मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|मानसपूजा| प्रकरण ८ मानसपूजा प्रकरण १ प्रकरण २ प्रकरण ३ प्रकरण ४ प्रकरण ५ प्रकरण ६ प्रकरण ७ प्रकरण ८ मानसपूजा - प्रकरण ८ समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला. Tags : kavitapoemramdassamarthaकवितारामदाससमर्थ प्रकरण ८ Translation - भाषांतर ॥ श्रीराम समर्थ ॥ ॥ दुधें तुपें आणविलीं । दव्यें तक्रे आणविलीं । लोणचीं रायतीं काढिलीं । मेतकुटें ॥१॥नाना काचर्या तळिल्या । कोथिंबीर सिद्ध केल्या । नाना शिखरिणी झाल्या । द्रोण पानें पत्रावळी ॥२॥ब्राह्मण स्नान करोनि आले । एक देवार्चना बैसले । एक ते करूं लागले । वेदघोष ॥३॥चित्रविचित्र सोवळीं । सुरंग नेसले प्रावर्णें केलीं । कित्येकीं देवार्चनें मांडलीं । ठांई ठांई ॥४॥एक ध्यानस्थ बैसले । एकीं जप आरंभिले । एक करिते झाले । प्रदक्षिणा नमस्कार ॥५॥पंचामृतें सांग पूजा । ब्राह्मणीं आरंभिली ओजा । राम त्रैलोक्याचा राजा । अर्पिते झाले ॥६॥नाना सुगंधिक तेलें । मंगळ स्नान आरंभिलें । अंग पुसोनि नेसविलें । पीत वस्त्र ॥७॥नान वस्त्रें अलंकार । गंधाक्षता कुंकुम केशर । उटी देवोनि माळा हार । उदंड घातले ॥८॥उदंड उधळिलीं धूसरें । वाद्यें वाजती मनोहरें । गर्जती जयजयकारें । करताळी नामघोष ॥९॥धूप आरती आरंभिली । उदंड नीरांजनें चालिलीं । भक्तजनें सुखी केलीं । दानपत्रें ॥१०॥जितुकीं अन्नें सिद्ध केलीं । तितुकीं देवांपुढे ठेविलीं । उदकें ठेवोनि सोडिलीं । पट्टकूळेम ॥११॥॥ इति श्रीमानस० ॥११॥ N/A References : N/A Last Updated : April 12, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP