प्रसंग बारावा - द्वैतभावास अहंकार कारण
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
ऐसी हे अहंकारीं केली फाडाफाडी । येरून येरांची घेऊं नेणती गोडी । द्वैत प्रवर्तलेंसें परवडी । चहूं खाणीभीतरीं ॥२४॥
सांगेन ऐका अहंकाराची वित्पत्ती । एक देवता दोघी पूजिती । येरून येरांतें निखंदिती । तें सांगेंन आतां परियेसा ॥२५॥
आतां या जनांचे मोकळेपण । सांगेन ऐका चित्त देऊन । एकविध नाहीं भजन । ईश्र्वर स्वरूपाचें ॥२६॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP