प्रसंग चवथा - सच्छिष्य लक्षणें
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
होऊनि शिष्य करितील पापें । ते फिटती ना बाप वज्रलेपें । जैशी कांत टाकिली असे सर्पें । विष दंत राहिले ॥९३॥
जें जें पाप शिष्य करिती अभागी । तें तें दूषण घडे सद्गुरूलागी । यालागीं शिष्य उमगी सदू सौभागी । उत्तम सांगतो तैसे ॥९४॥
ऐका बिस्मिल्ला अल्ला हूं अकबर । टीका धरावी भावभक्तीचा अंकुर । एवं बोलते हजरत मिरां पीर जाहीर । दीन उद्धरणालागीं ॥९५॥
आतां या सच्छिष्यांचा पर्वकाळ । उत्तम मांडिलें हेरीचे विव्हळ । तें तुम्ही ऐकावें निर्मळ । श्रोतीं एकाग्र मनें ॥९६॥
सद्भाविक चित्तमनाचे उदार । ईश्र्वरीं भक्ति निश्र्चयें परी निर्धार । निकट बौद्धिक हृदयीं गोदानीर । ऐसे शिष्य अंगिकारावे ॥९७॥
निवांत निज प्रेम परमार्थी साचार । गहीनपण धैर्ये जैसा समुद्र । मान अपमान नेणती अविचार । ते शिष्य कबुल करावे ॥९८॥
जे उदास निःसंग दृढ गंभीर । संकल्प विकल्पाचा केला केर । आत्मत्वाचा पुसती विचार । ते वाटेकरी मुक्तीचे ॥९९॥
जे सर्वस्वें असती उदार । द्वैत नेणती गळाला अहंकार । दंभ क्रोध प्रपंचाही नाहीं थार। त्यासी विश्र्वासावें ॥१००॥
त्यजूनि काम क्रोध विषय कल्पना । वासना लाविती सद्गुरु चरणा । सेवकपणें नव विध लक्षणा । सद्गुरुस पुजिती ॥१०१॥
काया वाचा मन सर्वांगेसी । भाव चित्त वाहती सद्गुरुसी । स्वतंत्र कळंत्र देवीदेवतांसी । एवं सच्छिष्यत्वें ॥१०२॥
प्रसंग पहिल्यापासूनि दुसरा । दोन्ही पूर्ण जालियां आरंभिला तिसरा ।
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP