द्वादश स्कंध - अध्याय सहावा

श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय.


श्रीगणेशायनमः । हेंचिदेवीमंदिर । सहस्रस्तंभींमंडपचार । एकांतज्ञानमुक्तिशृंगार । चारनांवेंचौघांची ॥१॥

अनेकशोभातोरण । अनेकरंगचित्ररचना । सभोंवतेकाश्मीरवन । कोटीसूर्यप्रभाज्याची ॥२॥

मल्लिकामालतीवन । कस्तूरीनिर्झरपावन । कमलांचेमोठेंअरण्य । रत्नसोपानसरोवरीं ॥३॥

सुधारसतेथेंवारी । पद्मींपद्मींभ्रमरहारीं । हंसकारंडवतीरीं । सारसकरितीसुशब्द ॥४॥

शृंगारमंडपीगायन । सुरसकरितीदेवीजन । मध्येंदेवीसिंहासन । विलासार्थतेथेंअसे ॥५॥

ज्ञानमंडपींदेईज्ञान । भक्तांचेकरीमोचन । मुक्तिमंडपींबैसून । एकांतमंडपींजातसें ॥६॥

मंत्रिणीसहविचार । तेथेंकरीसाचार । मुख्यचिंतामणीमंदिर । मंचकतेथेंविराजे ॥७॥

ब्रम्हविष्णुरुद्रईश्वर । मंचकाचेचारखुर । सदाशिवमांचवासुंदर । शिडयादहाचढावया ॥८॥

तयावरीभुवनेश्वर । बैसलासेकामेश्वर । जीलीलार्थमनोहर । द्विधारुप अंबेचें ॥९॥

कोटिकंदर्पसुंदर । पंचमुखमनोहर । त्रिनेत्र अतिसुंदर । नानाभरणेंलेइली ॥१०॥

हरिणाभयपरशूवर । षोडशवयसर्वेश्वर । कोटिसूर्यदीप्तिकर । शुद्धस्फटिककांतजो ॥११॥

तयाचेंवामांकावरीं । स्वयेबैसेभुवनेश्वरी । श्रीमतीतीपरमसुंदरी । सर्वांभरणाभूषिता ॥१२॥

अनेकसख्यातेथेंअसती । इच्छाज्ञानक्रियाशक्ति । लज्जापुष्टीतुष्टीकीर्ति । कांतीबुद्धीदयाक्षमा ॥१३॥

मेधास्मृतीलक्ष्मीजया । अजितापराजिताविजया । विलासिनीदोग्ध्रीनित्या । अघोरामंगलानवा ॥१४॥

पीठशक्त्याह्याअसती । शंखपद्मनिधीशोभती । तयापासूननद्यानिघती । मिळतीसुधासमुद्रा ॥१५॥

सहस्रयोजनविस्तार । चिंतामणिमंदिर । सालएकतदुत्तर । अतिउंचविराजे ॥१६॥

त्याचीहोतसेघडी । तेचिजगांघडामोडी । देवीभक्तापरवडी । वासतेथेंमिळतसे ॥१७॥

स्वभासाचिहेंभासे । सूर्यचंद्रतेथेंकैसें । लाजतीतेतत्प्रकाशे । प्रकाशज्याचाजगांत ॥१८॥

हेंश्रीपुरवर्णन । जोकरीलपठणश्रवण । अथवाकरीललेखन । तोहीजाईलतेथेंची ॥१९॥

त्र्याहत्तरश्लोकभागवत । श्रीपुरातेंवर्णित । तेंचयेथेंसारभूत । अंबाकृपेंबोलिलीं ॥२०॥

श्रीदेवीविजयेद्वादशेषष्ठः ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP