मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री कल्याणांचीं स्फुट प्रकरणें|स्फुट श्लोक| गुरूसी करी तोंडपीटी विकार... स्फुट श्लोक हरादी विधी विष्णु हे गूणर... तारापती द्वंददु:खे भिकारी... गुरूसी करी तोंडपीटी विकार... अनूरक्त वीरक्त माया प्रपं... स्थळ येरमाळें येडेस्वरीचे... श्रीपत्रिकेला लिहिलें विध... पतितासि तारी उतारी कृपाळू... सुखार्णवाचे गुण आठवावे । ... तेजबंधुरिपुचा रिपुराज भोळ... जगन्नायकें अन्न निर्माण क... करी नाम कल्याण सर्वा जिवा... परम सुंदर वाजवि मोहरी । र... द्बयाष्टदीशा निज कोंदले र... डगमघ करिताहे सर्व ब्रह्मा... पौलस्ति पूजा बहु वात होता... ज्ञानी येक भला कवित्व वदल... सुरारींचा आरी विलसत लघू व... गुरुश्राप संताप गाजे तडाख... करकर सितबोटी वाममुष्टीस म... स्फुट श्लोक - गुरूसी करी तोंडपीटी विकार... ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते. Tags : abhangkalyanshlokअभंगकल्याणश्लोक नव्हे तो चि तो शिष्य मोक्षाधिकारी Translation - भाषांतर गुरूसी करी तोंडपीटी विकारी । पुन्हा दावितो भाव नाना प्रकारीं ।भृकूटी कुटीळा विलोकी मकारी । नव्हे तो चि तो शिष्य मोक्षाधिकारी ॥१॥समस्तांमध्ये मी च श्रेष्ठाधिकारी । अनाथें दिनातें कुशब्दें धिकारी ।टवाळी टवाळी करी तो विकारी । नव्हे तो चि तो शिष्य मोक्षाधिकारी ॥२॥आम्ही शिष्य तों चालताहे प्रतिष्ठा । आम्हां वेगळे मानिती कोण श्रेष्ठा ।आम्ही पद्महस्ती गुरु तो भिकारी । नव्हे तो चि तो शिष्य मोक्षाधिकारी ॥३॥बहू मान्यतेकारणें तळमळीतो । जसा ग्राम गर्भीं रसें जळमळीतो ।देहेबुद्धीनें ताडिला षड् विकारी । नव्हे तो चि तो शिष्य मोक्षाधिकारी ॥४॥जनीं सज्जनीं तेम गुरुदास्य केलें । गुरूचे कृपें सर्व कल्याण जालें ।असें जाणतो सांगतो स्पोटकारी । नव्हे तो चि तो शिष्य मोक्षाधिकारी ॥५॥ N/A References : N/A Last Updated : March 22, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP