प्रसंग तिसरा - शक्तीचें रूपवर्णन
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
आतां ऐक सांगतों नवलपरी । कृपाशक्ति महा सुंदर गोजिरी । आत्मज्ञान चर्चा नानापरी । सारजा होऊनियां ॥२२॥
चहूं खाणींमध्ये गोरेपण । हें वोळखे कृपेचें लक्षण । सांवळेपण महेदचें जाण । उमटे स्थूळाकारीं ॥२३॥
सप्त धातूंत मिश्रित शक्ति । आपल्या अहं शके भांडती । विकारोनियां विवरण करिती । एकमेकां परस्परें ॥२४॥
स्थूळ सूक्ष्म कारण महाकारण । हें चहूं शक्तीचें अवतरण । येरूनयेरांत समाधान । जटाजूट सायेकीं ॥२५॥
जैसे कोसल्या कांतणीचें जाळें । तैसें चहूं शक्तीमाजी गोपाळें । चालकपणें दाविलीं ढिसाळें । अनेक ब्रह्मांडांची ॥२६॥
शेख महंमद म्हणे अमोल । तुम्ही सांगता चहूं शक्तीचें बोल । हें कोठें नाहीं ऐकिलें सखोल । शास्त्रीं पुराणीं ॥२७॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP