मानसपूजा - प्रकरण ७
समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.
॥ श्रीराम समर्थ ॥ ॥
सकळ शाखा सिद्ध केल्या । निसल्या धुतल्या सांभाळिल्या । पात्रीं भरोनी ठेविल्या । चुलीवरी ॥१॥
पुरणाचे हंडे चढविले । कणीक ढीग भिजविले । सांजे उकडोनि सिद्ध केले । भक्षायाकरणें ॥२॥
कणिक धबधबा कांडिती । शुभ्र कवण मिश्रित करिती । कित्येक पुरणें वांटिती । चमत्कारें ॥३॥
तवे तेलतवे चढविले । एक तेलें एक तुपें भरिले । तप्त होतां सणसणले । असंभाव्य ॥४॥
एक भक्षें लटिती । एक वरणें घाटिती । एक कणिकी मळिती । मांडे पुर्या ॥५॥
मांडे रांजणां घातले । तवे तेलतवे भरले । कडकडूं ते लागले । सणसणाटें ॥६॥
वडे तेलवर्या सांजवर्या । घारगे मांडे गुळवर्या पुर्या । पोळ्या पुरणपोळ्या झारोळ्या । नानापरी ॥७॥
उखर्या रोटया कानवले । धिरडीं वेडण्या कानवले । पात्या आइते खांडव्या केले । दिवे ढोकले उंबरे ॥८॥
कण्या कोथिंबीरी घातल्या । फोडण्या नेमस्त दिधल्या । शाखा शिकल्या उतरल्या । तेलातुपाच्या ॥९॥
नाना क्षीरी सिद्ध केल्या । उदंड दुधें आळिल्या । नाना शर्करा आणिल्या । शोधूनि पात्रीं ॥१०॥
शुभ्र ओदनें सुवासें । सुगंध उठला नानारसें । रुचिर कथिका सावकाशें । स्वयंपाक झाला ॥११॥
॥ इति श्रीमानस० ॥११॥
N/A
References : N/A
Last Updated : April 12, 2014
TOP