प्रसंग सोळावा - प्रसंग महिमा

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


श्रोत्‍यांवक्त्यांला विनउनी । प्राणिपात केला मुखवचनीं । अवधान द्यावें ग्रंथालागुनीं । चित्त उदारपणें ॥१०४॥
श्रोत्‍यावक्त्‍यांची आहिक्‍यता । तेथें श्रवण घडे भगवंता । अहं द्वैत तुटोन शांतता । स्‍वयंभ प्रकाशे ॥१०५॥
धन्य श्रोत्‍यावक्त्यांची हेरी । होती परमार्थाचें अधिकारी । नीरांतून क्षीर अंगिकारी । राजहंस जैसा ॥१०६॥
हंसा अधिक बहु गुणें । श्रोत्‍यावक्त्‍यांचें महिमानें । जैसे ध्रुव मेरु अढळपणें । चराचर होय जाय ॥१०७॥
निष्‍काम निःशंक निर्विकार । विश्र्वतारक परात्‍पर । लक्षचौर्‍यांशीचा अंधकार । उजेडे ज्‍यांनीं ॥१०८॥
ठांई ठाईं लोक हटकिले । निद्रिस्‍त ते सावध केले । कुतर्की उन्मत्त बुझावले । ज्ञानवैराग्‍यें ॥१०९॥
वक्त्‍यांचीं वाग्‌रत्‍नें । ऐकती भाव भक्ति मनें । त्‍यालाच हें अनुसंधानें । कळों येतील ॥११०॥
गज देखोनि सिंह नयनें । संतोष पावला तनुमनें । तैशीं ऐकोनि ग्रंथवचनें । अनुभवी जाणती ॥१११॥
सकळ कवित्‍वाचे शेष । मुगुटमणी आत्‍मसंतोष । परब्रह्माचा बोध स्‍वयंप्रकाश । लाधे परतोन पाहातां ॥११२॥
जैसीं षड्रस पक्‍वानें । गोड केलीं सामुद्रिकानें । तैसें मज सनाथ करणें । शेख महंमद म्‍हणे ॥११३॥
बारा सोळांसी रवि शशि । फेर दविती दिननिशीं । कवित्‍वामाजी दृष्‍टी । तैसी । शेख महंमदा ॥११४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP