प्रसंग सातवा - ईश्र्वरस्‍तुति-प्रस्‍ताव

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


ॐ नमोजी सर्वोत्तमा नित्‍य मुक्ता ।  सर्वां ठायीं असे तुमची सत्ता । परी तूं निर्भय निर्गुण अलिप्त दाता । कल्‍पतरू विश्र्वाचा ॥१॥
ऐका सातव्या प्रसंगाची स्‍फूर्ती । मांडिली असे ईश्र्वराची स्‍तुती । आपले आभार आपण वर्णिती । विश्र्वासें ईश्र्वराचें देणें ॥२॥
शेख महंमद म्‍हण जी ईश्र्वरा । मी कोठेंच कांहीं न होतों दातारा । तुवां मज घातले संसारा । मनुष्‍य करूनियां ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP