द्वादश स्कंध - अध्याय आठवा
श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय.
श्रीगणेशायनमः । दक्षिणसागराचेंतीरी । दिव्यक्षेत्रशुचींद्रपुरी । ज्ञानारंण्यामाझारी । तपकरीपुरहर ॥१॥
स्थाणुनामासर्वेश्वर । दिव्यलिंगमनोहर । ब्रम्हविष्णुशिवाकार । मुर्तित्रयएकरुपें ॥२॥
सगुण अथवानिर्गुण । कोणजाणेयाचीखूण । स्वयेंस्वयंभुनिर्वाण । केरलीशोभनपरमात्मा ॥३॥
नित्यजयामध्यनिशीं । शक्रपूजितोभक्तीशी । अहल्याजारदोषाशीं । नाशिलेज्याच्यामहेश्वरें ॥४॥
सन्मुखजयाचेमहातरु । युगींयुगीरुपांतरुं । अश्वथ्थतुलसीबिल्वथोरु । राजवृक्षयायुगीं ॥५॥
पूर्वभागींसिद्धाचल । अनेक औषधीनिर्मल । हिंस्त्रजंतुकिंवाव्याल । नसतीवरीरंम्यतो ॥६॥
आग्नेयकोणीसिंधुतटीं । कन्याबाउभीगोमटी । रुपलावण्यातुळवटी । नाहींनाहींजियेच्या ॥७॥
दक्षिणेसींमधुसूदन । चतुर्भूजनारायण । ओवाळिजेकोटिमदन । मुखावरुनिजयाच्या ॥८॥
पश्चिमेसींअत्र्याश्रम । मनोहर असेंग्राम । विप्रसमाज उत्तम । वैदिकांचाशोभतसे ॥९॥
उत्तरेसींअतिपावन । प्रज्ञातीर्थअसेंशोभन । जयाचेकरितांस्नान । स्थीरताहोतबुद्धिसीं ॥१०॥
विक्रमाचीराजधानी । विख्यातजीउज्जयिनी । तेथूनकालिकाभवानी । आलीयेथेंप्रत्यक्ष ॥११॥
प्रत्ययदेउनीजनां । रक्षीतसेयास्थानां । भावेंकरितीपूजना । लोकजिच्यासाक्षेपें ॥१२॥
कौशिकगोत्रविष्णुनंदन । परशुरामानामेंब्राम्हण । ब्रम्हावर्तजन्मस्थान । मातारुक्मिणीजयाची ॥१३॥
याचाकेलास्वीकार । भारद्वाजकमलाकर । सावित्रीमातानिर्धार । केलेंपालनविधीनें ॥१४॥
प्रारब्धयोगेंकरितांभ्रमण । सहजलाधलेंनिधान । होतांदेवत्रयदर्शन । रमलेंमनयास्थळी ॥१५॥
सेविलासुखेंपर्वत । लाधलेंश्रीमतभागवत । अंबाचरित्र अदभुत । रंगलेंमनदेवीकृपें ॥१६॥
तेथेंबसवूनएकांती । परांबाप्रेरीवाचेप्रती । सारार्थजोभागवती । प्राकृतेंस्वयेंउकलिला ॥१७॥
वक्ताश्रोतालेखक । स्वयेंनटलीसंम्यक । परिसोतभोळेभावुक । तरोतसहजम्हणूनी ॥१८॥
षण्मासकरुनिव्रत । ग्रंथकरीसमाप्त । अक्षयय्यतृतीयामुहूर्त । अक्षय्यार्थसाधिला ॥१९॥
शालिवाहनशकवत्सर । आठराशेतेरानामखर । माधवतीजसोमवार । मृगऋक्षीपूर्णझाला ॥२०॥
ग्रंथहेंचिअमृतफळ । मधुररुचिररसाळ । सेवितीलजेप्रेमळ । नित्यतृप्तहोतीलते ॥२१॥
शोकमोहादिरोगप्रबळ । नासतीत्यांचेंतत्काळ । मृत्यूसीसुटेलपळ । भयपळेलभयानें ॥२२॥
ग्रंथ अध्यायशतक । विचित्रदेवीकौतुक । भाविकांसीभातूक । आशाभुकशमनहें ॥२३॥
ग्रंथरुपेंहाशूल । संशयदैत्यांशींसमूल । मननकरितांनाशील । सूर्यजेवींतमाते ॥२४॥
ग्रंथवज्रघेतांहाती । कामादिशत्रूकांपती । सामोरेकदांनठाकती । शरणयेतीसर्वस्वें ॥२५॥
देवीविजयपाश । बांधीवेगेंमानस । नासूनजायभवपाश । मुक्तकरीभाविकां ॥२६॥
हातीघेतांग्रंथांकुश । मनोगजराहेवश । स्वयेंहोवोनिसर्वेश । विहरेभक्त अंबेचा ॥२७॥
ग्रंथहेचिधनुर्बाण । एकाग्रकारतांभक्तेंठाण । करुनियालक्ष्यभेदन । अवलक्ष्यलाभेसुखावें ॥२८॥
ग्रंथहाचिदेवतरु । भक्त इच्छादानकरु । शिवापरीहाउदारु । आश्रयानेंओळखिजे ॥२९॥
ग्रंथहेचिगंगाजल । प्राशितांनिर्मलशीतल । तापत्रयांशीतत्काळ । शमनकरीनिश्चियें ॥३०॥
ग्रंथहाचिसुधासिंधु । देवीगीतापूर्ण इंदू । लाधेजईंबोधांमृतबिंदु । मृत्युभयमगकैचें ॥३१॥
शताघ्यायदिव्यकिरण । उगवतांसुर्यनारायण । दीर्घरात्रींजेंअज्ञान । समूळनाशहोतसे ॥३२॥
देवीविजयग्रंथ । मोक्षपुरीचामहापंथ । भक्तिज्ञानविश्वासयेथ । अवश्यलाभेपांथासी ॥३३॥
नवरात्रींकीजेव्रत । ब्रम्हचर्यवाचासत्य । अन्न आहारवर्जित । नित्यकर्मसर्वकिजे ॥३४॥
प्रथमदिवसींस्कंददोन । एकएकसप्तदिन । दशमादिसंपूर्ण । नवमीसपठनकीजे ॥३५॥
करुनीघटस्थापन । पूजाकीजेविधीन । दशमीस उद्वासन । करुनकीजेपारणा ॥३६॥
एवंकरितांआनुष्ठान । सर्वकामनेंचेंसाधन । भोगमोक्षादिनिधान । देवीकृपेंसांपडे ॥३७॥
भावबळेंभक्तजरी । नित्यपठनकरी । उणेंनाहींसंसारीं । एकमायसेवितां ॥३८॥
गातांचरित्रसोज्वळ । मनहोतसेंनिर्मळ । पापबुद्धितात्काळ । नासूनजायविवेकें ॥३९॥
मग आवडेंसदाचरण । उपजेंभक्तिआणिज्ञान । शमदमादिसाधन । सहजघडोंयेतसें ॥४०॥
कामक्रोधाचेंविंदाण । कळेंग्रंथकेलियापठण । अहंकारजायगळून । कर्तृत्वाचानिःशेषें ॥४१॥
शुद्धहोयतेणेंबुद्धी । सहजगळेउपाधी । संसारघोरमहोदधी । गोष्पदतुल्यहोतसे ॥४२॥
ऐसेंयाग्रंथाचेवचन । वेदांचेंतत्वविवेचन । भवभयाचेंमोचन । उपायसुलभजाणिजे ॥४३॥
विद्यायश आणिधन । त्रैवर्गिकांसींलाभेपूर्ण । शूद्राचेंमनोनुसंधान । देवीपडींजडेलपै ॥४४॥
याग्रंथाचेंमहिमान । कोणकरीलवर्णन । अंबुधीचेपैलगमन । केवींकोणीकरुंशके ॥४५॥
विश्वासजरीदृढ असे । तरीइच्छिलेंचिदेतसे । अनुभवेंचिकळतसे । कर्त्यांसीजाणासर्वदा ॥४६॥
एवंइच्छीतदाभवानी । ध्येइजेतींह्रदयभुवनी । मनकमलींबैस उनी । मानसोपचारेंपूजिजे ॥४७॥
तुरीयाजीवृत्ति । तिच अंबापरंज्योती । आसनकरितांमनांप्रती । सहजचीस्थिरावें ॥४८॥
वृत्तीहीचपरदेवता । गुणागुणासर्वमाता । वासनाहींअधिदेवता । नामजीयेचेंमंत्रिणी ॥४९॥
भ्रांतिदुजीदंडिणी । प्रत्यधिदेवीमोहिनी । जन्ममृत्यूजीपासूनी । प्रकटहोय उगाची ॥५०॥
अनेकहोतीकल्पना । परिवारदेवीह्याजाणा । देहचक्रीकीजेस्थापना । पूजनकरितांनबाधीती ॥५१॥
देहश्रीचक्रसुंदर । मंचककल्पिजेमनोहर । तयाचेजेखुरचार । सांगेन ऐकासदभक्त ॥५२॥
प्रथमजाणारजोगुण । दृढखूरब्रम्हाआपण । द्वितीयदेखणानारायण । सत्वगुणओळखावा ॥५३॥
रुद्रजाणिजेतृतीय । तमहाचीतिसरापाय । चौथामिश्रसदाशिव । तोजाणिजेभक्तजनीं ॥५४॥
पुरुषार्थचारीमांचवे । आशानिवारेविणावें । मच्छरदानेंशोभवावें । सचातुर्य उद्योग ॥५५॥
हंसतूलाच आस्तरण । शुद्धसत्वधराखूण । अहंकारब्रम्ह अनुभवण । कामेश्वरयेथींचा ॥५६॥
अंबात्याचेअंकावरी । सूक्ष्मत्वेंतीसुकुमारी । निश्चलत्वेंअतिसुंदरी । कुंकुमवर्णवस्तुत्वें ॥५७॥
अहंकृतीचाशोभेपाश । चित्ताचाचयेथेंअंकुश । बुद्धिइक्षुचेंधनुष्य । कुसुमशरमनहेंची ॥५८॥
एवंहीपरदेवता । मानोसोपचारेंपूजितां । भोगमोक्षाचीएकता । अनुभवासयेतसे ॥५९॥
यावृत्तीचीओळखण । तेचिईचेंआवाहन । निश्चलकीजेजैंमन । आसनहेंचतियेचें ॥६०॥
वृत्तीचेंजेंमनन । देवतेचेंतेंचीध्यान । बुद्धीचेजेमलशोधन । पाद्यकरावेंअंबेसी ॥६१॥
बुद्धींतजोशुद्धविचार । तोचअर्ध्यमनोहर । आचमनअतिसुंदर । सहिष्णुतामानसी ॥६२॥
कुसंकल्पाचेनिरसन । तेंचइचेंजलस्नान । मगपंचामृतस्नान । पंचविषयनिरिच्छता ॥६३॥
बुद्धीनेंजेंसदाचरण । तेंचदंतगपूजन । सहजजेंवर्तन । निरांजनअर्पिजे ॥६४॥
कल्पनेचेंनिरसन । तेनिर्माल्यविसर्जन । शुद्धबुद्धीचेंमनन । गंगोदकनिर्मलतें ॥६५॥
सततजोशास्त्रविचार । तीचयेथेंसंततधार । अभिषेकहानिरंतर । स्वाध्यायसूक्तेंकरावा ॥६६॥
एकाग्रकीजेधारणा । तेंचशंखोदकजाणा । सोहशब्दाचीखुणा । घंटानादजाणिजे ॥६७॥
शुन्यांतहोणेंलीन । हेंदेवतास्थापन । स्वसुखाचेआवरण । परिधानवस्त्रतियेचें ॥६८॥
शांतीचीघट्टकंचुकी । क्षमेचापदरझांकी । दुर्विचारमनटाकी । उपवस्त्रतेंचिपै ॥६९॥
तळमळींचेंआचमन । विश्वासाचेचंदन । कुंकुमतिलकजाण । यदृच्छालाभाचा ॥७०॥
भवजालसंभ्रम । हाचिअर्पिजेयक्षकर्दम । अज्ञानध्वांतपरम । अंजननेत्रींघालावें ॥७१॥
अनेकचमत्कृत आचार । तेचतुःषष्ठ्युपचार । पुष्पेंअतिमनोहर । नामोच्चरवाचेचे ॥७२॥
नवचक्रेंनवद्वारें । देवतांतेथेंसपरिवारे । प्राप्तविषय उपचारें । नवावरणेंअर्पावीं ॥७३॥
पंचतत्वेंपंचमकार । अर्पूनव्हावेंतदाकार । सुवासनासुगंधथोर । धुपजाळुंतियेपुढें ॥७४॥
वस्तुज्ञान उजळूंदीप । सर्वभोगजेअमूप । नैवेद्यठेऊंसमीप । पंचप्राणप्राणाहुती ॥७५॥
आतृप्तजेंभोजन । तेंचिनैवद्य अर्पण । तृप्तीसुखजेंमाझें ॥७६॥
दृश्यरुपहेंसकळ । ब्रम्हचभासेंकेवळ । रंगलामुखीतांबूल । वृंत्तीरुपदेवीचे ॥७७॥
नवप्राणनवार्तीं । प्राणहाकर्पुरज्योती । जीवहाचीचित् ज्योती । कुलदीपप्रकाशूं ॥७८॥
इंद्रियांचेव्यापार । तोचिहोमसाचार । ज्ञानाग्नींमाझीनिर्धार । एकमनेंकरावा ॥७९॥
क्रोधपशुदेऊंबळी । विचारशस्त्रेंअंबेजवळी । तयाचेमगशिरकमळीं । कामकर्पूरपेटऊं ॥८०॥
तयाप्रकाशाचेसरी । पाहूंस्वरुपसुखलहरी । आनंदाचेनिर्भरी । स्तवनकरुंअलौकिक ॥८१॥
अनिर्वाच्यजीपदवी । वाचाकेवींतयास्तवी । मनहीजेथेनपवीं । कैसेंआतांस्तवावे ॥८२॥
स्तवावेंऐसेंवाटे । हेंचिपाहूकोठेंउमटे । पाहतांतोंमीचभेटे । मजलागीमाझ्यांत ॥८३॥
मीचएक उर्वरींत । मजवांचूननसेकिंचित । मीस्वयेंअद्वैत । द्वैतमीचसर्वत्र ॥८४॥
मीच आत्मास्वयंज्योती । मीचपुरुषप्रकृति । मीच आकृतिविकृती । अविद्याविद्यामीच असे ॥८५॥
मीचमहदहंकार । तमावरणमीचसाचार । आकाश आणिसमीर । मीचपावकजाहलो ॥८६॥
मीचवारीआणिधरा । शब्दस्पर्शमीचखरा । रुपरसगंधसारा । मीचझालोंगुणत्रय ॥८७॥
रजोगुणीमीचविधी । इच्छामीचतयामधीं । सत्पत्तीचेकार्यसाधी । माझामीचजगत्कर्ता ॥८८॥
सत्वगुणीमीहरी । ज्ञानशक्तीमीमाझारी । मीचमाझेंपालनकरी । मीचएकसर्वभर्ता ॥८९॥
तमोगुणीमीचहर । क्रियामीचनिर्धार । मीचमाझासंहार । लीलामात्रेंकरीतसे ॥९०॥
पूर्वीमीचझालोंपरा । पश्यंतीमीच अवधारा । मध्यमामीचविस्तारा । वैखरींरुपेंपावलों ॥९१॥
मीचप्रणवजाहलों । पंचदेवमीनटलो । पंचाशद्वर्णझालों । मीझालोंदेवीप्रणवा ॥९२॥
पंचरुपेंमीचप्रकृती । गायत्रीमीचव्याह्रंती । वेदशास्त्रेंमीचस्मृती । पुराणेमीचसर्वभाषा ॥९३॥
मीचयज्ञेश्वर । मीचप्राणप्राणेश्वर । मीच अव्यक्तसर्वेश्वर । व्यक्तमीचसर्वत्र ॥९४॥
पांचाचेंपंचीकरण । मीचकेलेमिश्रण । दशेंद्रियाचागण । तद्देवतांझालोंमी ॥९५॥
देवराक्षस असुर । यक्षचारणकिन्नर । गंधर्वपुरुषविद्याधर । अप्सरागणमीचझालों ॥९६॥
मनुष्यसर्पभूतगण । चतुर्धाजंगम आपण । वृक्षऔशधीपाषाण । तस्तुमात्रमीच असे ॥९७॥
जड आणिचैतन्य । मजहूनकोठेंअन्य । मीचसर्वत्रमान्य । सेव्यसेवकमीच असे ॥९८॥
शक्तीआणिशक्त । मीच असेंव्यक्ताव्यक्त । मीचसेवकमीचभक्त । शक्तीशिवएकमी ॥९९॥
मीजमजकल्पिलें । मीचपुन्हांमजगिळिलें । एकलामीचकल्पांती ॥१००॥
ऐसामीसर्वेश्वर । आत्मामीकामेश्वर । भुवनेशीशक्तीअंकावर । माझेंमीचघेतली ॥१०१॥
शक्तीसहमीईश्वर । पृथकत्वेंमीनिराकार । एकत्वेंहीनिर्विकार । आश्चर्यकरमाझामी ॥१०२॥
शक्तीशींजेव्हांभिन्न । रुपेंकरितांमीदोन । तैचहेंसर्वनिर्माण । व्यक्तझालोंमीचप्रपंची ॥१०३॥
शक्तीसींजेव्हांअभिन्न । अव्यक्ततेव्हांचिदघन । एवंमाझेंमीचस्तवन । करणेंकेवीं ॥१०४॥
ऐसाठसणेंविचार । हाश्रीगुरुउपकार । अंबेहूनिगुरुथोर । जेणेंनिजरुओपिले ॥१०५॥
श्रीगुरुशींम्हणूशंकर । तरीसांम्यतानेनेहर । भक्तवरदशत्रूहर । भेदकार्यतयाचे ॥१०६॥
ऐसानसेसदगुरु । सुष्टादुष्टाचेहेंतारुं । दर्शनमात्रेंपरात्परु । प्राप्तहोयसर्वासी ॥१०७॥
विष्णुम्हणूश्रीगुरुशी । तोनतुळेउपमेसी । निरिच्छ आवडेतयासी । आवडनिवडनसेयेथें ॥१०८॥
विरंचिसमम्हणोकेवी । तोकर्मभोगदाखवी । मित्र आयुष्यहरवी । तो उपमेसीअयोग्य ॥१०९॥
कामधेनुकल्पतरु । परिसकेवींउपमाकरुं । एसामाझाश्रीगुरु । स्वस्वरुपदेतसे ॥११०॥
अनुपम्यहीगुरुमूर्ति । स्वयेंहाचत्रिमूर्त्रि । शक्तीमानहाच अमूर्ति । नमितांयाशीसर्वनमिले ॥१११॥
देवीविजयग्रंथसुंदर । फलश्रुतीचाविस्तार । आत्मपूजेचाप्रकार । वर्णिलायेथेंअंबेनें ॥११२॥
श्रीदेवीविजयेद्वादशस्कंदेअष्टमोऽध्यायः समाप्तः ॥८॥
शुभंभवतु ॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP