मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|मानसपूजा| प्रकरण ४ मानसपूजा प्रकरण १ प्रकरण २ प्रकरण ३ प्रकरण ४ प्रकरण ५ प्रकरण ६ प्रकरण ७ प्रकरण ८ मानसपूजा - प्रकरण ४ समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला. Tags : kavitapoemramdassamarthaकवितारामदाससमर्थ प्रकरण ४ Translation - भाषांतर ॥ श्रीराम समर्थ ॥ ॥ लोणचीं रायतीं वळवटे । वडे पापड मेतकुटें । मिरकुटें डांगार-कुटें । मिरे घाटे सांडगे ॥१॥नाना प्रकारच्या काचर्या । सांडयाकुरवडया उसर्या । कोशिंबिरीच्या सामोग्रया । नानाजिनसी ॥२॥सुरण नेटके पचविले । आंबे आंवळे घातले । आलें लिंबें आणिले । घोंस मिर्यांचे ॥३॥ कुइर्या बेलें माईनमुळें । भोंकरें नेपत्ती सारफळें । कळकें कांकडी सेवकामुळें । सेंदण्या वांगी गाजरें ॥४॥मेथी चाकवत पोकळा । माठ शेपू बसला । चंचवली चवळा वेळवेळा । चिवळ घोळी चिमकुरा ॥५॥वांगीं शेंगा पडवळीं । दोडके कारलीं तोंडलीं । केळीं भोंपले कोहाळीं । गंगाफळें काशी-फळें ॥६॥कणकी सोजी सांजे सपिठें । नाना डाळी धुतलीं मिठें । रवे कण्या पिठी पिठें । शुभ्रवर्णें ॥७॥बारीक तांदूळ परिमळिक । नाना जिनसींचे अनेक । गूळ साखर राब पाक । तूप तेल मध राब ॥८॥दूध दहीं दाट साय । ताक लोणी कोण खाय । नान शिखरिणींचे उपाय । आरंभिलें ॥९॥हिंग जिरे भिरे सुंठी । कोथिंबीर आंवळकाठी । पिकलीं लिंबें सदेठीं । मेथ्या मोहर्या हळदी ॥१०॥द्रोण पानें पत्रावळी । ताटें दुरडया वरोळी । सुपें हरि विचित्र पाळीं । नाना उपसामग्री ॥११॥॥ इति श्रीमानस०॥११॥ N/A References : N/A Last Updated : April 12, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP