अभंग - आपुलीया बाळा आपुलीया करीं ।
श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.
आपुलीया बाळा आपुलीया करीं ।
मारी परि दूरी धरुं नको ॥धृ०॥
आपुलीया हातें कापावी ही मान ।
जगांत अपमान करुं नको ॥१॥
श्वानापरी ठेवी आपुल्या संग्रहीं ।
परी परगृहीं धाडूं नको ॥२॥
वाढवावें प्रेम पुरवावें कोड ।
ममतेचा मोड मोडूं नको ॥३॥
भवनदीमाजी चाललों वाहात ।
आतां मागें हात काढूं नको ॥४॥
विष्णुदास म्हणे अगे जगन्नाथे ।
जननीचें नातें सोडूं नको ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP