मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग बारावा| नवससायास प्रसंग बारावा प्रशस्ती-सद्गुरुसेवा षड्दर्शनें-पाखांडी भांडणें षड्दर्शनांतील द्वैत संचार-दृष्टांत द्वैतभावास अहंकार कारण द्वारांच्या देवता-बाष्कळ समजुती इतर सणांच्या व व्रतांच्या देवता पूजनोपासनीं चित्तचांचल्यता कोंबड्या बकर्यांचे देवास बळी नवससायास चांग-गोंधळ भरणें प्रसंग-समाप्ति प्रसंग बारावा - नवससायास श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते. Tags : kavitapoemsaintsheikh muhammadकविताकाव्यमराठीशेख महंमदसंत नवससायास Translation - भाषांतर मूर्ख अज्ञान नवस करिती आवडी । हातीं खोडा पाईं घाली बेडी । आणिक पहा विष्टाहि चिवडी । कीटशेणी करूनियां ॥७४॥या जन्मींच जेणें नरक चिवडिला । तो काय पुढें उद्धरील जीवाला । हें न कळेंचि पहा या अज्ञान्याला । देखोनि आंधळे जाहाले ॥७५॥आणीक ऐका नवसांचें वेड । देवतेपुढें थावरती बगाड । जैसें श्र्वान फोडी कोरडें हाड । तदन्यायें जन भजतसे ॥७६॥जैसे बुजवण देखोनि हरणें । मनुष्य आलें म्हणोनि पळती रानें । तैसें हें जन झकलें अज्ञानपणें । प्रतिमेसी शेंदूर लाउनी ॥७७॥जेव्हां शेंदुर होता वाणियाचें घरीं । तेव्हां त्यांचे सत्व नेलें काय चोरीं । नेऊनि टाकितांचि पाषाणाउपरी । मूर्खाला संशय बाधी ॥७८॥एरवीं पाषाण दिसती लक्ष कोटी । शेंदुरापाषाणा होतांचि भेटी । निगुर्याला सुटे चरफड मोठी । भयें अज्ञान धरूनियां ॥७९॥मूर्ख नवस करूनी देवतांप्रती । म्हणे आम्हां द्यावी धन धान्य संपत्ती । ऐसेंच मुखें वेळोवेळां बोलती । उग्र व्रत धरूनियां ॥८०॥या देवतांच्यानें सुख लागेल भोगिले । तरी त्यांनीं कां बंदिखाने सोसिले । देवतापणाचें सामर्थ्य कोठें गेलें । रावणाचे सत्तेपुढें ॥८१॥खंडेराव असे नापिक होऊनि । तराळी जगदंबा वाहे पाणी । दरबार झाडी मेसको मायाराणी । भैरव गस्त करीतसे ॥८२॥तेहतीस कोटी देवांसी कामगिरी । ऐसीच वाटोनि दिधली परोपरी । सांगता उखई होईल बहुपरी । म्हणवुनी सेव सांगितला ॥८३॥दशवदनें आराधिलें श्रीपति । म्हणवुनि देव दास्यत्व करिती । यालागीं ईश्र्वरीं चित्तवृत्ती । वाहावी एकाग्र मनें ॥८४॥ज्याचा शेंबुड त्यासच न फेडवे । त्याच्या दास्यत्वें काय प्राप्त जोडे । हें ऐकोनि निर्गुणी धडफुडें । भजा पां तुम्ही श्रोते ॥८५॥एक म्हणती आम्हांस ग्रह लागले । तरी ग्रह कां रावणाचरणीं रुळले । कां ते सामर्थ्यानें सांडवले । रावणा कां न लागतीच ॥८६॥धनाड्यापासूनि दुरी असतां । तेणें विंधिला बाण लागे तत्त्वतां । त्याचेंच अंगीं जडता पुरता । बाण लागों न शके ॥८७॥तैसे भावें जडतां सद्गुरूच्या अंगें । बाधूं न शकती ग्रहांचीं भिंगें । माया संसाराच्या तरंगें । कवण दोष पाहे ॥८८॥नवस करोनि सुख मागितले । तरी नवसाविण दुःख कां आलें । सुख दुःख न पाहिजे वागविलें । हळहळ सांडूनियां ॥८९॥नवस केल्या जरी पुत्र जाले । व्याघ्र सिंह नवसेंविण जन्मले । कल्पवृक्ष फळासहि आले । नवस केलियाविण ॥९०॥जेव्हां देहे इच्छिलें निर्माण । तेव्हांच भूतभविष्य वर्तमान । अंगसंगें लागलें जडोन । वेळा काळें उमटे ॥९१॥चिंता मना अंतरीं वासना बरळे । उमटती नवस करावयाचे चाळे । चौर्यांशीचें सुखदुःख सोहळे । कवणे मागितले ॥९२॥सद्गुरु परब्रह्मास विसरणें । तेंच भवदुःख मूळ जाणणें । आत्मज्ञानाविण हें खुणें । न पवतील कोणी ॥९३॥पहा मच्छ सिंधूतें विसरले । आड वोहोळ्याच्या संगें लागलें । उदक सरल्या मृत्यु पावले । तैसें उन्मत्ता हाईल ॥९४॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP