प्रसंग बारावा - प्रशस्‍ती-सद्‌गुरुसेवा

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


ॐ नमोजी जिव शिव आगम ध्यान मुद्रा । नेम निगमीं नमस्‍कार केला खरा । चौर्‍यांशी लक्षींच्या मूळ स्‍थूळ आधारा । नमूनि आभार मानी ॥१॥
आयागमना स्‍थूळां कां केला नमस्‍कार । सुखदुःखें आठविला होता ईश्र्वर । म्‍हणोनियां स्‍थूळीं ज्ञान जालिया आभार । मानियेला सद्‌गुरुकृपेनें ॥२॥
यालागीं तारुण्यपणीं सेवावा सद्‌गुरु । चित्तमनेंसी होऊंनियां उदारु । हा धरिला पाहिजे दृढ निर्धारु । एकविध समस्‍तेंसी ॥३॥
धन्य धन्य तो पवित्र सद्‌गुरुरावो । जेणें जन्ममरणास केला खोवो । तुटला लक्ष चौर्‍यांशीचा भेवो । पुण्यप्रताप त्‍याचा ॥४॥
प्रणिपात केला जय जय जी सद्‌गुरु । आज हजरत मीरां पीर जाहिरु । त्‍याचें कृपेनें रत्‍नांचा सागरु । सिद्ध ग्रंथ आरंभिला ॥५॥
निकट निजभक्ताला नमस्‍कारुनी । केली असे पाखांड्याची निखंदनी । कोप कांही न धरावा मनीं । अनेक शहाण्णव कुळांनी ॥६॥


Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP