प्रसंग चवथा - शिवशक्ति भांडण

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.



ॐकार विस्‍ताराचें मूळ । तेथून कथा चालिलया प्रबळ । कीर्ति परमेश्र्वराची निर्मळ । कवित्‍वीं मांडिली ॥१॥
व्याल्‍या त्‍यांसी आत्‍मा म्‍हणे वो साजणी । तुम्‍ही हो अत्‍यंत माझ्या बहिणी । चुलत्‍या करूनीहि मानी । आतर् सखेपणें ॥२॥
येरी म्‍हणती तूं आमचा कामारी । आणिक सोयराही जालासी परोपरी । बैलहि होऊनियां विचारी । पाठीवरी वाहाशील ॥३॥
आत्‍मा म्‍हणे तुम्‍ही निःशक भांडा । दाटून खळवळितां माझिया तोंडा । एकीकून तुम्‍ही असा माझे तोंडा । योनीहि तुम्‍हीच ॥४॥
येरी म्‍हणती तरी तूं बाटलासीं । कवणिया तोंडें पवित्र म्‍हणविसी । आतां सांग पां तूं आम्‍हां पाशीं । धैर्य-चातुर्यपणें ॥५॥
येरु म्‍हणे तुम्‍ही चौघीभीतर । मी आत्‍मनाथ पै पवित्र । जैसा भानु चर्मकुडाभीतर । येणें न्यायें वसतसे ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP