स्फुट श्लोक - पतितासि तारी उतारी कृपाळू...
ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.
पतितासि तारी उतारी कृपाळू । वसेना दिसेना असेना भुपाळू ।
बहू भक्त ते तारिले प्रेमखाणी । वदा रे वदा रामरामेति वाणी ॥१॥
धरीतो शिरीं भक्तवोझें न बोले । पुराणीं पुराणी कवीवाणी बोले ।
अनाथें सनाथें करी च्यापपाणी । वदा रे वदा रामरामेति वाणी ॥२॥
उमाकांत नीवांत ध्यातो जयाला । वनीं भिल्लटी पूजिताहे तयाला ।
तिचें शेष सेवी करी श्र्लाघ्यवाणी । वदा रे वदा रामरामेति वाणी ॥३॥
प्रभूचें जनीं सर्व कर्तव्य आहे । तिवा मानवाला प्रतीपाळिताहे ।
प्रितीनें जपे शांभवी ते भवानी । वदा रे वदा रामरामेति वाणी ॥४॥
करीं च्याप संताप दुष्टास देता । करी पाप नि:पाप हें नाम घेतां ।
दिनानाथ कल्याण दानी निदानी । वदा रे वदा रामरामेति वाणी ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : March 22, 2014
TOP