प्रसंग बारावा - कोंबड्या बकर्‍यांचे देवास बळी

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


पापें फेडाया आले संसारा । म्‍हणती अजापुत्र कोंबडी मारा । भोग संभ्रमेंसी घाला बरा । पुत्र मागावालागीं ॥६४॥
पुत्र जाला असे फळात्‍करा । म्‍हणे मज पावली एकवीरा । लोटांगणीं जाय होय सामोरा । गुगुळ जाळोनियां ॥६५॥
तो लेक उन्मत्त जालियाउपरी । अधिक नानापरीचीं पापें करी । पुण्य कांहीं न घडे गा श्रीहरि । वंशानुवंशीं पाप जोडी ॥६६॥
अनेक भ्रम वडिलांचें आचरण । ते नातू पणतू करिती गहन । पुण्यात्‍मा कोणी नव्हे सगुण । दंडक पडला हिंसेचा ॥६७॥
वंशी जरी कोणी भाग्‍यास आला । तो म्‍हणे आमचा कुळस्‍वामी पावला । अधिक अजापुत्र मारों लागला । उन्मत्त बोलाऊनियां ॥६८॥
जैसा निंब निंबोळिया पिकला । अशुच वायसां सुकाळ जाला । तैसें उन्मत्त अविचारियाला । अंगलगें बुडावया ॥६९॥
कधीं जोडिती पुण्याच्या राशीं । वंशी सुपुत्र जन्मेल उद्धारायासी । हें तंव कळों यावें समस्‍तांसी । दृष्‍टांतवचनें ॥७०॥
चौर्‍यांशीं लक्षीचा दुःखफेरा । अनेक सोसितां भव घोरांदरा । कधीं होईल उत्तम देह उपासारा । मनुष्‍य जन्माचा ॥७१॥
मनुष्‍य जन्मा आलिया परियेसा । भूतांवळीपुढें करितील हिंसा । पहा दाटुनी प्रवर्तती दोषां । सत्ताबह धरूनियां ॥७२॥
ऐशीं ही नानापरीचीं पाखांडें । करितील महा प्रचंडें । त्‍याचें वासनेनें घेतलें कोडें । तें कदा नावरे ॥७३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP