मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|भक्तवत्सलता १|भक्तवत्सलता २| अभंग ३१ ते ३५ भक्तवत्सलता २ अभंग १ ते ५ अभंग ६ ते १० अभंग ११ ते १५ अभंग १६ ते २० अभंग २१ ते २५ अभंग २६ ते ३० अभंग ३१ ते ३५ अभंग ३६ ते ४० अभंग ४१ ते ४५ अभंग ४६ ते ५१ अभंग ५२ ते ५५ अभंग ५६ ते ६० अभंग ६१ ते ६५ अभंग ६६ ते ७० अभंग ७१ ते ७२ अभंग ७३ ते ७७ भक्तवत्सलता - अभंग ३१ ते ३५ संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangnamdevpandurangvitthalअभंगनामदेवपांडुरंगविठ्ठल अभंग ३१ ते ३५ Translation - भाषांतर ३१. पांडवांचे घरीं । रात्रंदिवस मुरारी ॥१॥तैंच सखा नामयाचा । एके ठायीं जेवायाचा ॥२॥त्याच्या उच्छिष्ठाचा ग्रास । जनी हात उचली त्यास ॥३॥३२. भूत झालें ऋषि पोटीं । लावियेलें मृगापाठीं ॥१॥विश्वामित्रा घाला घाली । पोटीं शकुंतला आली ॥२॥भगांकित केला । इंद्र भूतानें झडपिला ॥३॥तेंचि झालें हें भारत । म्हणे जनी केली मात ॥४॥३३. दोहीकडे दोही जाया । मध्यें गोरोबाची शय्या ॥१॥गोरा निद्रिस्थ असतां । कपट करिती त्याच्या कांता ॥२॥गोरोबाचे दोन्ही हात । आपुल्या ह्रदयावरी ठेवित ॥३॥जागा झाला योरा भक्त । जनी म्हणे त्या निद्रित ॥४॥३४. अहो द्रौपदीच्या बंधू । तारक देवा कृपासिंधू ॥१॥पांचाळीसी वस्त्रें देत । पुरवितो जगन्नाथ ॥२॥जनी म्हणे भाग्यवंत । तिच्या भावाचा अंकित ॥३॥३५. खांदीऋषि तो चालिला । बळीनें द्वारपाळ केला ॥१॥ऐसा भक्ता आधिन होसी । त्याच्या वचनें वर्तसी ॥२॥कष्टी होतां अंबऋषी । त्याचे गर्भवास सोसी ॥३॥सर्व दु:खासी साहिलें । जनी म्हणे दळण केलें ॥४॥ N/A References : N/A Last Updated : January 31, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP