अभंग - रुप सुंदर सुंदर
श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.
रुप सुंदर सुंदर । ध्याती योगी दिगंबर ॥धृ०॥
रत्नजडित सिंहासनीं । शोभे सिंहाद्रिवासिनी ॥१॥
दिसे मळवट चांगला । मुखीं तांबुल रंगला ॥२॥
साडी नेसली पिवळी । माय मनाची कोंवळी ॥३॥
नाना रत्न - अलंकार । अंगीं सर्व अधिकार ॥४॥
गोठ, पाटल्या, बांगड्या । कानीं मोत्यांच्या बुगड्या ॥५॥
शिरिं मोगर्याच्या कळ्या । पायीं पैंजण, साखळ्या ॥६॥
विष्णुदासमनव्यापिनी । भेट देई नारायणी ॥७॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP