श्लेष अलंकार - लक्षण ३
रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.
(हा पहिला विष्णुपर अर्थ; आतां) दुसरा सूर्यपर अर्थ :---
“ज्यानें आपल्या किरणांनीं कालचक्र (म्ह० वर्ष, ऋतु. मास वगैरे) निर्माण केलें आहे. जो नित्य आकाशाचें उल्लंघन करतो, जो अंधकाराचा शत्रु आहे, व आपलें सेवन करणार्यांचें जाडय नाहींसें करण्यांत जो चतुर आहे. तो भगवान् सूर्य़ तुमच्या उत्कर्षाला कारण होवो.
विशेष्यें श्लिष्टा नसलीं तरी हा अभंगश्लेषाचा प्रकार होऊ शकतो. जसें, ‘जाडयहरणो विष्णु: सूर्य़श्च व: पातु’ (जाडय म्ह० आळस व शैत्य हरण करणारे विष्णु व सूर्य तुमचें रक्षण करो) असा वरील श्लोकाचा उत्तरार्ध केला असतां हा श्लेष होतो.
अर्थ श्लेषाचें उदाहरण :--- ‘अर्जुनाचा गुरु, मायेनें मनुष्य झालेला, परम पुरुष, गुंजांची माळ धारण करणारा, असा कोणी एक तुमचें संकटापासून रक्षण करो.” (कोऽपि ह्याचा अवर्णनीय हाही अर्थ घ्यावा.)
अशारीतीनें, वरील तिन्ही प्रकार प्रकृतविषयक आहेत.
“श्रीहरीच्या हाताच्या स्पर्शानें अत्यंत रमणीय दिसणारी, निरूपम प्रेमानें युक्त, अशी लक्ष्मीची शोभा हे सुंदरी ! तुझ्या मुखापुढें अगदीं फिक्की आहे (हा एक अर्थ; व यांतील कमलाभा या विशेष्याचा अर्थ कमलाची शोभा असा घेतल्यास वरील श्लोकाचाच दुसरा अर्थ होतो, तो असा :--- )
“सूर्याच्या किरणांच्या स्पर्शानें पाण्यामध्यें (अधि कम् कम् = पाणी) रमणीय दिसणार्या, व अत्यंत उत्कृष्ट अशा लाल रंगानें युक्त अशा कमलाची शोभा हे सुंदरी ! तुझ्या मुखाच्यापुढें अगदीं फिक्की आहे.” (हा दुसरा अर्थ
हा श्लेष केवळ अप्रकृतविषयक आहे, कारण प्रकृत जें मुख तें ह्या ठिकाणीम श्लेषाचा विषयच नाहीं. हा श्लेष ‘कमलाभा’ या विशेष्यवाचक पदांत व अधिकं या विशेषणवाक पदाम्त सभंग आहे व इतर ठिकाणीं अभंग आहे. दोन अप्रकृत विशेष्यें श्लिष्ट नसतांही श्लेष होऊ शकतो. जसें वरील श्लोकांत, ‘कमलाया; कमलस्य च शोभा गलिता तवाननस्याग्रे’ असा उत्तरार्ध केला असतां.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP