अभंग - अग आई तूं रेणुके

श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्‍गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.


अग आई तूं रेणुके । माझी विनंती आयके ॥१॥
तुझें अज्ञान लेंकरुं । साधनें मी काय करुं ॥२॥
तुझ्या नांवाच्या प्रतापें । जळति महा घोर पापें ॥३॥
करितां नाम पारायण । नर होय नारायण ॥४॥
भेदाभेद तुजपाशीं । तैसा नाहीं कीं नामासी ॥५॥
जाणों नाम तुझें माय । नेणो आणीक उपाय ॥६॥
विष्णुदास अनुवादे । तुज ठाऊक असूं दे ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP