प्रसंग सातवा - ईश्र्वरच खरा मायबाप

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


दिनदिशीं मानितसे तुझे उपकार । अष्‍टहि भावें चाले गहिंवर । हेत चित्त मन बुद्धि वाणि सादर । वैखरीसी होऊनियां ॥४॥
रज तेज नळ कमळ नांवें । हे तुवां परमेश्र्वरा ठेविलीं स्‍वभावें । आपलें गुह्य होऊन नेदी ठावें । सकळ जीवांलागुनी ॥५॥
शुकलित शोणित सप्त धातु । मायबापें ही लटकी असे मातु । तुझा तूंचि विश्र्वगुणां भरितु । सूत्र खेळवूनियां ॥६॥
जठरीं जंत कृमींची उत्‍पन्नता । तेथें कोण म्‍हणवी माता पिता । रज तेज सप्त धातूंची वार्ता । मिथ्‍या वाटतसे ॥७॥
स्त्रीपुरुष ॠतुकाळी रमती । तेथें कन्या कुमरें जन्मती । असें बहुत बोलती । पुढती परंपरा ॥८॥
म्‍हणती आम्‍ही कन्या कुमर व्यालों । सायासें पोषितां महा कष्‍टी जालों । अंतकाळीं मोकलून दिधलों । रडती येरून येरापें ॥९॥
पुत्र मातापित्‍यास असेस निघाला । तो तयानें दवडून दिधला । परी तो ईश्र्वरें नाहीं उपेक्षिता । यालागीं ईश्र्वरचि पिता ॥१०॥
पहा सर्पे उदंड अंडीं घातली । मागुती निष्‍ठुरपणें भक्षिलीं । चुकोनि राहिल्‍यांचीं पिलें जालीं । प्रतिपाळ ईश्र्वरकृपेचा ॥११॥
विंचू ते जन्मले विंचवामाझारी । विंचवा खाऊनि निघाले बाहेरी । त्‍यांचा प्रतिपाळ जना विचारी । ईश्र्वरकृपेनें होतसे ॥१२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP