षष्ठः स्कंध - अध्याय दुसरा
श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय.
श्रीगणेशायनमः । स्तोत्रेंजहालाप्रसन्न । मृदुबोलेंसुहास्यवदन । ब्रम्हरुपतोजगज्जीवन । वैकुंठपीठविहारी ॥१॥
किमर्थकेलेंआगमन । कोणेपीडिलोतिदारुण । कार्यतुमचेसाधीन । कळवावेंसत्वरीं ॥२॥
देवम्हणतीकमलावरा । ठावेंनसेंकींसर्वेश्वरा । सर्वसाक्षीज्ञानसागरा । विचारितोसीनवलहें ॥३॥
माजलासेवृत्रासुर । तेणेंजिंकिलेसर्वसुर । वळलाआम्हांदुःखसागर । तारीआतांदयाळा ॥४॥
बोलेतेव्हांरमावर । लाधलातोब्रम्हवर । त्वष्ट्यानेंबळ अपार । दीधलेंतयापूर्ववैरें ॥५॥
युद्धेकरुनिनसेंजय । सामकीजेकपटमय । शपथादीकरुनिसमय । छलेकरुनिमारावा ॥६॥
अनेकयुक्तीकरुनी । शत्रुनाशिजेमुळीहुनी । मधुकैटभजेंवीमोहुनी । अंबाकृपेंमीवधिले ॥७॥
गंधर्व आणिऋषी । जावेवेगेंवृत्रापाशी । विश्वासदेऊनतयाशी । इंद्रमित्रकरवावा ॥८॥
एवंकरुनीछल । शत्रूमारिजेप्रबळ । एराननासेंतोखळ । वरदर्पितदेवशत्रू ॥९॥
आयुष्य आणिपुण्य । जोवरीनसेंक्षीण । तोंवरीधीरधरुन । मित्रत्वेंकरुनीवर्तावें ॥१०॥
मीहीगुप्तरुपेंकरुन । पवीमाजीप्रवेशेन । साह्यतुम्हांशीकरीन । इंद्रमारीलतयाशी ॥११॥
श्रीदेवीचेकरास्तवन । तीकृपाकटाक्षेकरुन । करीलसर्वांचेरक्षण । मोहकरीलवृत्राशी ॥१२॥
व्यासह्मणतीनृपासी । एवंऐकतांवाक्याशीं । देवस्तवितीदेवीशी । भक्तिभावेकरुनिया ॥१३॥
आदिमायेविश्वजननी । हरिहरब्रम्हमोहिनी । विश्वचालकेभवानी । मुळप्रकृतीनमोस्तु ॥१४॥
तूंचहेसहजस्रजिशी । वृत्तत्याचेजाणशी । भक्तसंकटवारिशी । दुष्टवधिशीसर्वदा ॥१५॥
वृत्रेंपीडिलेंआम्हांशी । हेंकायतूंनेणशी । परीविलंबकांकरिशी । भक्तरक्षकेपरांबे ॥१६॥
आम्हींझालोंमोहवश । पिडितीआम्हांराक्षस । तोडीमायेसंकटास । कृपापारेपरांबे ॥१७॥
महिषशुंभादिअसुर । मर्दूनिरक्षिलेतुवासुर । येवेळींकिमर्थ उशार । करिशीमातेनेणवे ॥१८॥
माताजरीस्वसुता । उपेक्षीलमगत्राता । कोणकरीलयाचीचिंता । तान्हियाचीसांगिजे ॥१९॥
लोभयोगेंआम्हींजरी । गुंतलोंअंबेविषयांतरी । कायदोष आम्हांवरी । मायादुस्त्यजतुझीही ॥२०॥
जेवींकरिशीप्रेरणा । तेवींकरितोंआचरणा । करिशीतूंचिचालना । जेवींनटसूत्रधारी ॥२१॥
काष्ठाचीकेलीबाहुली । वस्त्रभूषणेंशोभविली । श्रेष्ठासनीबैसविली । कळसूत्रचालविलें ॥२२॥
जैसेंसूत्रहलविशी । तैसेंचतयावागविशी । स्वयेंचमत्कारकरिशी । चमत्कृतेनमोस्तू ॥२३॥
अनेकरचनादाखविली । सवेचीसर्वमोडिली । तेवीकृतीतुवारचिली । ब्रम्हांडमंडपीक्रीडार्थ ॥२४॥
आतांनासूनिअसुर । अंबेरक्षावेंसर्वस्रुर । तुजवांचूनिआम्हांथार । दुजानसेपरांबे ॥२५॥
ऐकतांदेवांचेंवचन । प्रत्यक्षप्रगटेआपण । रक्तांबरपरिधान । नानाभूषणेंलेइली ॥२६॥
पाशांकुशहातींधरिलें । अभयवरकरशोभले । देवाशींवरदानदीधलें । वृत्रमोहीनम्हणूनी ॥२७॥
सवेचीझालीअंतर्धान । देवपावलेनिजस्थान । मुनीगंधर्वीजाऊन । वृत्रासुरबोधिला ॥२८॥
मुनिम्हणतीवृत्रासुरा । नकरणेंत्वांशक्रवैरा । सुखनसेंचिसुरासुरा । द्वेषयोगेंसांप्रत ॥२९॥
तुमचाद्वेषपरस्पर । त्रैलोक्यासीदुःखकर । सत्यकरुनिनिर्धार । शक्रमित्र असोतुझा ॥३०॥
सत्येंसर्वजगसंचलें । सत्येंसर्वस्थिरावलें । सत्योंचिसर्वसाधिलें । सत्यमुख्यसर्वात ॥३१॥
मध्यस्थ आम्हींजाणिजे । समत्वमनासीआणिजे । समयसत्यसांगिजे । नांदादोघेसन्मित्र ॥३२॥
ऐकूनिबोलिलांवृत्र । मुनिवाक्यहेंपवित्र । मान्य असेंमजसर्वत्र । प्रतिज्ञाद्यावींशक्रानें ॥३३॥
शुष्क आर्द्रशस्त्र अस्त्र । मृत्युनसेदिवारात्र । सत्येंअसेशक्रमित्र । वचनेकरुनीतुमच्या ॥३४॥
सूतसांगेऋषीसी । एवंऐकतांवचनाशी । गंधर्वीबोधूनिशक्राशीं । सत्यशपथकरविली ॥३५॥
साक्षीकरुनीपावक । सत्यकरीपविनायक । विश्वासेमगत्वाष्ट्रसम्यक् । संतोषलातेधवा ॥३६॥
मित्रझालेदोघेजण । मुनिपावलेनिजस्थान । वासववृत्रएकासन । एकभोजनविहरती ॥३७॥
वृत्रासुराझालेंसुख । परिइंद्रमानसीबहुदुःख । कपटेंवरीप्रेममुख । अंतरीचिंतीघातत्याचा ॥३८॥
त्वष्टापाहोनीइंद्रमित्र । एकांतिबोधिलापुत्र । परीनगणीवाक्यवृत्र । कालवशजाहला ॥३९॥
एवंगेलाबहुकाळ । निःशंकवृत्रकेवळ । गजारुढतोएकवेळ । सागरतीरीपातला ॥४०॥
अस्ताजायदिवाकर । दारुणवेळीपुरंदर । समयजाणूनीअवसर । समुद्रंफेनपाहिला ॥४१॥
शुष्क आर्द्रनसेफेन । मनींस्मरलादेवीचरण । सवेचिस्मरनारायण । वज्रफन उचलिला ॥४२॥
गुप्तरुपेंतेव्हांहरी । प्रवेशलावज्रांतरी । परांबाहीसाह्यकरी । पवीमाजीसंचरें ॥४३॥
वृत्राशीतिणेंमोहिले । तेणेंतयानाहींकळलें । इंद्रेंतेव्हांवज्रहाणिले । गतप्राणवृत्रझाला ॥४४॥
इंद्रतेव्हांसंतोषला । स्वनगरासीपातला । देवीमहोत्वकेला । प्रतिमास्थापनकरुंनिया ॥४५॥
वृत्रनाशिनीमहामाया । विख्यातझालीतीसदया । शक्रेंवृत्रामारुनिया । शंकितझालामानसी ॥४६॥
विष्णुसशंकहोऊन । त्वरेंगेलानिजभुवन । इंद्रहीपावलास्वसदन । सुखनाहींतयाशीं ॥४७॥
शुभाशुभकर्मफल । भोगावेंअवश्यसकळ । निंदितींसर्वबहुवेळ । इंद्रालागीदैवते ॥४८॥
देवगंधर्वसिद्धमुनी । निंदितीशक्रालागुनी । विश्वासघातीब्रम्हहननी । निःशंकझालापापिष्ट ॥४९॥
पुत्राचेपाहुनीमरण । त्वष्टाकरीतेव्हांरुदन । पुत्रदेहसंस्कारुन । शापदेईशक्राते ॥५०॥
विश्वासघातकीमहादुष्ट । ममशापेंहोपदभ्रष्ट । बहुकाळदुःखगरिष्ट । प्राप्तहोवोदुरात्म्या ॥५१॥
एवंतयाशींशापून । त्वष्टागेलानिघून । हिमाचलींतपदारुण । करावयाबैसला ॥५२॥
अकीर्तियोगेलज्जित । ब्रम्हाहोतोभयाभीत । गुप्तबैसेकमलांत । मानससरसेविलें ॥५३॥
गुप्तझालाशचीपती । देवतेव्हांचिंताकरिती । अराजिकहोताविपत्ती । पातल्यासर्वसर्वांशी ॥५४॥
दोषदुष्काळतस्कर । अवर्षणझालेंपृथ्वीवर । यज्ञादिकर्मविस्तर । लोपलेंसर्व एकसरे ॥५५॥
सर्वदेवमुनिवर । करुनीतेव्हांविचार । इंद्रपदीनहुषनृपवर । पुण्यशीलस्थापिला ॥५६॥
सूर्यवंशीचानृपती । पुण्यवान आतिविख्याती । स्वर्गभोगेतयाकुमती । रजोगुणेप्रगटेपै ॥५७॥
शचीचेंरुप आणिगुण । नृपानेंतेव्हांजाणून । कामशरेंगेलामोहून । आज्ञापीतदेवाशी ॥५८॥
म्हणेमज इंद्रकेले । इंद्रासनीबैसविले । शचीसकांन आर्पिले । मजप्रतीदेवानों ॥५९॥
आतांजाउनीसत्वरी । घेऊनयातीसुंदरी । ऐकतांचिदेव अंतरी । भयाभीतजाहले ॥६०॥
शचीतेऐकुनिवृत्त । गुरुशींतेव्हांशरणजात । नहुषजाहलाक्रोधयुक्त । मारीनम्हणेगुरुशी ॥६१॥
देवम्हणतीपुण्यशीला । पावोनिऐशामहत्फळा । कुबुद्धिटाकिजेनृपाळा । त्रिलोकश्रेष्टवरिष्टतूं ॥६२॥
इंद्र असतांजिवंत । अन्यपतीकेवींहोत । परनारीमाजीचित्त । केवींकरिशीपवित्रतूं ॥६३॥
बोलेकृत्रिमदेवपतीं । परोपदेशसर्वकरिती । इंद्रभोगीगौतमसती । गुरुदारेसीचंद्रमा ॥६४॥
बंधूपत्नीबृहस्पती । भोगीमजसांगेनीती । मीनकरिअनीति । इंद्रझालोंआपण ॥६५॥
इंद्राणीनामतियेशी । भोगितामीनिर्दोषी । सत्वर आणातियेशी । क्षेमतेव्हांचितूमचे ॥६६॥
ऐकूनिवाक्यनिष्टूर । देवकरुनीविचार । शचीआणिलीसत्वर । पाहूनिनहुषतुष्टला ॥६७॥
शचीम्हणेतयाशी । शोधकरीनस्वपतीशी । मरणजाणूनितयाशी । वरीनतुजदेवेशा ॥६८॥
स्वस्त असावेंतोंवरी । नहुषमानीवैखरी । परत आलीसुंदरी । गुरुगृहीतेवेळां ॥६९॥
वैकुंठींजाऊनीदेव । स्तविलासर्वानींमाधव । कोठेंगेलावासव । सांगम्हणतीदयाळा ॥७०॥
तयासांनेरमावर । मानसीआहेपुरंदर । अश्वमेधकरुनसत्वर । देवीतोषकरावी ॥७१॥
अंबाहोताप्रसन्न । ब्रम्हहत्यापापदारुण । नासेलनलागतांक्षण । पाडीलमोहेंनहुषाते ॥७२॥
बृहस्पतीसहसर्वसुर । पातलेमानससरोवर । करुनीतेथेंऋतुवर । तोषविलीपरांबा ॥७३॥
हत्येचेकेलेंभागचार । वाटीतेव्हांपुरंदर । वृक्षअग्नीजलनिर्धार । चौथीजाणाकामिनी ॥७४॥
वृक्षाशिवतांसायंकाळीं । ब्रम्हहत्यास्पर्शेबळी । नफुंकितांज्वालमाळी । स्पर्शपात्रींनकीजे ॥७५॥
नहालवितांजल । स्पर्शूनयेकदाकाळ । रजोयुक्ततोविटाळ । नारीस्पर्शनकीजे ॥७६॥
एवंनिष्पापहोऊन । तेथेंचिराहेशचीरमण । देव आलेपरतोन । वृत्तनेणेंनहुषहें ॥७७॥
शचीतेव्हांगुरुपासून । नवाक्षरमंत्रघेऊन । करीदेवीचेंपूजन । प्रत्यक्षझालीदयार्द्रा ॥७८॥
देवीचेंझालेंदर्शन । प्राप्तझालेंवरदान । इंद्राचेलाभेदर्शन । वरप्रसादशचीते ॥७९॥
मगयेउनीनहुषाशी । शचीम्हणेवश्यतुजशी । होईनजरीइच्छितदेशी । अवश्यम्हणेमोहिततो ॥८०॥
शचीम्हणेसर्वेश्वरा । मुनिवाहनीमाझेंघरा । यावेंतुवामनोहरा । हेंतोसहजरावम्हणे ॥८१॥
मगबोलाविलेमहामुनी । नहुषतयानम्रवचनी । म्हणेनेऊनमजशचीसदनी । दयेकरुनीपोंचवावे ॥८२॥
कार्यजरीकठिण । परिभवितव्याजाणून । शिबिकाखांदाघेऊन । नहुषासहचालले ॥८३॥
देवीमायामोहित । रावझालाउन्मत्त । अगस्तीशीपदेंस्पर्शत । कशाहाणीदुष्टतो ॥८४॥
सर्पसर्प ऐसेंबोलत । ऋषिकोपेंशापित । तूंचिसर्पहोयत्वरित । राहेदुष्टावनांतरी ॥८५॥
बहुयुगानंतर । भेटेलतुजयुधिष्ठिर । ऐकूनियाप्रश्नोत्तर । शापमुक्तहोसील ॥८६॥
पावशीलस्वर्गमागुता । एवंवाक्य ऐकता । प्रार्थुनिलोपामुद्राकांता । पडिलासर्पहोऊनी ॥८७॥
नहुषहोतांपदभ्रष्ट । देवझालेसंतुष्ट । पदींस्थापिलासुरश्रेष्ठ । शचीकांतसर्वांनी ॥८८॥
व्यासम्हणेनृपती । एवंजाणकर्मगती । भोगुनिइंद्रमागुती । स्थानपावलाकृपेनें ॥८९॥
दिव्यसुरसदेवीगीत । वृत्राख्यान अतिपुनित । वेदींगाईलेंविस्तृत । पावनकरीऐकतां ॥९०॥
श्रवणपठणलेखन । करितांपापहोयशमन । अंबाकृपेंसंपूण । वांच्छासिद्धीहोतसे ॥९१॥
अठावीसश्लोकतीनशत । वृत्रासुराचेंचरित । देवीकृपेंपुरुहूत । वधीत्यासीछलानें ॥९२॥
देवीविजयेषष्ठेद्वितीयः ॥२॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP