प्रसंग तेरावा - गारचकमक-दृष्टांत
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
गारे चकमकेंत असे पावक । तैसा जनार्दन व्यापून विश्र्वलोक । हें न कळतां साधनं मागती भीक । विटंबना करूनियां ॥३२॥
ऐका गारचकमकें अग्न भीतरीं । हुताशन विझे ना अद्यापवरी । तैसा परमात्मा निराहारी । अतीतपणें असे ॥३३॥
पुर्वीं येणें न्याय निराकार । साहकारिला तो सांगेन विस्तार । चकमक झटकिलया फुलें साचार । झोंबे कफालागुनी ॥३४॥
कफ म्हणजे ऐका अर्धमातृका । ते शून्यें साहाकारली अष्टनायका । तीपासून चारी मुक्ति विश्र्वलोका । पूर्वीं सांगितल्या त्या ॥३५॥
जेधवा पावक विस्तारला । तेव्हां कांही जाळितां न पुरे त्याला । निराकारीहि नाहीं उपासी मेला । गारेचकमकेभीतरी ॥३६॥
तदन्यायें परमात्मा साहकारला । विस्तारोनि जीव-आत्मा नांव पावला । कांहीं भोगिताची न पुरे त्याला । कल्पनेच्यानि संगें ॥३७॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP