द्वादश स्कंध - अध्याय पांचवा
श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय.
शुभंभवतु ।
श्रीगणेशायनमः । व्यासम्हणेभारतासी । पुढेसालपद्मरागेसी । दशयोजन उंचीत्याशी । गोपुरद्वारयुक्तो ॥१॥
त्याकोटाचेअंतरी । चौसष्टलोक अतिसुंदरी । चौसष्ट्योगिनीमनोहरी । राहतीतेथेंससैन्य ॥२॥
पिंगलाक्षीप्रथमजाण । विशालाक्षीअसेशोभन । समृद्धीवृद्धीश्रद्धाजाण । स्वाहास्वधासातवी ॥३॥
मायासंज्ञावसुंधरा । त्रिलोकधात्रीतीअकरा । सावित्रीगायत्रीतेरा । त्रिदशेश्वरीचौदावी ॥४॥
सुरुपाबहुरुपास्कंदमाता । अच्युतप्रियाअसेशांता । विमलाविसावीतत्वता । अमलारुणीपुनरारुणी ॥५॥
प्रकृतीविकृतीसृष्टिस्थिती । संह्रतीसंध्यामातासती । मर्दिकावज्रिकापराभूपती । पस्तिसावीदेवमाता ॥६॥
भगवतीदेवकीकमलासना । त्रिमुखीसप्तमुखीजाणा । सुरासुरविमर्दना । बेचाळिसावीलंबोष्ठी ॥७॥
उर्ध्वकेशीत्रेचाळीस । बहुशीर्षाजाणपुढलीस । वृकोदरीरथरेखेस । शशिरेखागगनवेगा ॥८॥
पवनवेगाभुवनपाली । मदनातुरापुढेंबोली । अनंगाअनंगमथनाझाली । अनंगमेखलाचौपन्न ॥९॥
अनंगकुसुमाविश्वरुपिणी । असुरादिकांक्षयकारिणी । अक्षोभ्यासत्यवादिनी । बहुरुपाशुचिव्रता ॥१०॥
उदाराआणिवागीश्वरी । चतुःषष्टीयोगिनीश्वरी । ज्वालास्फुलिंगफूत्कारी । सर्वशस्त्रेंविराजित ॥११॥
शत अक्षौहिणीसैन्य । पृथक्पृथकशक्तिजन्य । लक्षब्रम्हांडभक्षण । एकशक्तीकरुशके ॥१२॥
रथतुरंग आणिहस्ती । शस्त्रेंअस्त्रेंमहाद्युति । असंख्यांततेथेंअसती । वर्णनकोणकरुंशके ॥१३॥
पुढेंगोमेदरत्नप्राकार । पृर्वसमसमाकार । कुंकुंमपंकसुंदर । तेवींभूमितेथीची ॥१४॥
तेथेंगृहेंमंडपतोरणे । सर्वगोमेदमयजाणे । बत्तीस असतीशक्तीभुवनें । राहतींतेथेंमहाशक्त्या ॥१५॥
सेनातयाचीपूर्ववत । नामेंतयाचीएकचित्त । ऐकरजापापनासत । श्रवणमात्रेजयांच्या ॥१६॥
विद्याहीपुष्ठिप्रज्ञा । सिनीवालीकुहूजाणा । रुद्रवीयासप्तगणना । प्रभानंदापोषिणी ॥१७॥
ऋद्धिदाशुभाकालरात्री । तेरावीतीमहारात्री । भद्रकालीरिपुहंत्री । कपर्दिनीपंधरावी ॥१८॥
विकृतिदंडीनीमुंडिनी । सेदुखंडाशिखंडिनी । निशुंभशुंभमथनी । मर्दिनीमहिषासुरा ॥१९॥
इंद्राणीतैसीरुद्राणी । शंकरार्धशरीरिणी । नारीआणिनारायणी । त्रिशूंलिनीपालिका ॥२०॥
अंबिकाआणिल्हादिनी । शक्त्याजाणगुणखाणी । कोपतांचिब्रम्हांडहानी । पराजययांचानसे ॥२१॥
पुढेंवज्रमणिप्राकार । पूर्वसमसर्व आकार । आंतामोठेंवसेंनगर । अतिशोभितसाजिरें ॥२२॥
श्रीदेवीपरिचारिका । राहतीतेथेंअनेका । लक्षलक्षएकएका । दासीअसतीसुंदरी ॥२३॥
इकडेंतिकडेंजेव्हांफिरती । विद्युल्लतेपरीझळकती । नानापदार्थत्यांचेहाती । नानाकृतीकुशलत्या ॥२४॥
कोणीपंखाकोणीचषक । विडाकोणीछत्रक । चामरकोणीपीठक । वस्त्रालंकारमाळादी ॥२५॥
चित्ररचनकाणाचतुर । कोणीकरीसुमनहार । कोणीरचितींअलंकार । अनेकचातुर्यतयांचे ॥२६॥
अनंगरुपाअनंगमदना । सुंदरीआतुरदमना । भुवनवेगापांचवीजाणा । भुवनपालिकासहावी ॥२७॥
सर्वशिशिराअनंगवेदना । अनंगमेखलादिनाना । करितींदेवीसेवना । देवीरुपात्यास्वयें ॥२८॥
पुढेंवैडूर्यनिर्मित । साल असेंबहुकांत । सममानेंशोभत । भुम्यादिकसर्वतैसें ॥२९॥
ब्राम्हीमाहेश्वरीकौमारी । वैष्णवीकोलापुरंदरी । चामुंडीलक्ष्मासुंदरी । राहतीतेथेंआठह्या ॥३०॥
ह्यासमष्टीरुपजाणिजे । सर्वब्रम्हांडेंव्याष्टिजे । त्यासर्वाचेकार्यकीजे । कल्याणकारकवर्णिल्या ॥३१॥
ह्याप्राकारद्वारी । वाहनेंअंबेचीसारी । हंसगरुडकेसरी । गजतुरंगरथादी ॥३२॥
कोटिशःचित्रविमानें । तैसीरथादियानें । शिबिकाआणिखुलीयानें । अनुपम्यकोटिशः ॥३३॥
वाद्येंतैसीचमनोहर । वाजतीतेथेंअपार । ऐकतांत्यांचासुस्वर । मोहितहोयमदनारी ॥३४॥
पुढेंतैसाचिसाल । मणीत्यासीइंद्रनील । भूम्यादिसर्वनील । समाकारजाणिजे ॥३५॥
तयांमध्येंएककमल । बहुयोजनेंषोडशदल । पत्रींपत्रींअतिनिर्मल । स्थानेंअसतीदेवींची ॥३६॥
कालीविकरालीदोन । उमासरस्वतीदोन । श्रीदुर्गारमाउषातीन । लक्ष्मीश्रुतीस्मृतीधृती ॥३७॥
श्रद्धामेघामतीकांती । आर्याऐशासोळाहोतीं । प्रत्येकस्थलीराहती । सर्वनायिकाजाणिजे ॥३८॥
पुढेंमौक्तिकप्राकार । पूर्ववतसर्व आकार । अष्ठदलतेथेंथोर । अष्टशक्त्याराहती ॥३९॥
सर्वप्राणीसमाचार । अंबेसिकथितिनिरंतर । ज्ञानयांचेमहाथोर । तत्वज्ञानप्रदाह्या ॥४०॥
पाशांकुश अभयवर । चतुर्भुजमनोहर । नामेंत्यांचीशुचिकर । श्रवणकरीनृपाळा ॥४१॥
अनंगकुसुमाप्रथम । अनंगकुसुमातुरानाम । अनंगमदनाउत्तम । अनंगमदनातुरा ॥४२॥
भुवनपालागगनवेगा । शशिरेखागगमरेखा । आठजेवीहल्लेखा । अंबेसहराहती ॥४३॥
पुढेंसालमरकत । सर्वजाणपूर्ववत । षटकोणतेथेंअसत । देवतांऐकसांगतो ॥४४॥
पूर्वीकोणीचतुरान । गायत्रीसहविराजमानन । कुंडिकाआणिअक्षगुण । अभयदंडधरीलासे ॥४५॥
वेदस्मृतीपुराणें । विधिविग्रहजेणें । नांदतीतेथेंसर्वगुणें । रक्षकोणीसावित्री ॥४६॥
शंखचक्रगदाधर । सगणतेथेंकमलधर । वायुकोणीशंकर । सगणतैसीसरस्वती ॥४७॥
परशुअक्ष अभयवर । शंकराचेचारकर । दक्षिणामूर्तिसर्वेश्वर । गौरीतेथेंविराजे ॥४८॥
अग्निकोणीतोकुबेर । मणिकरंडकुंभधर । सगणलक्षीसुंदर । धनदतेथेंअंबेचा ॥४९॥
पश्चिमेसिरतीमदन । पाशांकुशधनुर्बाण । विराजेतोहीसगण । वसंतादियुक्ततो ॥५०॥
इशान्येशींगणपती । पाशांकुशधरमूर्ति । पुष्टीसर्व असती । गणतेथेंतयाचे ॥५१॥
पुढेंप्रवालाचासाल । शतयोजनविशाल । आणीकसमतोल । भूम्यादिकजाणिजे ॥५२॥
पंचभूतांच्यास्वामिनी । राहतीतेथेंपांचजणी । हल्लेखागगनारक्तिणी । करालिकामहोछुष्मा ॥५३॥
रुपेंआयुधेंशोभन । सर्वयांचेअंबेसमान । पुढेंसालनवरत्न । बहुयोजन उचतो ॥५४॥
तेथेंआम्नायदैवतें । देवीअवतारदैवतें । अनंत असतींतेथें । सप्तकोटीमहामंत्र ॥५५॥
पुढेंचिंतामणीमंदिर । सूर्योदगारचंद्रोदगार । पाषाणतेथेंविद्युदगार । वस्तुमात्रतैसेंची ॥५६॥
दशश्लोकएकशत । श्रीपुरवर्णनहोत । अंबावदलीप्राकृत । मूढजनांकळावया ॥५७॥
श्रीदेवीविजयेद्वादशेपंचमः ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP