प्रसंग तिसरा - स्वकुलवृत्त
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
आज्ञा दिधली तुज मूळ उत्तरें । जें जें कथिशील तें तें दिसेल बरें । मायबापें उद्धरूनि निज अक्षरें । अनुसंधाना पाते ॥४८॥
ऐका त्रिगुणांची तिन्हीं नांवें । गुह्यार्थें श्रोत्यांनीं वोळखावें । सर्वत्र गंवसले ते स्वभावें । चिपुटीसवें कथितां ॥४९॥
याति गोरी राजेमहंमद पिता । सगुण पतिव्रता फुलाई माता । ते प्रसवली अविनाश भक्ता । शेख महंमदालागीं ॥५०॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP