द्वादश स्कंध - अध्याय चवथा

श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय.


श्रीगणेशायनमः । सर्वोत्तमसर्वलक्षण । सर्वोपरीविराजमान । उंच असेगोलकाहून । छत्रभूतसर्वांसी ॥१॥

अनेकब्रम्हांडावरी । जीचालोकछायाकरी । स्वयेंनिर्मिलास्वकरी । सर्वलोकनामज्याचे ॥२॥

वैकुंठकैलासगोलोके । याहूनयाचीशोभाअधिक । पन्नासलक्षपरीमाणक । योजनविस्तारबहुयाचा ॥३॥

मणिद्वीपाचेसभोंवार । अमृताचाभरलासागर । वायुयोगेंलाटाअपार । सूर्यापरीझळकती ॥४॥

लक्षावधीजाहजेंफिरती । ध्वजत्याचेतळपती । शंखमीनझषजाती । अपार असतीज्यामध्यें ॥५॥

वाळूसर्वरत्नमय । भुमीजेथेंहिरण्मय । वृक्षसर्वरत्नमय । नानांपक्षीबोलती ॥६॥

स्पर्शूनीराहिलागगन । धातुमयप्राकारगहन । उंच असेसप्तयोजन । चतूर्द्वांरेंविराजतीं ॥७॥

शतशःतेथेंद्वारपाळ । शस्रपाणीमहाबळ । देवीभक्त अतितेजाळ । वेत्रपाणीशोभतीं ॥८॥

करावयाअंबादर्शन । येतीतेथेंदेवगण । तेथेंचित्यांचेसेवकजन । वाहनादितिष्ठती ॥९॥

अश्वगजरथविमान । शतशःतेथेंशोभायमान । शब्द उमटेअतिगहन । कोलाहलबहुतेथें ॥१०॥

पदींपदीसरोवरें । फुललीत्यांत इंदीवरें । वरीगुंजतीभ्रमरें । स्वच्छजलशीतल ॥११॥

अनेकबगीचेसुंदर । नानाजातीतरुवर । सारिकाशुकमयूर । नानांपक्षीबोलती ॥१२॥

पूर्वकोटाहूनशतगुण । कांस्यपरिखशोभन । गोपूरद्वारेंसींसमान । उंचीरुंदीसर्वही ॥१३॥

वापीकूपसरोवरें । रत्नमयमनोहरें । उद्यानेंआणिमंदिरे । अनेक असतींतयांत ॥१४॥

तिसराअसेताम्रसाल । उंचिरुंदीसमतोल । कल्पवाटिकाबहुसाल । असतींजेथेंअपूर्व ॥१५॥

येथीलसर्ववृक्षासी । पानेंफुलेंसुवर्णासरसी । फळेंबीजेंरत्नसदृशी । सुगधयोजनेंदशजाय ॥१६॥

मधुश्रीमाधवश्रीकांत । तेंवनरक्षीवसंत । पुष्पसिंहासनीबैसत । पुष्पछत्रतयांवरी ॥१७॥

पुष्पांचाघेतमोद । स्त्रियांसहकारीआनंद । वसंतलक्ष्मीतेथेंसमद । वसंतासहक्रीडतसे ॥१८॥

पुढेंअसेंसीसपरिख । समांतरेंसमसुरेख । संतानवाटिकादेख । ग्रीष्मतेथेंरक्षीतसे ॥१९॥

तेथीलवृक्षरत्नमय । फळेंत्यांचीसधामय । दशयोजनसुंगधमय । वन असेंदिव्यतें ॥२०॥

शुक्रश्रीशुचिश्रीनामा । दोघींअसतींग्रीष्मरामा । वृक्षतळींजनविश्रामा । करितींतेथेंउष्णश्रांत ॥२१॥

पुष्पमालारुळतीगळां । सीतलचंदनचर्चिला । तालवृंतहातींघेतला । रमणीसहक्रीडती ॥२२॥

तयापुढेंपित्तळसाल । समांतरतोहिसमस्थल । हरिचंदनवनरसाळ । वर्षाऋतुरक्षीतसे ॥२३॥

वीजहेचज्याचेनयन । मेघज्याचेवाहन । इंद्रधनुष्यशोभन । वज्रघोषगर्जतसे ॥२४॥

सहस्रशःजलधारा । गणांसहवर्षेंअपारा । स्त्रियांअसतींयासबारा । नभश्रीदुजीनभस्यश्री ॥२५॥

स्वरस्यारस्यमालिनी । अंबादुलानिरत्नी । भ्रमंतीआणिमेघयंती । वर्षयंतीचुबुणिका ॥२६॥

वारिधाराबारावी । तयांसहजलवर्षवी । सर्वांसीभरुनिवाहवी । नदीनदसरोवरें ॥२७॥

पंचधातुमयकोट । पुढेंअसेंचखोट । समांतरेंसमघाट । रक्षीयेथेंशरह्रतू ॥२८॥

तयांमाजीमंदारवाटी । पुष्पेंशोभलीबहुदाटी । इषश्रीऊर्जश्रीवधूटी । सुंदरदोनजयाच्या ॥२९॥

पुढेंअसेंरौप्यप्राकार । समसर्व आकार । पारिजातवाटीसुंदर । रक्षकयेथेंहेमंत ॥३०॥

सहश्रीसहस्यश्रीदोन । स्त्रियात्याच्याशोभन । येथेंराहतीसिद्धजन । देवीभक्तभाविकजे ॥३१॥

पुढेंकोटस्रुवर्णाचा । समान अंतरेनेमाचा । शिशिरऋतूयेथिचा । नियंताजाणभूपते ॥३२॥

कंदबवाटीअसेयेथें । मद्यधारावर्षतीतेथें । विलाससुखपूर्णजेथें । देवीकृपेंभक्तांशा ॥३३॥

तपश्रीतपस्यश्रीदोनी । शिशिरऋतूच्याकामिनी । महासिद्धयेस्थानी । शाश्वतकरितीविलास ॥३४॥

पुढेंपुष्परागसाल । रत्नभूमिविशाल । सर्वरत्नमयतेजाळ । नेत्रदिपतीपहातां ॥३५॥

सर्वांहुनिलक्षगुण । हासालशोभमान । मंडपादिसर्वरत्न । अवर्णनीयविराजे ॥३६॥

अष्टदिशेसींअष्टपुरीं । दिग्पाळांच्यामनोहरी । इंद्रादिसर्वसेवापरी । राहतीतेथेंसुखानें ॥३७॥

एकादशरुद्रतेथेंराहती । द्वादशादित्यसवेंवसती । सर्वतेथेंराबती । ब्रम्हांड सर्व असेतेथें ॥३८॥

मणिद्वीपाचेंवर्णन । शतश्लोककोटवर्णन । अंतर्भागाचेंकथन । पुढिलीयेअध्यायी ॥३९॥

श्रीदेवीविजयेद्वादशस्कंदेचतुर्थोऽध्यायः समाप्तः ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP