मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|करुणाष्टकें| अष्टक ८ करुणाष्टकें अष्टक १ अष्टक २ अष्टक ३ अष्टक ४ अष्टक ५ अष्टक ६ अष्टक ७ अष्टक ८ सवाया करुणाष्टकें - अष्टक ८ समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला. Tags : kavitapoemramdassamarthaकवितारामदाससमर्थ अष्टक ८ Translation - भाषांतर तुझीया वियोगें जीवत्व आलें । शरीरयोगें बहु दु:ख झालें । अज्ञान दारिघ्र माझें सरेना । तुजवीण रामा मज कंठवेना ॥१॥परत्रीं जिणें दीन कंठूं किती रे । उदास माझ्या मनि वाटतें रे । लल्लाटरेखा तरि पालटेना । तुजवी० ॥२॥जडली उपाधी अभिमान साधी । विवेक नाहीं बहुसाल बाधी । तुझिया वियोगें पळही गमेना । तुजवी० ॥३॥विश्रांति नाहीं अभिमान देहीं । कुळाभिमानें पडलों प्रवाहीं । स्वहीत होतां मजला दिसेना । तुजवी० ॥४॥विषयी जनानें मज लाजवीलें । प्रपंचसंगें आयुष्य गेलें । समयीं बहू क्रोध शांती भरेना । तुजवी० ॥५॥संसारसंगें बहू पीडलों रे । कारुण्यसिंधू मज सोडवी रे । कृपाकटाक्षें सांभाळि दीना । तुजवी० ॥६॥सदृढ झाली देहबुद्धि पाही । वैराग्य कांहीं हे नांव नाहीं । अपूर्ण कामीं मन हें विटेना । तुजवी० ॥७॥निरूपणीं हे सद्बुद्धि होती । फलत्याग होतां सवेंचि जाती । काय करूं रे क्रिया घडेना । तुजवी० ॥८॥जयजय दयाळा त्रैलोक्यपाळा । भवसिंधुहारी मज तारि हेळा । स्वामीवियोगें दासा मनीं आठव वीसरेना । तुजवी० ॥१०॥ जयजय रघुवीर समर्थ ॥॥ करुणाष्टकें श्लोकसंख्या ॥७६॥ N/A References : N/A Last Updated : April 12, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP