प्रसंग सोळावा - देवता-मुखवटे
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
आडवा आला दृष्टांत भेद । तेणें राहिला देवतांचा छंद । तो सांगो आरंभिला बोध । विवंचना करूनियां ॥३३॥
प्रत्यक्ष विटाळाची चिरगुटें । त्याचें चितारियानें केले मुखोटे । ते पूजिती नेटे पाटें । बाप माझा म्हणवूनियां ॥३४॥
त्यापुढें ठेवूनि पाहिली भाकरी । मागुती घेऊनि आपण स्वीकारी । परी उचलोन नेदी बाहेरी । भिक्षुकालागुनी ॥३५॥
हें जें जितुकें दृष्टि दिसे । तितुकें जनास खरें भासे । परि हें खग्रासीं अवघेंच नासे । श्रोते वक्ते सत्य जाणा ॥३६॥
रवि शशितारे गळोन पडती । मेरु मांदार पर्वत उडती । तेथें हा देवता कोठें राहाती । बाष्कळ पुजायासी ॥३७॥
जैसी हे पिंजारियाची पिंजणी । रूं लोकरीची करी दाणादाणी । तैसें होईल न राहे मेदनी । सागर एकवटती ॥३८॥
शनवार दिनीं अवधारा । उत्तरामुखें सुटेल वारा । सायंकाळी सर्वेश्र्वरा । आकांत करशील ॥३९॥
जे स्वयंभ अविनाश मूर्ति । ते ना बैसेच या जनाचे चित्तीं । दाही दिशा भ्रमें धांडोळिती । देहबुद्धीनें परियेसा ॥४०॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP