मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री कल्याणांचीं स्फुट प्रकरणें|स्फुट श्लोक|

स्फुट श्लोक - हरादी विधी विष्णु हे गूणर...

ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.


हरादी विधी विष्णु हे गूणरासी । तया चिंतितां तत्त्वता पुण्यरासी ।
परी अंतरीं चाळकू वातसत्ता । भजे रे मना रामदूता समर्था ॥१॥
पहा वात चक्री रवी चंद्र तारा । महा शेष वाराह कूर्मासि थारा१ ।
परी अंतरीं चाळकू वातसत्ता । भजे रे मना रामदूता समर्था ॥२॥
इती ते किती संत साधू कृपाळू । मनस्वी तपस्वी बहू भक्तपाळू ।
परी अंतरीं चाळकू वातसत्ता । भजे रे मना रामदूता समर्था ॥३॥
पहा स्थावरीं जंगमीं सर्व कर्ता । किती शक्ति भूतावळी भूतधर्ता ।
परी अंतरीं चाळकू वातसत्ता । भजे रे मना रामदूता समर्था ॥४॥
समर्थें समर्था तुला नीरवीलें । तुझें नाम कल्याणसें२ मीरवीलें ।
तुझे नामधारी तुझी सर्व सत्ता । भजे रे मना रामदूता समर्था ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : March 22, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP