प्रसंग तिसरा - पूर्वजन्म-पृच्छा

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.



तुम्‍ही तरी अविनाश दिंगबर । पूर्वीं मी होतों कवणाचा कुमर । हें सांगावें जी मजला साचार । पूर्ण कृपा करूनियां ॥३९॥
माता पिता संयोजिती । पुढतपुढतीं सांडोनियां जाती । ते मजला वस्‍तीकरेसी वाटती । ज्ञानदृष्‍टीनें प्रत्‍यक्ष ॥४०॥
जैसं शेतीं धान्य असें पिकलें । वीज म्‍हणोनियां मुडां बांधिलें । मागुती पडलें तेथें विस्‍तारलें । तदन्याय होता माझा ॥४१॥
चौर्‍यांशी लक्षींचा अधिकार । मागे सोसिला घोरांदर । तो सांगतां वाढेल विस्‍तार । तुमचा तुम्‍ही जाणा ॥४२॥
तुम्‍हांस मज पडली होती तुटी । तों पापें केलीं असंख्यात कोटी । भेटी व्हावया कवण घटी । साधिली स्‍वामी सांगा ॥४३॥
नाना रस कष्‍टें करूनियां जोडी । मक्षिकीं मध केलासे आवडी । ते म्‍या लक्षचौर्‍यांशीची पुण्य जोडी । जोडल्‍या तुजलागी ॥४४॥
जैसी एक जिनसाची एक रती । तैसें पुण्य जोडिलें एक एक यातीं । परी चौर्‍यांशी लक्षींच्या भाया नेणती । तुजहि नेणतां ॥४५॥
चौर्‍यांशी लक्ष मायबापें अघोरी । तीं अनेक नांवे आळविती परोपरी । माझ्या सुखदुःखाची हेरी । ती नेणतींच कांहीं ॥४६॥
या मनुष्‍यदेहींची सगुण पितरें । ती मज वाटली महा पवित्रें तीं हे ग्रंथीं मांडावीं नाममात्रें । आज्ञा द्यावी सद्‌गुरु ॥४७॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP