प्रसंग सोळावा - बद्धमुक्त
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
आतां बद्धमुक्त तो कैसा । आणि मुक्तबद्ध तो परियेसा । सांगेन नित्यमुक्ताची दशा । सभे श्रोत्यालागुनी ॥७॥
करूनि आंघोळी सडा संमार्जन । विधि आचरणासी निश्र्चय पूर्ण । अंतरीं कल्पनेचें वळण । तो जाणा मुक्तबद्ध ॥८॥
बद्धांमाजी मुक्त संपूर्ण । सांगेन ऐका त्याचें लक्षण । बोध वर अशुचपण । जगीं लक्षा न ये ॥९॥
बाळक नेलें आळंगिल्याच्या घरा । परी तें न ये विटाळाच्या विकारा । तदन्यायें नित्य मुक्त खरा । शुच सोऽहं तत्त्वें ॥१०॥
हिरव्या चर्माचा बुधला । अन्यत्राच्या धृतें भरला । शुद्धत्वें घृतेंसीं राहिला । तैसे बद्धमुक्त ॥११॥
Last Updated : November 11, 2016
TOP