेलापद्मपाणी । मीहीगेलोंपितृसदनीं । चतुराननवंदिला ॥११२॥

मजपाहूनश्रमीत । पितामजविचारीत । नारदाआजिउदासचित्त । किमर्थतुझेंसांगिजे ॥११३॥

तेव्हांम्यानिवेदिलें । तेणेंमजतोंचिकथिले । हरिहरादिसर्वमोहिले । म्हणेनकरीविस्मय ॥११४॥

नारदम्हणेव्यासा । एवंमायेचाफांसा । मोहनधरीमानसां । ध्यानचिंतितियेचे ॥११५॥

व्यासम्हणेपारिक्षिता । एवंवदोनीतत्वता । नारदगेलामहाज्ञाता । स्वस्थतेव्हांजाहलों ॥११६॥

कालक्षेपनिमित्त । रचिलेंहेंभागवत । पुराणगुह्यवेदसंमत । संशयनाशकचरित्रहें ॥११७॥

पूर्वार्धवर्णिलातुज । वृत्रादिआख्यानसहज । आणीककाय इच्छिसीगुज । ऐकावयासांगतें ॥११८॥

मणिबंधाचाअध्याय । पुढीलजाणानिश्चय । संख्याचरित्रनिर्णय । पूर्वार्धजाणातोचिपै ॥११९॥

भवाब्धीज्यासितरणें । पाहवेंचरित्रतेणें । देवीध्यानसदांकरणें । सुलभउपायअसेहा ॥१२०॥

परशुरामवरदेंभवानीं । मूळप्रकृतीपरावाणी । भवबंधसर्वतोडूनी । धन्यकेलाचिरंजीव ॥१२१॥

श्लोकचारशेंसत्तर । आठ अध्यायाचेसार । बोलिलीअंबासविस्तर । श्रोतेपरिसोतचरित्रहें ॥१२२॥

देवीविजयेषष्ठेअष्टमः ॥८॥   

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP