द्वादश स्कंध - अध्याय नववा

श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय.


श्रीगणेशायनमः । उत्तरार्धाचेंवर्णन । ऐकाआतांमणिबंधन । मगकरुंअंबेस्तवन । कृपार्णवशेवटीं ॥१॥

सप्तमस्कंप्रथमसमास । एकचिअसेंदोघांस । वर्णिलेंराजवंशास । अठ्याहत्तरओंव्यानी ॥२॥

च्यवनसुकन्याचरित । दस्त्रकेलेंसोमपीथ । सहाअध्येसंस्कृत । प्राकृताचेदोनपै ॥३॥

त्र्याणवओंवीदुसर्‍याची । एकसष्टजाणातिसर्‍याची । चार आणिदोहोची । पृथकमांडणीझालीसें ॥४॥

संस्कृत अध्येतीनसात । दोन अध्येंत्रिशंकुचरित । ओंव्यापंच्यांशींएकांत । एकशेंबेचाळीसदुजाच्या ॥५॥

हरिश्चंद्राचेचरित । तीन अध्येविजयांत । दहाअसेंभागवत । तीनशेंनव्वदओंव्यानी ॥६॥

शताक्षीचेंचरित्र । एकाध्यायपवित्र । शाहत्तरओव्याविचित्र । वर्णन असेंअंबेचे ॥७॥

दाक्षायणीचेंआख्यान । दोन अध्येपीठवर्णन । एकशेंसोळाओंव्यान । नवमाध्यायविजयाचा ॥८॥

पार्वतीउदभवदेवीगीता । बाराअध्येभागवता । चारसमासेपूर्तता । पांचशेंतेराओंव्यानी ॥९॥

सप्तमस्कंदभागवत । चाळीस अध्येदेवीगीत । शेचाळीआणिदोनशत । दोनसहस्रसुपद्यें ॥१०॥

देवीविजयपावन । तेराअध्येगायन । चौदाशेंअडतीसओंव्यान । करीउघडपरांबा ॥११॥

आठव्यांतील अध्येचार । त्यांचाएकमनोहर । मनुचरितवराहावतार । चवर्‍याहत्तरओंवींवर्णिला ॥१२॥

भूगोल आणिखगोल । वीस अध्येवर्णिलेबोल । तीन अध्येओंव्याबोल । दोनशेंअठ्ठावनपरांबा ॥१३॥

चोवीस अध्येस्कंद अष्टम । आठशेंचाळीसपद्योत्तम । तीनशेंबावीसमनोरम । ओव्यासमासवेदसंख्या ॥१४॥

नवमाचाजोप्रथम । दोघांचाहींअसेसम । ब्यांणवओंव्याउत्तम । अवतरणप्रकृतीचें ॥१५॥

साठ अध्येभागवत । गंगादिशापवर्णित । नवमाचेदुसर्‍यांत । एकुणनव्वदओंव्यानीं ॥१६॥

तीन अध्येभूमिचरित । तिसर्‍याचेअसतीसंस्कृत । अडुसष्टओंव्याहोत । विजयाच्यासंक्षेपें ॥१७॥

चार अध्येगंगाख्यान । वेदवतीचेतैसेदोन । एकशेंचार आणिबावन । ओव्यानेंदोनसमासहे ॥१८॥

तुलसीचरित्रसुंदर । नऊंअध्येंसाचार । तीनविजयाचेविस्तर । दोनशेंछप्पनओव्यांनीं ॥१९॥

सावित्रीचेआख्यान । तेराअध्यायेंवर्णन । विजयाचेअध्यदोन । तीनशेंतेविसओव्यांनी ॥२०॥

लक्ष्मीचरित्रअध्येंचार । एकविजयाचामनोहर । ओंव्याचौर्‍यांशीसुंदर । वदलीस्वयेंलक्षुमी ॥२१॥

स्वाहास्वधादक्षिणा । याचेसुरस आख्याना । तीन अध्येव्यासवचना । पासष्टओव्याबोलिल्या ॥२२॥

षष्ठ्यादिदेवीचरित । चार अध्येभागवत । सत्तरओंव्यासंक्षिप्त । देवीविजयपरिसीजे ॥२३॥

राधादुर्गावतरण । अध्याएकभागवतजाण । सोळाओंव्यासुलक्षण । अध्यायएकचिमणासा ॥२४॥

नवमस्कंदभागवत । अध्येयाचेपन्नासहोत । छत्तीसशेंपंचवीसश्लोकयांत । देव्यावतरणसर्वही ॥२५॥

देवीविजयस्कंदनवम । अध्येचौदामनोहर । बाराशेंपंचवींससुगम । ओव्यायांतकथियेल्या ॥२६॥

हास्कंदमंत्रमय । वाचितांकरीनिरामय । संक्षेपेंघेतलाआशय । विस्तारभय श्रोत्यानो ॥२७॥

दशमाचाजोपहिला । स्वायंभुचरित्रबोलिला । चाळीसओंव्यानीगुंफिला । प्रथमाध्यायदेवीनें ॥२८॥

विंध्य अगस्तीचरित । सहा अध्येभागवत । ओंव्याचौपनयांत । द्वितीयोध्यायविजयाचा ॥२९॥

सुरथमनूचेंचरित्र । पांच अध्येपवित्र । वर्णीअंबाविचित्र । अठ्याहत्तरओंव्यानी ॥३०॥

भ्रामरींचेंआख्यान । अध्याएकपावन । विजयबोलिलादेवीन । एकुणपन्नासओव्यानी ॥३१॥

तेरा अध्येदशमाचे । पांचशेंबाराश्लोकयाचे । चार अध्येविजयाचे । दोनशेंएकवीसओंव्यानी ॥३२॥

एकादशाचेअध्येदोन । सदाचाराचेंवर्णन । ओंव्यात्याच्याअठ्ठावन । प्रथमाध्यायविजयाचा ॥३३॥

रुद्राक्षाचामहिमा । पांच अध्येभागवतोत्तमा । एकतीसओंव्याबोलेरामा । दुजाअध्यायसुरसजो ॥३४॥

भस्माचेजेंमहिमान । आठ अध्येपावन । अठ्ठेचाळीसओंव्यान । संक्षेपकेलातृतीय ॥३५॥

प्रातःसंध्यादिवर्णन । भागवत अध्येतीन । चौतीस ओंव्यानीकथन । चौथाअध्यायकेलासे ॥३६॥

वैश्वदेवादिविधान । भागवत अध्येतीन । वीसओंव्यानींकथन । सारसंग्रहपांचवा ॥३७॥

प्राणाग्निहोत्राचेफेल । तीन अध्येनिर्मल । अठ्ठावीसओव्यासकल । सहाव्यांतवर्णिल्यासे ॥३८॥

एकादशस्कंदसुरस । अध्येयाचेचोवीस । दोनशेंआठश्लोकास । व्यासबोलिलाविस्तरें ॥३९॥

एकादशजोविजयाचा । विस्तारसहाअध्यायाचा । दोनशेंएकुणिसओंव्याचा । संग्रहयेथेंकेलासे ॥४०॥

द्वादशांतील अध्येसात । गायत्रीचेंदिव्यचरित । साठओंव्यास्वयेंगात । प्रथमाध्यायींपरांबा ॥४१॥

एक अध्याययक्षचरित । अंबातेज उदभवत । चौसष्टओंव्यावर्णित । द्वितीयांतललितांबा ॥४२॥

एक अध्यायगौतमशाप । विप्रेंकेलेंथोरपाप । वाचितांहोय अनुताप । अठ्ठावनओंव्याशीं ॥४३॥

मणिद्वीपाचेंवर्णन । एकाध्यायेपावन । एकुणचाळींसओंव्यान । चौथाअध्यायविजयाचा ॥४४॥

एक अध्यासुंदर । ज्यांतवर्णिलेप्राकार । सत्तावनओंव्यामनोहर । पाचव्यांच्यावर्णिल्या ॥४५॥

चिंतामणीचेंमुख्यगृह । एक अध्यासंग्रह । वीसओंव्यादिव्यगेह । सहावाहेअंबेचे ॥४६॥

दोन अध्येशेवटीं । जन्मेजययज्ञराहटी । चोवीसओंव्यागोमटी । सातव्यांतवर्णिल्या ॥४७॥

चतुर्दश अध्येसुरस । असतींद्वादशस्कंदास । नऊशेंपासष्टश्लोकास । वेदव्यासेंवर्णिले ॥४८॥

उत्तरार्धहेंभागवत । सहास्कंद असतीयांत । एकशेंपासष्ट अध्यांत । नवसहस्रश्लोकसंख्या ॥४९॥

चारशेंवीसश्लोक । विशेष असतीक्षेपक । म्हणोनीसंख्याअधीक । प्राप्त ऐसेंजाणावें ॥५०॥

उत्तरार्धदेवीविजय । विशेष असेआशय । तयाचेदोन अध्याय । उत्तरार्धसंपाया ॥५१॥

ग्रंथमहिमादेवीपूजन । तैसेंचब्रम्हस्तवन । आठव्यांत असेगहन । एकशेंतेराओंव्यांनी ॥५२॥

नवम अध्यायहाचिअसें । मणिबंधवर्णिलासें । कृपार्णवेशीस्तवीतसे । क्षमापणव्हावया ॥५३॥

ओंव्याऐकशेंचाळीस । गाइल्यांयातसुरस । पूर्तताद्वादशस्कंदास । विजयासहीअंबकृपे ॥५४॥

बारावास्कंददेवीविजय । नऊअसतीअध्याय । ओंव्याअंबासुरसगाय । पंचाहत्तरपांचशें ॥५५॥

समग्रहेंश्रीमदभागवत । तीनशेंअठराअध्येयांत । अठरासहस्त्रश्लोकगात । बादरायणसप्रेमें ॥५६॥

चारशेंत्र्यायंशीश्लोक । सर्व असतीक्षेपक । ऐसाग्रंथसंम्यक । हाचिएकजाणिजे ॥५७॥

समग्रजाहलादेवीविजये । शंभरयाचेअध्याय । आठसहस्रएकओंवीगय । भुवनेशींकरुणेनें ॥५८॥

ऐसीतेकरुणामया । प्राकृतांवरीकेलीदया । आतांनमूनितिचेपाया । मागूंदिव्यवरदान ॥५९॥

आईतूंसदयहोसी । विधीवरीकृपाकरिसी । सृष्ठीतेव्हांकरविशी । कृपार्णवेनमोस्तुते ॥६०॥

सुकन्येशीकृपाकेली । च्यवनासीदृष्टीदिली । पतिओळखत्वांकरविली । कृपार्णवेनमोस्तुते ॥६१॥

नासत्यावरीसंतोषली । भक्तसेवनेंतुष्टली । इंद्रसमतातयादिली । कृपार्णवेनमोस्तुते ॥६२॥

च्यवनावरीतुष्टलीस । दिगंतकीर्तिकेलीस । यूपाश्रमतीर्थकेलास । कृपार्णवेनमोस्तुते ॥६३॥

शर्यातीसदिधलेंयश । तुष्टलीसतूंयज्ञेश । पराभविलाइंद्रास । कृपार्णवेनमोस्तुते ॥६४॥

इक्ष्वाकूनेंतुजसेविली । शतपुत्रझालेबली । शशादासीपदवीदिली । कृपार्णवेनमोस्तुते ॥६५॥

ककुस्थेंतुजसेविलें । तयाइंद्रवाहनझाले । तेणेंसर्वदैत्यमर्दिलें । कृपार्णवेनमोस्तुते ॥६६॥

युवनाश्वेंगर्भधरिला । पोटफोडूनपुत्रझाला । तूंवांचविलेदोघाला । कृपार्णवेनमोस्तुते ॥६७॥

अरुणपुत्रसत्यव्रत । गुरुशापेंत्रिशंकूहोत । तूंचितारिशीतयाप्रत । कृपार्णवेनमोस्तुते ॥६८॥

शुनःशेपावांचविलें । हरिश्चंद्रारोगमुक्तकेले । रोहितासिवांचविलें । कृपार्णवेनमोस्तुते ॥६९॥

विश्वामित्रेंछळकेला । डोंबदासनृपझाला । तरीतूंहरिश्चंद्रतारिला । कृपार्णवेनमोस्तुते ॥७०॥

दुर्गमेंसर्वांत्रासिले । दुर्भिक्षसर्वत्रजाहले । शताक्षीरुपेंत्वांहरिलें । कृपार्णवेनमोस्तुते ॥७१॥

हरिहरगर्वेंभरले । क्षणेतुवांअशक्तकेले । पुन्हादेवस्तवेंतारिलें । कृपार्णवेनमोस्तुते ॥७२॥

दक्षावरीतुष्टलीस । दाक्षायणीअवतरलीस । शिवासीप्राप्तझालीस । कृपार्णवेनमोस्तुते ॥७३॥

लक्ष्मीरुपेंसागरी । प्रगटोनिवरिलाहरी । तूंकेवेळदयालहरी । कृपार्णवेनमोस्तुते ॥७४॥

दक्षमखींतनूटाकिली । हरीनेतीशतधाकेली । तितुकींपीठेंदिव्यझालीं । कृपार्णवेनमोस्तुते ॥७५॥

देवींहिमाचलीस्तविली । मुख्यरुपेंप्रगटली । पुढेंमगपार्वतीझाली । कृपार्णवेनमोस्तुते ॥७६॥

हिमगिरीसीतुष्टली । आत्मज्ञानतयावदली । विराडरुपेंप्रगटली । कृपार्णवेनमोस्तुते ॥७७॥

आलीपर्वताचेउदरी । पार्वतीशंकरातेवरी । शण्मुखपुत्र उत्पन्नकरी । कृपार्णवेनमोस्तुते ॥७८॥

मनूनेंतुज आराधिली । सृष्टीत्याचीबहुवाढली । पृथ्वीरुपेंजीनटली । कृपार्णवेनमोस्तुते ॥७९॥

सप्तद्वीपशैलसागर । सप्तस्वर्गसप्तविवर । तुझींचरुपेंअपार । कृपार्णवेनमोस्तुते ॥८०॥

सृष्ट्यर्थतूंचीप्रकृती । पांचरुपेंतूंचख्याती । स्त्रीरुपसर्वतवविभूति । कृपार्णवेनमोस्तुते ॥८१॥

दुर्गाराधासरस्वति । लक्ष्मीसावित्रीस्वयंज्योति । श्रीकृष्णतूंचनिगुती । कृपार्णवेनमोस्तुते ॥८२॥

ब्रम्हरुद्रनारायण । स्वयेंनटलीस आपण । तूंचसगुणनिर्गुण । कृपार्णवेनमोस्तुते ॥८३॥

भ्रुगुब्रम्हासुर्यशेष । भरद्वाजबृहस्पतीमनूस । कश्यपयाज्ञवल्क्यव्यासास । कृपार्णवेनमोस्तुते ॥८४॥

इंद्रापावलीसरस्वती । शिवहीतुजलास्मरती । ज्ञानदात्रीतूंभगवती । कृपार्णवेनमोस्तुते ॥८५॥

प्रकृतिअंशेंतूधरा । ब्रम्हद्रवातूंउदकसारा । गंगारुपेंउद्धरीसगरा । कृपार्णवेनमोस्तुते ॥८६॥

सगरपौत्रभगीरथ । पुरविशीत्याचेमनोरथ । गंगाआलीतारणार्थ । कृपार्णवेनमोस्तुते ॥८७॥

क्षमाविरजाशोभा । रत्नभूषाशांतीशोभा । क्षेमार्थतूंप्रकृतिगाभा । कृपार्णवेनमोस्तुते ॥८८॥

तुंझालीसदेवती । रावणेंधर्षितांशापीसती । पुन्हारक्षिसीतयाप्रती । कृपार्णवेनमोस्तुते ॥८९॥

देहांतरेंतूंचिसीता । छायातूंचिपांडवकांता । लक्ष्मीतूंचिमगसीता । कृपार्णवेनमोस्तुते ॥९०॥

तूंचिगोपीतूंचितुलसी । शंखचूडातूंचिवरिसी । वृक्षरुपेंतूचतुलसी । कृपार्णवेनमोस्तुते ॥९१॥

सावित्रीतूंचिजननी । अश्वपतीकन्याहोऊनी । पातिव्रत्यदाविलेंउकलोनी । कृपार्णवेनमोस्तुते ॥९२॥

हतश्रीकपुरंदरें । तुजप्रार्थितांकृपापारें । सश्रीकेकेलासीइंदिरे । कृपार्णवेनमोस्तुते ॥९३॥

देवसर्वक्षुधापीडित । विधिप्रार्थनेंस्वाहादैवत । तुचितृप्तकेलेंजगत । कृपार्णवेनमोस्तुते ॥९४॥

स्वधाहोवोनीपितरां । वक्षिणारुपेंयज्ञेश्वरा । तृप्तकरिसीविप्रवरां । कृपार्णवेनमोस्तुते ॥९५॥

पुत्रशोकेंतप्तासी । पुत्रदानेंप्रियव्रताशी । षष्ठीरुपेंसुखविशी । कृपार्णवेनमोस्तुते ॥९६॥

धरापुत्रमंगळ । ग्रहत्वदिलेंत्यासीअढळ । मंगलचंडीतूंचिकवळ । कृपार्णवेनमोस्तुते ॥९७॥

मनसातूंचिझालीस । वरिलाजरत्कारुस । वांचविलेसर्पकुळांस । कृपार्णवेनमोस्तुते ॥९८॥

श्रीकृष्णाशीवृंदावनी । तूंचिसुरभीहोऊनी । संतोषविलपयदेउना । कृपार्णवेनमोस्तुते ॥९९॥

प्राणबुद्धिपासून । प्रकृतीचीरुपेंदोन । राधादुर्गारक्षिसीजन । कृपार्णवेनमोस्तुते ॥१००॥

स्वायंभूमनूतुजप्रती । स्तवनकरीएकचित्ती । वरदेशीतयाप्रती । कृपार्णवेनमोस्तुते ॥१०१॥

विंध्याद्रिबहुवाढला । अगस्तीनेंनिजविला । वाढविशींभक्तयशाला । कृपार्णवेनमोस्तुते ॥१०२॥

स्वारोचिषतपकरी । स्थापिलात्वांमन्वंतरी । उत्तमासींहीमनूकरी । कृपार्णवेनमोस्तुते ॥१०३॥

तामसरैवतचाक्षुष । वैवस्तश्राद्धदेवास । मनूकरिशींसर्वांस । कृपार्णवेनमोस्तुते ॥१०४॥

सुरथेंकेलेंअनुष्ठान । तयादेशीवरदान । आठवातोचिसूर्यनंदन । कृपार्णवेनमोस्तुते ॥१०५॥

करुषपृषध्रनाभागदिष्ट । शर्यातित्रिशंकूचेइष्ट । साहींकेलेंमनूवरिष्ठ । कृपार्णवेनमोस्तुते ॥१०६॥

अरुणेंदेवत्राशिलें । दैत्यभेणेंशरण आलें । भ्रामरीरुपेंरक्षिले । कृपार्णवेनमोस्तुते ॥१०७॥

गायत्रीरुपेंगौतमासी । संध्यारुपेंविप्राशीं । रक्षिसीतूंअनिर्हिशीं । कृपार्णवेनमोस्तुते ॥१०८॥

देवगर्वशमवाया । प्रगटलीसतेजोमया । यक्षरुपेंकेलीदया । कृपार्णवेनमोस्तुते ॥१०९॥

मणिद्वीपनिवासिनी । भुवनेश्वरीसर्वजननी । कामेश्वरांकवासिनी । कृपार्णवेनमोस्तुते ॥११०॥

जन्मेजयेंयज्ञकेला । त्याचापिताउद्धरिला । यशदिधलेंव्यासाला । कृपार्णवेनमोस्तुते ॥१११॥

सूतसांगेकथानक । ऋषीसह ऐकेंशोनक । देशींसर्वांसीतूंसुख । कृपार्णवेनमोस्तुते ॥११२॥

वक्ताश्रोताअनुमोदिता । ग्रंथलिहितापूजिता । कृपार्णवेनमोस्तुते ॥११३॥

दयाकेलीमजवरी । ग्रंथबोलिलावैखरी । प्रसन्नतूंआनंदलहरी । कृपार्णवेनमोस्तुते ॥११४॥

शरणमीअंबेतुझेंपाईं । जेंमागेनतेंमजदेई । तुजवांचूनकोणकायीं । शक्य असेंपुरवाया ॥११५॥

तूंमातातूंचिपिता । तूंभगिनीतूंभ्राता । तूंचिकाकामामाआतां । दारापुत्र अवघेतूं ॥११६॥

तूंइष्टदेवतूंश्रीगुरु । तूंकुळविद्यागोत्रथोरु । तुजवांचूनमजथारु । नाहींनाहींनिश्चयें ॥११७॥

मीनीच अधमखळ । मीपामरपापीदुर्बळ । कर्महीनमतिमंदकेवळ । चोरजारकपटींमी ॥११८॥

पातकपंचककर्ता । धर्मकर्माचासंहर्ता । विश्वासघातकीमीपुर्ता । कृतघ्नश्रेष्ठदुष्टमी ॥११९॥

ऐसाजरीमींआहे । तरीआतांमजकडेपाहे । थोरवीतुझींतूंपाहे । पाहूंनकोममकृत्य ॥१२०॥

चैतन्यरुपातूंगुणवती । कर्तव्यतातुझेंहाती । क्रीडामृगहेजीवजाती । करविशींतेवीहोतसें ॥१२१॥

अपराधकाय आम्हांकडे । शक्यकाय आम्हींबापुडे । व्यर्थ आम्हांसांकडे । कतृत्वाचेकासया ॥१२२॥

आतांजरीकैसाअसलो । तरीतुझाचिम्हणविलों । इतुक्यांवरीवायागेलों । उणीवतुझ्यामहत्वा ॥१२३॥

तरीआतांकृपाकरी । सर्वापराधक्षमाकरी । भवसागराचेपारी । बैसवीगादयापरे ॥१२४॥

सर्वत्रमजरक्षावे । ममशत्रूसभक्षावें । कृपादृष्टीलक्षावे । मजलागींसर्वदा ॥१२५॥

सर्वभोगमजदेइजे । मनांमाझेनिरिच्छकीजे । संतसंगसदादीजे । नकोविसंबूक्षणएक ॥१२६॥

जगत्सर्वतवमूर्ति । ऐसीअसोमजस्फूर्ति । माझीवाढीवकीर्ति । दुःसंगकदानघडावा ॥१२७॥

भजनीअसावीप्रीति । शास्त्रींअसावीमति । अंतीदेईजेगति । त्वद्रुपांतसमरस ॥१२८॥

एकनिष्ठेनेंजेंजन । ग्रंथाचेकरीलपठण । त्यांसींतूंआपुलाजन । मजसाठींम्हणावें ॥१२९॥

एकांतीतुझेंमंदिरी । शुचिर्भूतएक आहारी । रात्रींजोशतावर्तनेंकरी । प्रत्यक्षत्यासीत्वांव्हावें ॥१३०॥

नवरात्रीकरितांपठण । व्हावेंकष्टनिवारण । दरिद्रव्याधीनाशन । त्याचेकरीपरांबे ॥१३१॥

जेंजेंजोईच्छील । नवांवर्तनेंपावेल । अंबेतूंऐसेंकबूल । मजसाठींकरावें ॥१३२॥

जयजयवरदेसर्वेश्वरी । जयजयभोगदेकामेश्वरी । जयजयमोक्षदेमोक्षेश्वरी । दयार्णवेनमोस्तु ॥१३३॥

नमोविद्येअविद्ये । नमोलक्ष्मीब्रम्हविद्ये । नमोहरिहरविधिवंद्ये । जगन्नायकेनमोस्तु ॥१३४॥

महाकालीमहामाये । महालक्ष्मीनिरामये । महावाणीवाड्मये । सृष्टिकर्त्रीनमोस्तु ॥१३५॥

नमोंमधुकैटभनाशिनी । नमोसैरिभहारिणी । नमोशुंभनिशुंभमर्दिनी । सुखदाइनीनमोस्तु ॥१३६॥

नमोकालिकेतारे । महाविद्येषोडशीपरे । भूवनेश्वरीपीतांबरे । छिन्नमस्तकेनमोस्तु ॥१३७॥

नमोमातेधूमावती । भैरवीतूंपरंज्योती । राजमातंगीभोगवती । दशविद्येनमोस्तु ॥१३८॥

यंत्रराजबीजेश्वरी । पंचदेवपीठविहारी । श्रीमाताराजराजेश्वरी । प्रसन्न असोसर्वदा ॥१३९॥

देवीविजयग्रंथसुंदर । अंबेचेहेंनिजमंदिर । प्राप्तहोईलश्रीपुर । वाचकासीनिश्चये ॥१४०॥

इतिश्रीमद्देवीभागवत्‍ सारसंग्रहेउत्तरार्धे श्रीमत्स्वच्छन्दानन्दस्वामीकृत देवीविजयेद्वादशस्कंदे नवमोध्यायपठणें देवीविजयः पुर्णतामगात् ॥ श्रीपरांबार्पणमस्तु ॥ श्रीगुरुसांबसदाशिवार्पणमस्तु ॥ शुभंभवतु ॥९॥

मिती भाद्रपद शुद्ध १२ रविवार शके १८१८ दुर्मुखनामसंवत्सरे

इति श्रीदेवीविजये द्वादश स्कंदः समाप्तः ।

॥ श्री देवीविजय ग्रंथ समाप्त ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP