स्फुट श्लोक - डगमघ करिताहे सर्व ब्रह्मा...
ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.
डगमघ करिताहे सर्व ब्रह्मांड जातें ।
आगम निगम शास्त्रीं शुद्ध बोधें त्यजा ते ।
विमळ मळ असेना ब्रह्म तें संत जाणे ।
तदुपरी सुमना रे तें चि होऊनि जाणे१ ॥१॥
डिमी डिमी डिमी नादें डौर वाहे हराचा ।
हर हर हर शब्दें शेष डोले हराचा ।
घन घन घन नादें वाजती घंटमाळा ।
दुम दुम दुम नादें येकमेळा समेळा ॥२॥
N/A
References : N/A
Last Updated : March 22, 2014
TOP