प्रसंग सातवा - ईश्र्वराचें अपार देणें

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


अठरा भार वनस्‍थळीचा मेवा । तुवां जीवालागीं केला गा अव्यक्त देवा । उन्मत्त नेणती तुझा ठेवा । ढवाळी करितील ॥४३॥
अनेक भोग अलंकार प्रतिष्‍ठा । हे मनुष्‍यास केली गा गुणवरिष्‍ठा । तुझे स्‍तुतिविण अनेक खटपटा । बचके पाणी धरिती ॥४४॥
जगदीशाची वर्णना असे अपार । मी काय स्‍तुति करूं जाणे पामर । सद्‌गुरु बोलते जाले सगुणाकार । स्‍वानुभवें आपुलिया ॥४५॥
कोणी एकास विंझणवारा घातला । त्‍यानें त्‍याचा उपकार मानिला । ईश्र्वरें वायु विश्र्वजना घातला । त्‍याचा उपकार नाहीं ॥४६॥
सप्तसागर नद्या अनेक वोहळा । त्‍या ईश्र्वराच्या पोह्या प्रबळा । उदक सेवुनी नाठवी गोपाळा । उपकार भावेंसी ॥४७॥
जे उपकार ईश्र्वराचे मानिती । त्‍यांचे चरणींची होऊन रजरती । मज दिल्‍हें उपकार मानीत संतीं । शेख महंमद म्‍हणे ॥४८॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP