प्रसंग सातवा - शेख महंमदास सर्पदंश

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


जैसें मळ्याचें रूप करी माळी । मग तो पावे सकळ नव्हाळी । तैसें तुझें रूप केलिया न्याहाळी । मुक्ति रिद्धि सिद्धि वोळंगती ॥९१॥
खांव खांव करित द्रौपदीच्या घरा । शीघ्रव्रत आलासी गा दातारा । तरी तो नवाजिलें होऊनि उदारा । पोटेंसी धरूनियां ॥९२॥
पर्वकाळ रविवार दिन । तीरां गेलों तुमचे सेवेलागून । तेथें कां मज लाविलें पान । सांगा स्‍वामी पुसतां भावें ॥९३॥
ऐसें भुजंगानें डंखिलें तीनदां । तीनदां विष दिधले गोविंदा । तुझें काय चुकलों परमानंदा । मज कळलें पाहिजे ॥९४॥
यावेगळे मज छळती दुर्जन । नानापरी बोलती मज अवलक्षण । इंद्रियेंहि घाले घालिती जपोन । परी चकेच ना तुझे कृपें ॥९५॥
भावभक्ति वैराग्‍यें करितां मन । महा कष्‍टी जालों निज मंडन । तुझी सत्ता सकळ त्रिभुवन । मज कां गांजविसी ॥९६॥
तुझिया भक्ताकडे आणिकें पहाणें । तेव्हां तुवां काय जितेंचि मरणें । ईश्र्वर म्‍हणे हें माझेंचि करणें । कसूनि पहावयालागीं ॥९७॥
जे भक्तराज म्‍हणविती आपणांस । त्‍यांस मी छळोनि पाहीन अविनाश। उतरल्‍या माझिया कसोटीस । स्‍वयें त्‍यांचा सेवक म्‍हणवी ॥९८॥
शेख महंमदीं संतोष सद्‌गुरू खुणें । सत्‍य स्‍वामी जेव्हां लागलीं होती पानें। तेव्हां धांवा केला अद्वैत बोधानें। मग झेंडू फुटोनि गेला ॥९९॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP