अभंग - येग येग अंबाबाई
श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.
येग येग अंबाबाई । एकवीरे माझे आई ॥१॥
जोडुनिया दोन्ही हात । वाट तुझी मी पहात ॥२॥
शीर ठेवीन चरणीं । रुप पाहीन नयनीं ॥३॥
माझे मनाची आवडी । अंबे पुरवावी येवढी ॥४॥
वेध लागलासे चित्तीं । माय तुला सांगूं किती ॥५॥
विष्णुदास म्हणे निके । मूळ पाठवी रेणुके ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP