प्रसंग तेरावा - काळकाई सटवाई आदि देवता
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
तिजेस पूजी अनामिकांचे देव । काळकाई विणाईसी धरी भाव । म्हणे वो मेसाई मले पाव । तुले शूरण आलों कीं ॥१७॥
स्वयें यातीचा विप्र शुद्ध म्हणवी । अनामिकांची पूजा चालवी । म्हणे सत्त्वाचे सोईं मला लावी । पाखर घालूनियां ॥१८॥
सटवीची भक्तिण मांगिण असे । तयेच्या चरणाला ब्राह्मण विश्र्वासे । अधिक अधिक नवस पुसे । काकुळती येउनी ॥१९॥
सटवीच्या भक्ताचें ज्ञान वेडें । काष्टाच्या पाउतका करुनी वाडेकोडें । त्यामाजी काठी घालुनी निवाडें । खांद्यावर मिरवितसे ॥२०॥
पहा आपुलिया पोटाकारणें । देवतांस नानापरी विटंबणें । हीन मूर्ख सांडवले ज्ञानें । पाखांडे वर्ततील ॥२१॥
शेंदराच्या परडींत घालुनी बाडगी । घरोघर फिरवी प्रसन्न हो भक्तालागी ॥ ऐसें बोलती स्वयें होऊनी रोगी । मूर्ख झकावया ॥२२॥
पैक्याच्या गुगुळें होय समाधान । भिक मागे भक्ताच्या खांद्यावर बैसोन । ते पूजितां केंवि तुटे बंधन । पूजारियाचें ॥२३॥
आतां ऐका गोंधळाचें व्यवधान । हांकारी समस्त भूतांलागुन । अनेक अनेक करुनि बरळण । रंगणीं अवतरत असे ॥२४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP