व्यतिरेक अलंकार - लक्षण ५
रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.
ह्यांतील पूर्वार्धांत उपमेयाचा उत्कर्ष शब्दानें सांगितला आहे; व उपमानाचा अपकर्ष आणि साद्दश्याचा अभाव हीं दोन्हीं आक्षिप्त आहेत. उत्तरार्धात, उपमानाचा अपकर्ष शब्दानें सांगितला असून, उपमेयाचा उत्कर्ष व साद्दयाचा अभाव हीं आक्षिप्त आहेत. अशारीतिनें या तिघांपैकीं (म्हणजे उपमेयाचा उत्कर्ष, उपमानाचा अपकर्ष व साद्दश्याचा अभाव या तिघांपैकीं) कुठें दोन, कुठें तीन अशीं शब्दानें सांगितलीं असण्याचा संभव असतो. पण त्यांत फारसा चमत्कारही नसतो; म्हणून त्यांचीम उदाहरणें दिलीं नाहींत. कुठें कुठें ही तिन्हींही आक्षिप्त असतात. उदा० :---
“ह्या अपार संसारांत ब्रम्हादेवानें एकाच अर्जुनाला निर्माण केला; पण हे राजा ! तूं आपल्या निर्मळ कीर्तीनें सर्वांना अर्जुन (म्हणजे धवल) करून टाकल आहेस.”
“सूर्य उष्ण व उग्र असतो; चंद्र थंड असतो पण उग्र नसतो; पण हे राजा ! तूं एकटाच (अनुक्रमें कोप व अनुग्रह या बाबतींत) उग्रही आहेस व शीतलही आहेस.”
अथवा :--- “तो मेघ पाण्याची वृष्टी करतो, पण हे उदार अंत :--- करण्याच्या राजा ! तूं रत्नाची वृष्टि करतोस; तो मेघ, अमावास्येच्या रात्रीसारखा काळा असतो; तर तूं, आंतून व बाहेरून, निर्मळ आहेस,”
या श्लोकांत उपमान व त्याच्या श्लोकांतील विशेषणांच्या जोरावर व्यतिरेकाचा आक्षेप झाला आहे. पण हा व्यंग्य व्यतिरेक आहे असा भ्रम करून घेऊ नये; कारण मुख्यार्थ थोडासा सुद्धां जुळेनासा झाला, तर तेथें व्यंजना उभी राहूच शकत नाहीं. पण ह्या ठिकाणीं, ‘रत्नवर्षण:’ ह्या राजाच्या विशेषणाचा अर्थ, राजाच्या स्तुतिपर आहे असें म्हणून, मारूनमुटकून बसलवला तरी, उपमान व त्याची विशेषणें जीं येथें सांगितलीं आहेत, त्यांची राजाच्या उत्कर्षावांचून उपपत्ति लावतांच येत नाहीं. पण ज्या ठिकाणीं, उपमान व त्याचें विशेषण न सांगतांही (न घेतांही) केवळ उपमेयाचीं विशेषणें उदा० :--- ‘सुंदरो देवदत्त:’ यांतील सुंदर ह्या विशेषणसारखी वस्तुस्थितीचें प्रकाशन करून कृतार्थ होत असलीं (म्हणजे हा देवदत्त सुंदर आहे हीं, देवदत्त सुंदर असल्याची खरी गोष्त नुसती सांगून, आपले कार्य पुरें करीत असलीं तरी अशा ठिकाणीं कवीच्या मनांतील एका विशेष अभिप्रायाच्या जोरावर ती विशेषणें (म्हणजे उपमेयाचीं विशेषणें) स्वत:हून विलक्षण (निराळ्या, विरुद्ध) विशेषणांनीं युक्त अशा दुसर्या धर्मीपेक्षां (म्हणजे उपमानापेक्षां उदा) :--- चंद्रपेक्षां), उपमेयाचा उत्कर्ष सूचित करता; तेथें मात्र व्यंजनेचा विषय (अवश्य मानावा).
उदा० :--- “(तुझ्या तोंडाला) राहूचा क्रोधाची (क्रोधानें होणार्या ग्रासाची) लेशमात्र भीति नाहीं; आणि हे सुंदरी ! तुझ्या तोंडाची अवर्णनीय शोभा नित्य (नवी) सर्व बाजूंनीं वाढतच आहे” (चंद्रबिंबापेक्षां तुझें तोंड सर्वच बाबतींत उत्कृष्ट आहे.) हा अर्थसक्तिमूलक व्यतिरेकध्वनि आहे.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP