द्वादश स्कंध - अध्याय दुसरा
श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय.
श्रीगणेशायनमः । जनमेजयम्हणेमहामुनी । श्रुतिसंततविप्रालागुनी । गायत्रीसर्वद असूनी । परदेवतांउपास्य ॥१॥
ऐसेंजवळचोंनिधान । बळेंचदिलेंओसंडून । अन्यदैवतेंउपासन । संध्यात्यागकरुनिया ॥२॥
विद्यायुक्तविचक्षण । आहेतजरीब्राम्हण । वेदनिष्ठाझालीहीन । कारणकायअसेंयाचे ॥३॥
सुखनाशकोणीनेइच्छिती । सुखसाधनकांटाकिती । नष्टझालीकर्मप्रीती । बोलतीशुष्कवेदांत ॥४॥
आम्हींवैष्णवझालोंसंत । रामानुजतेम्हणवत । आम्हींवल्लभमाध्वम्हणत । गोपीचंदनफांसिती ॥५॥
टाकोनीवैदिकाचरण । द्वादशीकरितीसाधन । करितीसत्वरभोजन । रविउदय असोनसो ॥६॥
केव्हांसंध्याब्रम्हयज्ञ । होमनित्यश्राद्धतर्पण । वैश्वदेवबळीहरण । करितीकेव्हांनकळेची ॥७॥
तप्तमुद्रासुखेंघेती । बळेंच अंगडागिती । प्रशंसालोकींमिरवती । वैष्णव आम्हींम्हणूनीया ॥८॥
द्वेषकरितीशिवाचा । मनींकंटाळाविष्णूचा । लोपकरितीधर्माचा । शास्त्रवेदजाणुनी ॥९॥
स्मार्तपाहतांचिसभस्म । मनीहोतीक्रोधेंभस्म । नस्पर्शतींकदांभस्म । अंतीभस्मस्वयेंहोती ॥१०॥
आम्हींम्हणतीकापाली । कर्मव्यर्थपडलीभुली । स्वयेंआम्हीज्ञानबली । कैचाआचारम्हणतीते ॥११॥
भस्मफांशितीसर्व अंगी । मंत्रनातंत्रचांगी । होऊनियासर्वांगी । यातिभ्रष्टजाहले ॥१२॥
ज्ञानस्पर्शहीतेथेनसे । सदाक्रोधलागेपिसे । घरोघरीओरडतसे । भिक्षार्थतोभुकेला ॥१३॥
कोणीझालेपीन । कोणीफिरतीनग्न । कोणीवल्कलधारण । चार्वाकजैनकोणीझाले ॥१४॥
याचेंसांगिजेंकारण । मणिद्वीपाचेवर्णन । केवींअसेंदेवीस्थान । मजसांगिजेभक्ताशी ॥१५॥
गुरुहोयजैप्रसन्न । गुह्यसांगेउघडून । मजसीस्वामीकृपाकरुन । विस्तरेशीबोधिजे ॥१६॥
ऐकतांचिऐसेंवचन । क्रमेंवदलाबादरायण । ऐकतांचिहोय उत्पन्न । श्रद्धाजेवींवैदिकीं ॥१७॥
राजापुससीसमयोचित । आहेंसितूदेवीभक्त । ऐकसांगतोसमस्त । प्रश्नोत्तरयथाक्रमें ॥१८॥
एकदांमाजलेअसुर । शक्रादिकींकेलासमर । तयासहशतवत्सर । घोरविस्मयकारक ॥१९॥
पराशक्तिकृपेंकरुन । जयपावलेसुरगण । स्वर्गभूमीटाकून । असुरगेलेपाताळां ॥२०॥
हर्ष आणिअभिमान । देवासीझालाउत्पन्न । करितीपराक्रमवर्णन । परस्परतेवेळीं ॥२१॥
जयकेंविआम्हांनसे । बलीकोण आम्हांसरिसे । पामरदुर्बळराक्षसे । जयकदांनपावतीं ॥२२॥
सृष्टिस्थितिक्षयकर । आम्हीस्वयेंशक्तअमर । कपदार्थतेअसुर । मोहेंएवंग्रासिले ॥२३॥
करावयामोहदूर । अनुग्रहार्थदयापर । प्रगटलीदेवासमोर । यक्षरुपेंजगदंबा ॥२४॥
तेजोमयएकगोळ । दिसेआगीचाकल्लोळ । कोटिसूर्यापरीतेजाळ । ज्वालाकुलसुंदरतें ॥२५॥
असेंतेंअवयवरहित । देवझालेसर्वचकित । कायहेंकायहेंम्हणत । अकस्मातप्रगटलें ॥२६॥
दैत्येंकायमायारचिली । केवींज्योतप्रगटली । विचारुनतयांवेळीं । पुढेंमगयोजना ॥२७॥
सर्वोंकरुनविचार । पावकासांगेसुरेश्वर । तुंदेवमुखनिर्धार । विचारुनयेइजे ॥२८॥
गर्वावेशेंहुताशन । सन्मुखठेलाजाऊन । करावाजवयक्षाप्रश्न । पूर्वींचनिघेशब्दतेथें ॥२९॥
तूंकोणकायनाम । कायतुझापराक्रम । सांगसर्वमजप्रथम । अग्नीबोलेतेधवा ॥३०॥
जातवेदामीहुताशन । क्षणांमाजीविश्वदहन । इच्छितांचिमीकरीन । सर्वांतरीवसेमी ॥३१॥
यक्षांतूनलघुतृण । पडलेंबाहेरयेऊन । यक्षम्हणेकरीदहन । शक्तीजरीतुज असे ॥३२॥
सर्वबळेंहुताशन । जाळूंनशकलाजेव्हांतृण । तेव्हांलज्जितहोऊन । परतगेलाअधोमुखें ॥३३॥
गळालासर्वअभिमान । म्हणेइंद्रामजनसेज्ञान । यक्षतेआहेकोण । वृथाअहंकारअमुचा ॥३४॥
इंद्रेप्रेरिलाप्रभंजन । यक्षबोलेपुर्वप्रमाण । नउडालेजेव्हांतृण । निरभिमानवातझाला ॥३५॥
इंद्रापासीगेलापरत । तोहितैसेंचिसांगत । सर्वदेवांचेऐकुनिमत । गर्वभरेंइंद्रगेला ॥३६॥
येतोपाहूनिसहस्राक्ष । गुप्तझालास्वयेंयक्ष । पाहुनिइंद्रेंअलक्ष । अतिलज्जितजाहला ॥३७॥
गर्वसर्वक्षीणझाला । म्हणेकायसांगूदेवाला । यक्षासीतेव्हांशरणगेला । रुदनकरीतदुःखित ॥३८॥
झालींतेव्हांनभोवाणी । मायबीजएकाग्रमनी । इंद्रात्याचाजपकरुनी । पावसीलदर्शन ॥३९॥
तेथेंच इंद्रबैसला । लक्षवर्षेंजपकेला । तेव्हांचैत्रशुक्लनवमींला । यक्षप्रगटेमध्यान्ही ॥४०॥
त्याचस्थळींप्रगटले । तेजोमंडळशोभले । मध्येंरुपरेखिलें । अतिसुंदर अंबेचे ॥४१॥
नवयौवनासुकुमारी । रुपलावण्याचीलहरी । प्रभाजपाकुसुमापरी । कोटिबाळसूर्यसे ॥४२॥
मुकुटबालचंद्रापरी । स्तनशोभतीवस्त्रांतरी । चारहस्त अभयवरी । पाशांकुशधरियेलें ॥४३॥
कोमलागीसुकुमार । भूषणेंल्यालीसुंदर । नेत्रत्रयमनोहर । वेणीशोभलीरत्नपुष्पें ॥४४॥
चारवेदमूर्तिमंत । चारीदिशेसीस्तवित । दंतच्छटाफांकत । पद्मरागकेलीधरा ॥४५॥
इषन्मात्रहस्यवदन । वोवाळीजेकोटिमदन । रक्तांबरपरिधान । रक्तचंदनचर्चिला ॥४६॥
उमाहिमवतीशिवा । निष्कपटदयेचाठेवा । सर्वकारणपरशिवा । पाहिलीतेव्हांवासवें ॥४७॥
प्रदक्षिणादंडवत । करुनियातिजस्तवित । प्रेमेंमगविचारित । यक्षकायप्रगटले ॥४८॥
किमर्थहेप्रगटले । मजपाहिजेकळलें । कायरुपकेवींझाले । वदेमातेकरुणार्द्रे ॥४९॥
अंबाम्हणेपुरंदरा । रुपमाझेचिनिर्धारा । ब्रम्हहेंचिपरात्परा । सर्वकारणकारण ॥५०॥
सर्ववेदज्यासींगाती । सर्वतपेंज्याचीप्राप्ती । ब्राम्हणयदर्थ आचरती । ब्रम्हचर्यशुद्धत्वें ॥५१॥
तेंचहेंदुर्लभपद । प्राप्तहोतांनासेंविपद । संक्षेपेंवर्णितेंस्रुखद । ऐक इंद्रास्वस्थचित्ते ॥५२॥
प्रणवजोएक अक्षर । ब्रम्हतचिपरात्पर । देवीप्रणवसाचार । मुख्यबीजेदोनही ॥५३॥
भागझालेजेव्हांदोन । जगरचिलेंसंपूर्ण । एकभागब्रम्हनिर्वाण । सचित्घन आनंदतो ॥५४॥
भागदुजाजेअक्षर । मायाप्रकृतिनिर्धार । पराशक्तीमीचसाचार । प्रभाजेवीचंद्राची ॥५५॥
प्रलयींहोयएक । सृष्टीसमईंअनेक । जोझालाअंतर्मुख । तयाएकमीब्रम्ह ॥५६॥
तोचिआत्माबहिर्मुख । तमरजसत्वनामक । ब्रम्हाविष्णुशिवात्मक । स्थूलसूक्ष्मकारणें ॥५७॥
मायाहीननिर्गुण । मायावानतोचिसगुण । सगुण आणिनिगुण । मीचएकजाणिजे ॥५८॥
माझेनियोगेंकरुन । जिंकिलेतिअसुरगण । अहंकारेंनाडलापूर्ण । अनुग्रहार्थप्रगटलें ॥५९॥
मन्निष्ट आणिमत्पर । भावनाकरुनसुंदर । वर्तावेंतुम्हींइतःपर । वृथागर्वनकीजे ॥६०॥
व्यासम्हणेनृपती । सर्वदेवतिजलानमती । गुप्तझालीपरंज्योती । सर्वदेवस्रुखावले ॥६१॥
तेवेळींसर्वब्राम्हण । सदाकरितीसदाचरण । गायत्रीचेंआराधन । कदाकाळींनटाकिती ॥६२॥
गौतमशापेंकरुन । भ्रष्टझालेब्राम्हण । तोइतिहासवर्णन । करितोआतांजन्मेजया ॥६३॥
अष्टऊनएकशत । यक्षचरित अदभुत । येथेंवर्णिलेंसुरसगीत । श्रवणेप्राप्तसर्वसिद्धी ॥६४॥
श्रीदेवीविजयेद्वादशेद्वितीयः ॥२॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP