प्रसंग चवथा - अतीत दृष्‍टांत

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.



मग त्‍या म्‍हणती आम्‍ही शिरोमणी । स्‍फटिक शिळा न धरी रंगालागुनी । तैसी तुजसी ही आमुची मिळणी । आम्‍ही अतीत असों ॥७॥
आम्‍ही पतिव्रता अबला । तूं सर्वांगी दिससी गोंवळा । चर्मकुंड भंगल्‍या ऐक वेल्‍हाळा । रविबिंब अदृश्य ॥८॥
कुंड उदक न्यायें आम्‍ही सुंदरा । बिंबन्यायें भितरीं शोभना बरा । कां न मानिसी आमुचिया आभारा । सांग वेगीं चतुरा ॥९॥
कुंड उदक अतीत असें बिंबास । बिंबहि अतीत असे कुंडउदकास । तैसें तुमचें ऐहिक्‍य उदास । विरक्त साधु जाणती ॥१०॥
जैसां रत्‍नांमाजी असे किळ । तैसें तुझें आमुचें सुफळ । उगलेंचि कां घेसी पिळ । साधु साधनालागीं ॥११॥
आतां तूं ऐसा आमुच्यानें साजिरा । नाहीं तरी तुज कोण पुसे निबरा । उतराई झालासी मूळ उत्तरा । शीघ्र सैताडपणें ॥१२॥
मग आत्‍मा शब्‍द बोले कोंवळे । तुमच्यानें विकार विषय डोहोळे । परि सुख दुःख मज न कळे । अविनाश म्‍हणऊनी ॥१३॥
चौर्‍यांशी लक्ष सोयरिकी अनेक नातीं । विज्ञानें देखिली एक एक याति । तीं वेगळालीं सांगता परौती । तरी ग्रंथ पाल्‍हाळेल ॥१४॥
तंव सद्‌गुरु म्‍हणती सांडी उदंड । आतां नको बोलों हे प्रचंड । म्‍हणोनियां धरिलें तोंड । निज करें आपुलिया ॥१५॥
तूं बोलतोसी रे हें विज्ञान । जन पाखांडी होईल जाण । आतां तुवां बोलावें आत्‍मज्ञान । धर्म कीर्ति वाढावया ॥१६॥
मग शेख महंमद म्‍हणे विश्र्वास । स्‍वामी आवरे ना तुमचा वोरस । काय बोल ठेवितां मज दीनास । समर्थ जाणतेपणें ॥१७॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP