प्रसंग तेरावा - सारीं अविद्येचीं लक्षणें
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
परब्रह्म न बैसे जनाच्या चित्ता। यालागीं झकवणीं थापिल्या देवता। परी अंतीं नयेत सद्गुरुवांचुनी स्वहिता । उपाय आणिक नाहीं ॥२५॥
जेथे असें अविद्या अवलक्षण । तेथें भावें विश्र्वसतील अज्ञान । जैसा मक्षिका दुर्गंधीलागुन । झडा घालिती आवडी ॥२६॥
पुष्पयाति चोवा चंदन गंधराज । साडासामर्जन बरवी केलिया वोज । तेथूनि मक्षिका पळतील सहज । वारलियाविण देख ॥२७॥
खल विष्ट दुर्गंधीचा पर्वकाळ । अथवा मलमुत्राचा पहा सुकाळ । चेथें मक्षिका करिती मद्य कोल्हाळ । तैसें जन अनाचारी भजे ॥२८॥
मक्षिका खताचे ठायीं घालिती आसाडी । तैसी देवता भजनें होय पापाची परवडी । परी घेवों नेणत सुगंध नामाची गोडी । सद्गुरु सेवूनियां ॥२९॥
अंगसंगें अविनाश व्यापून । ऐसेच बोलती गीता पुराण । यावेगळें सांगती सिद्ध साधुजन । दृष्टांत वचनें ॥३०॥
संतसाधूंचा उच्छिष्ट प्रसाद । स्वीकारूनि बोलतसे शब्द । ब्रह्मानंदें शेख महंमद । वाग्रत्नें निरोपी ॥३१॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP