“उंच आकाशांत फिरणारा, ज्यांच्यातून पाण्याच्या धारा गळत आहेत, जो कृष्ण चंदनाप्रमाणें काळसर आहे, त्या वर्षेच्या (वर्षा ऋतूच्या) मेघाच्या विस्तारानें कोणाच्य मनांत हुरहुत उत्पन्न केली नाहीं ?’’
मम्मतांनींही या शब्दशक्तिमूलकध्वनीचें उदाहरण दिलें आहे तें असें :---
“ज्याचें स्वरूप कल्याणकारक आहे, ज्याच्या शरीरावर आक्रमण करणें (हल्ला करणें) अत्यंत कठिण आहे, ज्यानें आपल्या विरख्यात कुळाचा उत्कर्ष केला आहे, ज्यानें असंक्या बाणांचा संग्रह केला आहे, ज्याची गति अप्रतिहत आहे, तो शत्रूंचा नि:पात करतो अशा या राजाचा दानाचे वेळीं सतत सोडलेल्या उदकानें सुंदर दिसणारा असा हात होता. (झ्या श्लोकाचा दुसरा अर्थ असा :---)
“ज्याचें रूप कल्याणकारक आहे, ज्याच्या शरीरावर (पाठीवर) चढणें (तें उंच असल्यामुळें) कठिण आहे, जो आपल्या मोठया पाठीच्या कण्यामुळें उंच दिसतो, ज्याच्याभोंवतीं भुंग्यांचा थवा आहे, ज्याच्या गतीला कोणीही रोखूं शकत नाहीं, आणि जो अत्यंत श्रेष्ठ आहे, अशा त्या हत्तीची मदाच्या पाण्यानें सतत सुंदर दिसणारी अशी सोंड होती.” (येथें राजाचा हात प्रकृत व सोंड अप्रकृत असून ह्या दोहोंतील उपमा व्यग आहे).
पण कुवलयानंदकार याश्लेषाचें बाबतींत पुढीलप्रमाणें लिहितात :---
“प्रकृत व अप्रकृत श्लेषांच्या उदाहरणांत शब्दशक्तिमूलकध्वनि मानावा असें जें प्राचीनांनीं म्हटलें आहे तें, प्रकृत व अप्रकृत ज वाच्यार्थ तन्मूलक जें उपमादि अलंकार त्यांचें अशा ठिकाणीं व्यंग्यत्व असते, या अभिप्रायानें म्हटलें आहे, पण अप्रकृतार्थ अशा ठिकाणीं व्यंग्य असतो, या अभिप्रायानें त्यांनीं असें म्हटलें नाहीं. कारण अप्रकृतार्थसुद्धां शक्तीनें (अभिधेनें) प्रतिपाद्य असून, तो अभिधेनें प्रतीत होत असल्यानें त्याच्या बाबतींत व्जंजनाव्यापाराची जरूर नाहीं, प्रकृतार्थ हा प्रकरण वगैरेच्या बळावर एकदम मनांत आल्यावरच, मागाहून राजा, त्यानें घेतलेलें कराचें द्रव्य, इत्यादि अर्थांचे वाचक जे ‘राजा, कर’ इत्यादि शब्द त्यांच्या परस्पर सान्निधाच्या जोरावर त्या त्या अर्थाविषयीं त्या त्या शब्दांची जी दुसरी शक्ति तिचें प्रथम स्फुरण होतें व नंतर अप्रकृतार्थ प्रतीत होतो हें खरें; पण एवढयानें, तो अप्रकृत अर्थ व्यंग्य आहे, असें मात्र म्हणतां येणार नाहीं. कारण तो अप्रकृतार्थ अभिधेनें सांगितला जात असल्यानें, त्याला व्यंजनाव्यापाराची बिलकुल जरूर नाहीं; तो अप्रकृतार्थ, प्रकृतार्थाचें कथन पुरें झाल्यानंतर, प्रतीत होत असएल तर, बेशक अशा ठिकाणीं गूढ श्लेष मानावा. असा गूढ श्लेष दुसरीकडेही आढळतो :---
उदा० :---
“हा रैवतक पर्वत, अति जुनाट, अत्यंत मोठाल्या आणि लोंबणार्या अशा जगडव्याळ मेघांनीं झांकून टाकलेले, जिवंत प्राण्याला ज्या ठिकाणीं जाणें शक्य नाही असे व ज्यांच्याशीं दिग्गज टकरा देत आहेत असे कडे धारण करतो.” हा एक अर्थ झाला. आतां याच श्लोकाचा दुसरा अर्थ, रैवतक पर्वताचा व तटी या शब्दाचा दुसरा अर्थ न करतां होणारा असा :--- आणि जिवंत (राहूं इच्छिणार्या) प्रुषाला समागमाला अयोग्य, ज्याच्यावर जुनाट नखांचे व दंतांचे म्ह० दंतक्षताचे वण आहेत, अशा (म्हातार्या वेश्यांना) हा आश्रय देतो.”