प्रसंग तिसरा - जीव निद्रा
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
ॐ नमो सिद्ध अविनाश दिगंबरा । आतां प्रसंग आरंभिला तिसरा । तें चर्चन कथावया आसरा । सद्गुरूचा शिष्यासी ॥१॥
आतां बगासनीं बैसावें शुद्ध । देव्हडा देऊनि वोढिया नागबंध । मग दृढासनीं व्हावें शुद्ध । मणिपूर चक्रीं ॥२॥
कंठीं जालंधरबंध कागासनीं । मग मूळबंध तो द्यावा मीनीं । साधुत्वे बैसावे उलटोनी । परतलिये दृष्टीनें ॥३॥
मग ऊर्ध्व स्थानी निद्रा नाहीं । मग आपला आनंद आपण पाही । बोधत्वे निजीं निवांत राही । विश्र्वंभर भरित ॥४॥
खेचरी कृपा शक्तीची जाण । चांचरी चैतन्येचें भूषण । भूचरी महदेचे महिमान । वोळखे टीका नासिकीं ॥५॥
अगोचरी अविद्येची माता । ते तुवां वामांगी धरावी तत्त्वतां । मग उन्मनी निज भाग्यवंता । लागेल तुजला ॥६॥
शेख महंमद म्हणे सद्गुरुनायका । विनंती करितो ती तुम्ही ऐका । वेळोवेळां पुसतां वाटते शंका । न पुसतां सांगावें ॥७॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP